आंबेडकर आणि त्यांच्या पत्नीच्या चित्रासह बसचा फोटो एडिट केला आहे. तसेच मूळ फोटो अमेरिकेचा नसून इंग्लंडचा आहे. एडिट केलेला फोटो चुकीच्या दाव्याने व्हायरल होत आहे.
नवी दिल्ली (विश्वास न्यूज): एक स्क्रीनशॉट सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. त्यात डॉ.बी.आर.आंबेडकर आणि एका महिलेचा फोटो असलेला बसचा फोटो आहे. त्यावर लिहिले आहे की डॉ. आंबेडकरांचे चित्र असलेली बस कोलंबिया (अमेरिका) च्या रस्त्यावर धावते.
विश्वास न्यूजने तपासात हा व्हायरल फोटो एडिट केला असल्याचे आढळून आले. बसच्या मूळ चित्रात त्यांच्या पत्नीचा फोटो नाही. तसेच व्हायरल झालेला फोटो अमेरिकेचा नसून इंग्लंडचा आहे.
काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर ‘अंकित गौतम प्रधान‘ (आर्काइव लिंक) ने 6 जुलै रोजी हा स्क्रीनशॉट शेअर केला. स्क्रीनशॉट वर लिहले होते, कोलंबिया (अमेरिका) की सड़कों पर दौड़ती बस पर बाबा साहब का चित्र यह असली सम्मान है, अमेरिका आज भी बाबा साहब को अपना आदर्श मानता है
किन्तु अपने यहां अधिकांश बहुजन भी बाबा साहब के मिशन से भटके हुए हैं।
जागरुक हों।।।।।
जय भीम
तपास:
आम्ही गुगल रिव्हर्स इमेजने व्हायरल फोटो शोधला. यामध्ये, Wikimedia Commons व्हायरल झालेल्या फोटोप्रमाणेच एक चित्र आम्हाला आढळले. व्हायरल झालेला फोटो आणि हा फोटो यात फरक फक्त डॉ.आंबेडकर आणि महिलेचा फोटो आहे. वेबसाइटनुसार, हा फोटो इंग्लंडचा आहे. जुलै 2008 मध्ये हा फोटो काढणा-या छायाचित्रकाराचे नाव अँड्रियन पिंगस्टोन आहे. त्याच्या वर्णनात असे लिहिले आहे की, इंग्लंडमधील बाथ शहरात व्होल्वो बस शहराचा प्रवास करत असताना.
अशा बसचा फोटो machinio नावाच्या वेबसाईटवरही पाहता येईल.
आता डॉ.आंबेडकर आणि त्या महिलेच्या फोटोबद्दल आम्ही तपास केला. याबद्दल शोध घेतल्यानंतर आम्हाला हा फोटो forwardpress नावाच्या वेबसाइटवर सापडला. ते बसमधील चित्रासारखे आहे. आंबेडकर आणि त्यांची पत्नी सविता असे कॅप्शन लिहिले आहे.
अधिक माहितीसाठी, आम्ही व्होल्वो बस पीआर प्रमुख Joakim Kenndal यांच्याशी संपर्क साधला. ते म्हणाले, ‘व्होल्वोने हे चित्र बनवले नाही.’
इंग्लिश शहरातील बाथमधील पर्यटन प्रमोशन कंपनी visitwest पीआर मॅनेजर एम्मा यांच्याशी आम्ही ईमेलद्वारे संपर्क साधला. त्याच्यासोबतचा व्हायरल फोटो आम्ही शेअर केला आहे. “हे एक एडिटेड चित्र आहे,” ते म्हणाले.
आम्ही ‘अंकित गौतम प्रधान‘ फेसबुक पेज स्कॅन केले ज्याने संपादित फोटो शेअर केला आहे. 23 फेब्रुवारी 2021 रोजी बनवलेल्या या पेजला सुमारे 3 हजार लोक फॉलो करतात.
हा फोटो आधीच व्हायरल झाला आहे. त्यानंतर विश्वास न्यूजने त्याची चौकशी केली होती. तुम्ही संपूर्ण अहवाल येथे वाचू शकता.
निष्कर्ष: आंबेडकर आणि त्यांच्या पत्नीच्या चित्रासह बसचा फोटो एडिट केला आहे. तसेच मूळ फोटो अमेरिकेचा नसून इंग्लंडचा आहे. एडिट केलेला फोटो चुकीच्या दाव्याने व्हायरल होत आहे.
Knowing the truth is your right. If you have a doubt on any news that could impact you, society or the nation, let us know. You can share your doubts and send you news for fact verification on our mail ID contact@vishvasnews.com or whatsapp us on 9205270923