X
X

Fact Check: सिद्धार्थ शुक्ला च्या अंतिम यात्रेचे नाही हे छायाचित्र, व्हायरल चित्र सिरीयल चे आहे

विश्वास न्यूज च्या तपासात आम्हाला कळले कि व्हायरल होत असलेले चित्र हे सिद्धार्थ शुक्ला यांच्या अंत्य यात्रेचे नाही आहे, हे त्यांची सिरीयल बालिका वधू च्या एका सिन चे आहे.

  • By: Umam Noor
  • Published: Sep 7, 2021 at 04:34 PM

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): मागील काही दिवसांपासून बिग बॉस फेम आणि एक्टर सिद्धार्थ शुक्ला यांच्या बद्दल बरेच चित्र आणि जुने व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहेत. तसेच आम्हाला त्यांना श्रद्धांजली देत लास्ट राईट्स च्या नावाने शेअर करण्यात येणारे एक चित्र दिसत आहे, ज्याला लोकं आताचा समजून शेअर करत आहेत. विश्वास न्यूज च्या तपासात हे चित्र आताच्या अंत्य यात्रेचे नसून ते काम करत असलेल्या एका सिरीयल चा असल्याचे सिद्ध झाले.

काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर DK CreationZone ने 2 सप्टेंबर रोजी हे चित्र अपलोड करून लिहले: आप कितनी भी बड़ी हस्ती क्यों न हों जाना सबको वहीं हैं. विनम्र श्रद्धांजलि🙏 सिद्धार्थ शुक्ला 🙏’

पोस्ट चा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा

तपास:
आपल्या तपासाची सुरुवात आम्ही गूगल रिव्हर्स इमेज पासून केली. सर्च मध्ये आम्हाला हे चित्र काही न्यूज वेबसाईट्स सह एम एक्स प्लेयर च्या लिंक वर देखील सापडले.

इथून आम्हाला कळले कि हे चित्र बालिका वधू नावाच्या सिरीयल च्या 1793 एपिसोड च्या एका व्हिडिओ चा स्क्रीनशॉत आहे. म्हणजेच हे सिरीयल च्या वेळ चे चित्र आहे. 20 मिनट 48 सेकंड च्या एपिसोड मध्ये 18:41 वर हे व्हायरल चित्र बघायला मिळते.

विश्वास न्यूज ने व्हायरल चित्रासंबंधी, दैनिक जागरण च्या बॉलीवुड बीट कव्हर करणाऱ्या कोरेस्पॉन्डेंट समिता श्रीवास्तव यांना संपर्क केला आणि त्यांच्या सोबत व्हायरल पोस्ट शेअर केली. त्यांनी आम्हाला सांगितले कि व्हायरल होत असलेले चित्र हे सिद्धार्थ शुक्ला च्या अंत्य यात्रेचे नाही आहे.

आम्ही पोस्ट शेअर करणाऱ्या यूजर चा देखील तपास केला, फेसबुक पेज DK CreationZone यांच्या सोशल स्कँनिंग मध्ये आम्हाला कळले कि यूजर ला 78,446 लोकं फॉलो करतात. हा पेज एप्रिल 2021 मध्ये बनवल्या गेला. आणि ते अधिकतर ट्रेंडिंग पोस्ट शेअर करतात.

निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात आम्हाला कळले कि व्हायरल होत असलेले चित्र हे सिद्धार्थ शुक्ला यांच्या अंत्य यात्रेचे नाही आहे, हे त्यांची सिरीयल बालिका वधू च्या एका सिन चे आहे.

  • Claim Review : सिद्धार्थ शुक्ला च्या अंतिम यात्रेचे चित्र
  • Claimed By : DK CreationZone
  • Fact Check : False
False
Symbols that define nature of fake news
  • True
  • Misleading
  • False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

Post your suggestion

No more pages to load

संबंधित लेख

Next pageNext pageNext page

Post saved! You can read it later