Fact Check: नेटफ्लिक्स च्या नावर व्हायरल होत असलेल्या ई-मेल वर विश्वास ठेऊ नका

नेटफ्लिक्स च्या नावावर व्हायरल होत असलेला, तसेच पेमेंट डिटेल्स अपडेट करण्यास सांगण्यात येत असलेला व्हायरल ई-मेल एक स्कॅम आहे. लोकांची खासगी माहिती चोरण्याच्या हेतूने हा ई-मेल बनवण्यात आला आहे.

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): विश्वास न्यूज ला वॉट्सऐप चॅट-बोट वर फॅक्ट-चेक करता एक मेसेज वाचकांतर्फे मिळाला, ज्यात एका ईमेल चा स्क्रीनशॉट होता. असे सांगण्यात येत आहे कि हा ईमेल नेटफ्लिक्स तर्फे आला आहे, ज्यात लिंक वर क्लिक केल्या नंतर नेटफ्लिक्स यूजर ना पेमेंट डिटेल्स अपडेट करण्यास सांगितले जाते. विश्वास न्यूज ला आपल्या तपासात कळले कि हा व्हायरल होत असणारा ईमेल एक फिशिंग स्कॅम आहे.

काय आहे पोस्ट मध्ये?
विश्वास न्यूज ला फॅक्ट-चेक करता मिळालेला हा ई-मेल चा स्क्रीनशॉट नेटफ्लिक्स तर्फे आल्याचा सांगण्यात येत आहे. यात इंग्रजीत लिहलेल्या कन्टेन्ट चा मराठी अनुवाद खालील प्रमाणे:
“नमस्कार, तुमच्या करंट बिलिंग माहिती मध्ये आम्हाला थोडा त्रास होत आहे. कृपया आपले पेमेंट डीटेल्स परत अपडेट करा. आपले अकॉउंट पण अपडेट करा.

तपास:
विश्वास न्यूज ला आपल्या तपासात असे आढळले कि हा मेसेज २०१७ साल पासून व्हायरल होत आहे. डिसेंबर २०१८ मध्ये यूएस फेडरल ट्रेड कमीशन ने या बाबतीत एक स्टेटमेंट दिले होते, त्या रिपोर्ट चे शीर्षक आहे – नेटफ्लिक्स फिशिंग स्कैम:डोंट टेक द बेट.

या रिपोर्ट मध्ये सांगण्यात येत आहे कि स्कैमर्स नेहमी अश्याच नामवंत कंपन्या ज्यांचे नावं लोकांना माहिती आहे, त्यांच्या नावावर अफवा पसरवतात आणि लोकांना ठगतात. ह्या केस मध्ये नेटफ्लिक्स या कंपनी चे नाव घेण्यात येत आहे. ओहायओ पोलीस यांनी हा स्क्रीनशॉट, खासगी माहिती चोरण्याच्या हेतू ने ह्या ई-
मेल चा स्क्रीनशॉट शेअर केला होता. या ई-मेल मध्ये दावा केला गेला आहे कि यूजर चा अकाउंट होल्ड करण्यात आला आह, कारण नेटफ्लिक्स च्या सध्या च्या बिलिंग इन्फॉर्मशन मध्ये अडचणी येत आहेत. त्यात एक लिंक देखील दिली आहे ज्यात यूजर ना आपली पेमेंट मेथड अपडेट करण्यास सांगितले गेले आहे.

याच रिपोर्ट मध्ये स्क्रीनशॉट वापरला गेला आहे तोच आम्हाला फॅक्ट-चेक करण्यास मिळाला आहे.

आम्ही थोडा अजून तपास केल्यावर आम्हाला एक नेटफ्लिक्स सोबत संबंधित आर्टिकल सापडले, ज्याचे शीर्षक होते: फिशिंग और ससपीशियस ईमेल्स ऑर टेक्स्ट क्लेमिंग टू बी फ्रॉम नेटफ्लिक्स.

या आर्टिकल मध्ये लिहले गेले आहे कि: तुम्हाला नेटफ्लिक्स च्या नावावर एखादा टेक्स्ट मिळाला का, ज्यात तुम्हाला तुमचा युजरनेम, पासवर्ड किंवा पेमेंट मेथड विचारले गेले आहे? जर हो तर आम्ही तुम्हाला हा मेसेज पाठवलेला नाही. अश्या मेसेज सोबत दिलेल्या लिंक वर देखील तुम्ही क्लिक करू नका. अशे मेसेज आम्हाला, phishing@netflix.com वर फॉरवर्ड करा.
विश्वास न्यूज ने चॅट सपोर्ट च्या मदतीने, नेटफ्लिक्स सोबत संपर्क केला. नेटफ्लिक्स च्या कस्टमर सपोर्ट मधल्या संध्या ने आमच्या सोबत संपर्क साधला आणि आम्हाला, व्हायरल होत असलेला ई-मेल खोटा असल्याचे सांगितले. हा लोकांची खासगी माहिती चोरण्यासाठी केलेला एक प्रयत्न आहे, हा एक फिशिंग स्कॅम आहे.

हा ई-मेल support@snaprides.co.za या ऍड्रेस वरून करण्यात आला आहे. यावर पण संध्या नि आम्हाला सांगितले कि हा एक स्कॅम आहे आणि त्याचा नेटफ्लिक्स या कंपनी सोबत काहीच संबंध नाही.

निष्कर्ष: नेटफ्लिक्स च्या नावावर व्हायरल होत असलेला, तसेच पेमेंट डिटेल्स अपडेट करण्यास सांगण्यात येत असलेला व्हायरल ई-मेल एक स्कॅम आहे. लोकांची खासगी माहिती चोरण्याच्या हेतूने हा ई-मेल बनवण्यात आला आहे.

False
Symbols that define nature of fake news
Know The Truth...

Knowing the truth is your right. If you have a doubt on any news that could impact you, society or the nation, let us know. You can share your doubts and send you news for fact verification on our mail ID contact@vishvasnews.com or whatsapp us on 9205270923

Related Posts
नवीनतम पोस्ट