Fact Check: पूर्व पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या छायाचित्रासोबत करण्यात येणार दावा चुकीचा

विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल दावा खोटा निघाला. मनमोहन सिंह २००४ मध्ये पहिल्यांदा पंतप्रधान बनले होते, आणि व्हायरल छायाचित्र १९९७ चे आहे. हे छायाचित्र तेव्हाचे आहे जेव्हा तत्कालीन काँग्रेस अध्यक्ष सीताराम केसरी यांना मनमोहन सिंह भेटायला पोहोचले होते. त्यावेळी मनमोहन सिंह पंतप्रधान नव्हते.

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): सोशल मीडिया वर सध्या एक छायाचित्र व्हायरल होत आहे, ज्यात भारताचे पूर्व पंतप्रधान मनमोहन सिंह यांना एका टॅक्सी मधून निघताना आपण बघू शकतो. पोस्ट सोबत दावा करण्यात येत आहे कि हे छायाचित्र तेव्हाचे आहे जेव्हा मनमोहन सिंह पहिल्यांदा नियुक्त झाले आणि संसद मध्ये आले. विश्वास न्यूज च्या तपासात हा दावा चुकीचा असल्याचे समजले. मनमोहन सिंह हे २००४ मध्ये पहिल्यांदा पंतप्रधान बनलेत पण, व्हायरल छायाचित्र हे १९९७ चे आहे जेव्हा ते तत्कालीन कांग्रेस अध्यक्ष सीताराम केसरी यांच्या घरी त्यांना भेटायला आले होते. मनमोहन सिंह तेव्हा पंतप्रधान नव्हते.

काय होत आहे व्हायरल?
व्हायरल छायाचित्रात भारताचे पूर्व पंतप्रधान मनमोहन सिंग यांना टॅक्सी मधून निघताना बघितले जाऊ शकते. छायाचित्रात लिहले आहे: “पहली बार प्रधानमंत्री बनने के बाद टैक्सी से संसद पहुंचे थे डॉक्टर मनमोहन सिंह।” पोस्ट के साथ डिस्क्रिप्शन में लिखा है “ऐसी सादगी को दिल से सलाम, मोदी के बारे में क्या कहेंगे आप।”

या पोस्ट चा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.

तपास:

तपासाच्या पहिल्या टप्प्यात विश्वास न्यूज ने हे छायाचित्र गूगल रिव्हर्स इमेज सर्च वर तपासले. आम्हाला व्हायरल छायाचित्र आऊटलूक च्या एका फोटो गॅलरी मध्ये मिळाले. इथे दिलेल्या डिस्क्रिप्शन प्रमाणे, अनुवादित: सीताराम केसरी यांच्या घरी सीडब्ल्यूसी बैठकीसाठी मनमोहन सिंह पोहोचले, दिल्ली १९९७.

इथे हे सांगण्यासारखे आहे कि मनमोहन सिंह पहिल्यांदा पंतप्रधान २००४ मध्ये बनले होते. १९९७ मध्ये ते राज्यसभा संसद होते.

भारतात पंतप्रधान च्या सुरक्षेची जबाबदारी, SPG कडे असते. अश्यात पंतप्रधान बनल्यानंतर SPG नियुक्त पंतप्रधान यांच्या सुरक्षेत लागून जातात. अश्यात हे नक्कीच अशक्य आहे कि पहिल्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर, मनमोहन सिंह टॅक्सी नि पोहोचतील, बिना कुठल्या सुरक्षेचे.
या विषयावर आम्ही काँग्रेस चे प्रवक्ता संजीव सिंह यांच्यासोबत संपर्क केला. त्यांनी हे स्पष्ट केले कि हे छायाचित्र १९९७ चे आहे.

हि पोस्ट सोशल मीडिया वर बऱ्याच लोकांनी शेअर केली आहे आणि चुकीच्या दाव्यासह शेअर करत आहे. यातील एक प्रोफाइल आहे, Up News Hindi नावाचा फेसबुक पेज. सोशल स्कॅनिंग मध्ये आम्हाला कळले कि या पेज चे 21,912 फॉलोवर्स आहे.

निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल दावा खोटा निघाला. मनमोहन सिंह २००४ मध्ये पहिल्यांदा पंतप्रधान बनले होते, आणि व्हायरल छायाचित्र १९९७ चे आहे. हे छायाचित्र तेव्हाचे आहे जेव्हा तत्कालीन काँग्रेस अध्यक्ष सीताराम केसरी यांना मनमोहन सिंह भेटायला पोहोचले होते. त्यावेळी मनमोहन सिंह पंतप्रधान नव्हते.

False
Symbols that define nature of fake news
Know The Truth...

Knowing the truth is your right. If you have a doubt on any news that could impact you, society or the nation, let us know. You can share your doubts and send you news for fact verification on our mail ID contact@vishvasnews.com or whatsapp us on 9205270923

Related Posts
नवीनतम पोस्ट