Fact Check: एडिट करून बनवले आहे दोन तोंडाच्या सापाचे चित्र
विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल होत असलेला दावा खोटा असल्याचे समजले. चित्रात दिसत असलेला दोन तोंडाचा साप एडिटिंग टूल्स च्या मदतीने बनवण्यात आला आहे.
- By: Pallavi Mishra
- Published: Jun 11, 2022 at 12:40 PM
नवी दिल्ली (विश्वास न्यूज): सोशल मीडिया वर एक चित्र व्हायरल होत आहे ज्यात दोन तोंडाचा साप दिसतो. पोस्ट मध्ये दावा करण्यात येत आहे कि का हा साप खरा आहे. विश्वास न्यूज च्या तपासात हा दावा खोटा असल्याचे समोर आले. चित्रात दिसत असलेला साप डिजिटल टूल वापरून बनवण्यात आला आहे.
काय होत आहे व्हायरल?
Nagendra Singh नावाच्या फेसबुक यूजर (आर्काइव्ह लिंक) ने हि पोस्ट शेअर केली. आणि चित्राच्या वर लिहले: “अत्यंत दुर्लभ दोमुखी सफेद सर्प जिसके दर्शन मात्र से ही धन मे वृद्धि होने लगती है ॐ”
तपास:
चित्र तपासण्यासाठी आम्ही रिव्हर्स इमेज सर्च केले. ऍनिमल प्लॅनेट इंडियाच्या सत्यापित ट्विटरवर 11 सप्टेंबर 2016 रोजी केलेल्या ट्विटमध्ये आम्हाला ही प्रतिमा आढळली. मात्र या चित्रात सापाला दोन नव्हे तर एकच डोके होते. “तुम्ही याआधी कधी सापाला हसताना पाहिले आहे का?” असे कॅप्शन चित्रासोबत होते.
आम्हाला ह्या सापाचे चित्र wallpaperflare.com आणि wallpapercrafter.com ह्या वेबसाईट्स वर देखील सापडले. पण इथे देखील सापाला एकाच तोंड होते.
पुष्टीकरणासाठी आम्ही हे चित्र एडिटिंग आणि डिझाइन तज्ञ अरुण कुमार यांच्यासोबत शेअर केले. अरुणने चित्राचे बारकाईने विश्लेषण केले आणि आम्हाला सांगितले, “हे चित्र एडिट केले आहे. बारकाईने पाहिल्यास दोन्हीचे चेहरे सारखेच असल्याचे दिसून येते. फक्त सरळ बाजूचा चेहरा थोडा लहान केला आहे. जर तुम्ही सरळ डोळ्याकडे नीट बघितले तर तुमच्या लक्षात येईल की दोन्हीचे चेहरे अगदी सारखेच आहेत. फोटो स्पष्टपणे संपादित केला आहे.” दोन सापांमधील फरक खाली दिलेल्या कोलाजमध्ये स्पष्टपणे दिसून येतो.
कीवर्डसह शोधताना, आम्हाला दुहेरी डोके असलेल्या सापांबद्दल काही बातम्या सापडल्या. theguardian.com च्या या बातमीत, दुहेरी चेहऱ्याच्या सापांची 3 उदाहरणे दिली आहेत.
ह्या चित्राला खोट्या दाव्यासह Nagendra Singh ह्या फेसबुक यूजर ने शेअर केले होते. प्रोफाइल प्रमाणे, यूजर बिजनौर चे रहिवासी आहे.
निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल होत असलेला दावा खोटा असल्याचे समजले. चित्रात दिसत असलेला दोन तोंडाचा साप एडिटिंग टूल्स च्या मदतीने बनवण्यात आला आहे.
- Claim Review : अत्यंत दुर्लभ दोमुखी सफेद सर्प जिसके दर्शन मात्र से ही धन मे वृद्धि होने लगती है ॐ
- Claimed By : Narendra Singh
- Fact Check : False
Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!
Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.