Fact Check: युपीच्या बुलंदशहर च्या जामा मस्जिद चे 2017 चे चित्र, दिल्ली च्या जामा मस्जिद चे सांगून व्हायरल
विश्वास न्यूजच्या तपासात कळले की दिल्लीच्या जामा मशिदीच्या नावाने व्हायरल झालेली पोस्ट दिशाभूल करणारी आहे. 30 मे रोजी वादळामुळे जामा मशिदीचे नुकसान झाले होते. पण व्हायरल पोस्टमध्ये वापरण्यात आलेला फोटो हा यूपीमधील बुलंदशहरचा जुना फोटो आहे. दिल्लीच्या जामा मशिदीशी त्याचा काहीही संबंध नाही.
- By: Ashish Maharishi
- Published: Jun 6, 2022 at 12:30 PM
नवी दिल्ली (विश्वास न्यूज): नुकत्याच झालेल्या वादळामुळे दिल्लीतील ऐतिहासिक जामा मशिदीचे नुकसान झाले आहे. त्यानंतर सोशल मीडियावर काही युजर्स जामा मशिदीच्या नावाने इतर ठिकाणचे जुने फोटो व्हायरल करताना दिसले. हे दिल्लीतील जामा मशिदीचे छायाचित्र असल्याचा दावा करून एक छायाचित्र व्हायरल होत आहे. विश्वास न्यूजने व्हायरल झालेल्या पोस्टचा तपास केला. दिल्लीच्या जामा मशिदीचा नुकताच जो फोटो व्हायरल होत आहे तो 2017 चा फोटो यूपीच्या बुलंदशहर येथील जामा मशिदीचा आहे.
काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर सीमा ने 31 मे रोजी एक चित्र पोस्ट करून दावा केला: ‘कुछ तो होनेवाला है, कल तूफान में जामा मस्जिद का 300 किलो का गुम्बद व कलश गिरना कोई संयोग नहीं! ये महादेव का इशारा है।’
ह्याला खरे समजून बाकी यूजर्स देखील हि पोस्ट शेअर करत आहेत. हि पोस्ट आणि त्याचा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.
तपास:
व्हायरल पोस्टचे सत्य जाणून घेण्यासाठी विश्वास न्यूजने सर्वप्रथम गुगल रिव्हर्स इमेज टूलची मदत घेतली. त्यात अपलोड केलेले व्हायरल चित्र शोधल्यावर आम्हाला हिंदी न्यूज 18 च्या वेबसाइटवर एक बातमी सापडली. या बातमीत एका व्हिडिओचा वापर करण्यात आला होता. या व्हिडीओच्या सुरुवातीला व्हायरल झालेले चित्र असलेले फुटेज पाहता येते. ही बातमी 24 ऑक्टोबर 2017 रोजी अपलोड केली होती. उत्तर प्रदेशातील बुलंदशहर जिल्ह्यातील उपरकोट येथे असलेल्या जामा मशिदीचा मिनार कोसळल्याचे वृत्तात म्हटले आहे. इथे पूर्ण बातमी वाचा.
आतापर्यंतच्या तपासात हे सिद्ध झाले आहे की, व्हायरल पोस्टमध्ये वापरण्यात आलेल्या छायाचित्राचा दिल्लीच्या जामा मशिदीशी संबंध नाही. हे चित्र ऑक्टोबर २०१७ मध्ये बुलंदशहरमधील नुकसान झालेल्या जामा मशिदीचे आहे. तो आता दिल्लीच्या जामा मशिदीच्या नावाने व्हायरल होत आहे.
तपास सुरू ठेवत, आम्हाला आता जाणून घ्यायचे होते की अलीकडच्या काळात दिल्लीच्या जामा मशिदीचे काही नुकसान झाले आहे का. गुगलवर ओपन सर्च केल्यावर आम्हाला अनेक वेबसाइट्सवर अशा काही बातम्या दिसल्या, ज्यात असे दिसून आले की, पूर्वी आलेल्या वादळामुळे जामा मशिदीचे काही नुकसान झाले आहे. एबीपी लाइव्हच्या वेबसाईटवर २ जून रोजी प्रसिद्ध झालेल्या एका बातमीत म्हटले आहे की, जोरदार वादळात दिल्लीच्या जामा मशिदीच्या घुमटाचे नुकसान झाले आहे. याबाबत शाही इमाम सय्यद अहमद बुखारी यांनी भारतीय पुरातत्व विभागाला पत्र लिहून दुरुस्तीची मागणी केली आहे. संबंधित बातमी इथे वाचा.
31 मे रोजी जागरण डॉट कॉम वर प्रकाशित झालेल्या एका बातमीत म्हटले होते की, सोमवारी संध्याकाळी आलेल्या वादळामुळे जुनी दिल्लीतील ऐतिहासिक जामा मशिदीचे मोठे नुकसान झाले आहे. मशिदीच्या मुख्य घुमटाचा कलश तुटला आणि मिनारातील फरशा पडून तीन जण जखमी झाले. संपूर्ण बातमी येथे वाचता येईल.
तपासाच्या पुढच्या टप्प्यात विश्वास न्यूजने दिल्लीतील ज्येष्ठ पत्रकार विवेक शुक्ला यांच्याशी संपर्क साधला. त्यांच्यासोबत व्हायरल पोस्ट शेअर केली. व्हायरल झालेला फोटो खोटा असल्याचे त्यांनी सांगितले. दिल्लीच्या जामा मशिदीशी त्याचा काहीही संबंध नाही. जामा मशिदीचे एवढ्या मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले नाही.
दैनिक जागरण, बुलंदशहरचे प्रभारी लोकेश पंडित यांनीही व्हायरल झालेल्या छायाचित्राला दुजोरा दिला आणि सांगितले की, हे चित्र 2017 मधील आहे. त्यावेळी मोहल्ला उपरकोट येथील जामा मशिदीत हा अपघात झाला.
तपासाच्या शेवटच्या टप्प्यात दिशाभूल करणारी पोस्ट शेअर करणाऱ्या यूजर चा तपास विश्वास न्यूज ने केला. त्यात कळले त्यांना 2323 लोकं फॉलो करतात.
निष्कर्ष: विश्वास न्यूजच्या तपासात कळले की दिल्लीच्या जामा मशिदीच्या नावाने व्हायरल झालेली पोस्ट दिशाभूल करणारी आहे. 30 मे रोजी वादळामुळे जामा मशिदीचे नुकसान झाले होते. पण व्हायरल पोस्टमध्ये वापरण्यात आलेला फोटो हा यूपीमधील बुलंदशहरचा जुना फोटो आहे. दिल्लीच्या जामा मशिदीशी त्याचा काहीही संबंध नाही.
- Claim Review : कुछ तो होनेवाला है, कल तूफान में जामा मस्जिद का 300 किलो का गुम्बद व कलश गिरना कोई संयोग नहीं! ये महादेव का इशारा है।
- Claimed By : फेसबुक यूजर सीमा
- Fact Check : Misleading
Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!
Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.