Fact Check: व्हायरल पोस्ट मध्ये दिसत असलेली मुलगी पाकिस्तानी नाही, इराणी आहे, पोस्ट दिशाभूल करणारी आहे
विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल पोस्ट दिशाभूल करणारी असल्याचे. चित्रात दिसत असलेली मुलगी तारा शरीफी हि इराणी आहे, पाकिस्तानी नाही. आइंस्टीन आणि हॉकिंग ने आईक्यू टेस्ट दिल्याचा कुठेच रेकॉर्ड नाही. मेन्सा आईक्यू टेस्ट मध्ये तारा शरीफी ला 162 गुण मिळाले. मेन्सा जगातील सगळ्यात मोठी आणि जुनी आईक्यू सोसायटी आहे.
- By: Urvashi Kapoor
- Published: Sep 27, 2021 at 09:17 PM
- Updated: Sep 12, 2024 at 05:51 PM
नवी दिल्ली (विश्वास न्यूज): सोशल मीडिया वर व्हायरल होत असलेल्या एका पोस्ट मध्ये एका मुलीचे चित्र दिसते, त्यासोबत दावा करण्यात येत आहे कि ह्या पाकिस्तानी मुलीने जगातील सगळ्यात मोठ्या हाई आईक्यू सोसायटी द्वारा प्रशासित एका आईक्यू टेस्ट मध्ये 162 स्कोर प्राप्त केला. पोस्ट मध्ये दावा करण्यात येत आहे कि, ह्या मुलीचा आईक्यू अल्बर्ट आइंस्टीन आणि स्टीफन हॉकिंग पेक्षा जास्ती आहे. विश्वास न्यूज च्या तपासात हि पोस्ट दिशाभूल करणारी असल्याचे कळले. चित्रात दिसत असलेली मुलगी तारा शरीफी आहे. ती इराण ची आहे पाकिस्तान ची नाही. आइंस्टीन आणि हॉकिंग यांची आईक्यू टेस्ट झाली असा कुठेच रेकॉर्ड नाही आहे. मेन्सा आईक्यू टेस्ट मध्ये तारा शरीफी ने 162 अंक प्राप्त केले. मेन्सा जगातील सगळ्यात जुनी आईक्यू सोसायटी आहे.
काय होत आहे व्हायरल?
फेसबुक वर शेअर केलेल्या पोस्ट मध्ये लिहले आहे: बलूचिस्तान की 11 वर्षीय पाकिस्तानी लड़की तारा बलूच ने ऑक्सफ़ोर्ड यूनिवर्सिटी से संबंधित मेन्सा का आईक्यू लेवल टेस्ट (162 अंक प्राप्त करना) पास किया और अल्बर्ट आइंस्टीन (160) और हॉकिंग का रिकॉर्ड तोड़ा। प्रशंसा
ह्या पोस्ट मध्ये अल्बर्ट आइंस्टीन आणि स्टीफन हॉकिंग ह्यांच्या चित्राच्या मध्ये त्या मुलीचे चित्र दिसते.
ह्या पोस्ट चा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.
तपास:
विश्वास न्यूज ने व्हायरल पोस्ट मध्ये करण्यात आलेल्या दाव्यांना एक-एक करून तपासले.
मेन्सा काय आहे?
मेन्सा जगातील सगळ्यात मोठी आणि सगळ्यात जुनी उच्च IQ सोसायटी आहे. हे संगठन त्या लोकांची तपासणी करते, जे एक बुद्धी परीक्षण मध्ये सामान्य लोकांपेक्षा वरच्या 2% मध्ये येतात. Mensa मध्ये जगातील 100 पेक्षा जास्ती देशातील सगळ्या वयाचे सदस्य आहे. हि सोसायटी आपल्या सदस्यांना, सामाजिक, सांस्कृतिक आणि बौद्धिक वार्तालाप करता, विविध पातळ्यांवर अवसर प्रदान करते.
आम्ही त्या मुलीचे छायाचित्र गूगल रिव्हर्स इमेज सर्च मध्ये टाकले. आम्हाला ऑस्ट्रेलियाई मीडिया आउटलेट SBS च्या वेबसाईट वर 3 जून, 2019 ची एक रिपोर्ट मिळाली.
रिपोर्ट मध्ये म्हंटले होते कि, 11 वर्षीय इराणी शाळेच्या मुलीने मेन्सा आईक्यू टेस्ट मध्ये उच्चतम संभव स्कोर प्राप्त केला आहे. युके च्या आयल्सबरी हाई स्कूल ची विद्यार्थिनी असलेल्या तारा शरीफी ने नुकतीच ऑक्सफर्ड ची परीक्षा देखील दिली ज्यात तिला 162 मार्क मिळाले. हा स्कोर 140 च्या, ‘जीनियस बेंचमार्क’ च्या वर आहे.
ह्यात म्हंटले आहे कि मुलीचे नाव, तारा शरीफजी आहे, तारा बलोच नाही. ती एक इराणी मुलगी आहे पाकिस्तानी नाही. हि गोष्ट खरी आहे पण, कि मेन्सा आईक्यू टेस्ट मध्ये तिनी भाग घेतला आणि त्यात 162 अंक मिळवले.
विविध न्यूज एजेन्सी ने हि बातमी कव्हर केली आहे. युके चा वृत्तपत्र, द बक्स हेराल्ड चा कव्हरेज पाहण्यासाठी इथे क्लीक करा आणि अमेरिका च्या एजेंसी द मीडिया लाइन मधील बातमी इथे वाचा.
पुढे आम्हाला तपासात कळले कि पोस्ट मधील मुलीची ओळख, 14 ऑगस्ट, 2019 रोजी वाइस प्रेसीडेंसी फॉर वीमेन एंड फैमिली अफेयर्स च्या आधिकारिक वेबसाइट वर इराण सरकार ने इराणी मुलगी, तारा शरीफ अशी केली आहे.
इराणी सरकार ने आधिकारिक वेबसाइट वर हे म्हंटले कि हा अनुमान लावला जाऊ शकतो कि, ह्या मुलीने अल्बर्ट आइंस्टीन आणि स्टीफन हॉकिंग ह्यांना देखील मागे टाकले.
पण आम्हाला अशी कुठलीच रिपोर्ट नाही मिळाली कि ज्यात सांगितले असेल कि ह्या दोघांनी आयक्यू टेस्ट दिली होती.
विश्वास न्यूज ने डॉन न्यूज पाकिस्तान चे सीनियर असाइनमेंट एडिटर आदिल जाफरी ह्यांना संपर्क केला. त्यांनी पुष्टी केली कि चित्रातील मुलगी पाकिस्तानी नाही.
ह्या पोस्ट ला जांलो नावाच्या फेसबुक पेज ने शेअर केले आहे. आम्हाला स्कॅन केल्यावर कळले कि पेज ला 15000 पेक्षा जास्ती लोकं फॉलो करतात.
निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल पोस्ट दिशाभूल करणारी असल्याचे. चित्रात दिसत असलेली मुलगी तारा शरीफी हि इराणी आहे, पाकिस्तानी नाही. आइंस्टीन आणि हॉकिंग ने आईक्यू टेस्ट दिल्याचा कुठेच रेकॉर्ड नाही. मेन्सा आईक्यू टेस्ट मध्ये तारा शरीफी ला 162 गुण मिळाले. मेन्सा जगातील सगळ्यात मोठी आणि जुनी आईक्यू सोसायटी आहे.
Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!
Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.