Fact Check: मुकेश खन्ना यांच्या मृत्यूबाबत व्हायरल पोस्ट खोटी

विश्वास न्यूज च्या तपासात मुकेश खन्ना यांच्या निधनाची बातमी अफवा असल्याचे कळले, ते सुरक्षित आहेत.

विश्वास न्यूज (नवी दिल्ली): सुप्रसिद्ध अभिनेते मुकेश खन्ना यांच्या मृत्यूची अफवा सोशल मीडिया वर सुरु आहे. बरेच यूजर्स मुकेश खन्ना यांचे छायाचित्र पोस्ट करून दावा करत आहेत कि कोरोनाव्हायरस ने संक्रमित मुकेश खन्ना मुंबई च्या लीलावती हॉस्पिटल मध्ये ऍडमिट होते, जिथे त्यांचे निधन झाले. विश्वास न्यूज च्य तपासात हि पोस्ट खोटी असल्याचे समजले. स्वतः मुकेश खन्ना यांनी या अफवांचे खंडन केले आहे.

काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर ‘गोहना ब्रेकिंग न्‍यूज’ ने ११ मे रोजी एक पोस्ट अपलोड केली आणि लिहले: ‘मुकेश खन्ना शक्तिमान कोरोंना से तीन दिन पूर्व संक्रमित हुए थे आज लीलावती अस्पताल में आख़री साँस ली भगवान उनके आत्मा को शांति दे।’

मुकेश खन्ना यांच्या मृत्यूच्या अफवा ला सत्य मानून बरेच लोक शेअर करत आहेत. या पोस्ट चा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा
विश्वास न्यूज ला आपल्या फॅक्ट चेकिंग व्हाट्सअँप चॅट-बोट (+91 95992 99372) वर देखील हा दावा मिळाला.

तपास:
विश्वास न्यूज ने सगळ्यात आधी सत्य जाणून घेण्यासाठी मुंबई मध्ये बॉलीवूड बीट कव्हर करणाऱ्या दैनिक जागरण च्या संवाददाता स्मिता श्रीवास्तव यांना संपर्क केला. त्यांनी विश्वास न्यूज ला सांगितले कि मुकेश खन्ना एकदम स्वस्थ आहेत. व्हायरल पोस्ट खोटी आहे.

तपासाच्या पुढच्या टप्प्यात विश्वास न्यूज ने मुकेश खन्ना यांच्या सोशल मीडिया अकाउंट चा तपास केला. आम्हाला ११ मे रोजी मुकेश खन्ना यांनी फेसबुक वर केलेले एक वक्तव्य मिळाले, ज्यात त्यांनी सगळ्या व्हायरल दाव्यांचे खंडन केले आणि सांगितले कि सगळ्यांच्या आशीर्वादाने ते एकसं स्वस्थ आहेत, सुरक्षित आहेत, त्यांना कॉवीड झाला होता पण ते कुठल्याच हॉस्पिटल ला ऍडमिट नव्हते. या भ्रामक आधारहीन खोट्या बातम्या लोक पसरवत आहे, माहित नाही त्यांचे उद्देशात काय! या प्रकारे ते कितीचं लोकांच्या भावनांसोबत खेळत आहेत.

हा संपूर्ण व्हिडिओ तुम्ही इथे बघू शकता.

मुकेश खन्ना यांचा हाच व्हिडिओ तुम्ही त्यांच्या इंस्टाग्राम अकॉउंट वर पण बघू शकता.

तपासाच्या शेवटच्या टप्प्यात आम्ही पोस्ट शेअर करणाऱ्या यूजर चे स्कँनिंग केले, त्यात आम्हाला कळले कि गोहाना ब्रेकिंग न्‍यूज नावाच्या या फेसबुक पेज ला २३ हजार पेक्षा जास्ती लोकं फॉलो करतात. हा पेज हरियाणाच्या गोहाना वरून चालवण्यात येतो. याला २५ नोव्हेंबर रोजी बनवले होते.

निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात मुकेश खन्ना यांच्या निधनाची बातमी अफवा असल्याचे कळले, ते सुरक्षित आहेत.

False
Symbols that define nature of fake news
Know The Truth...

Knowing the truth is your right. If you have a doubt on any news that could impact you, society or the nation, let us know. You can share your doubts and send you news for fact verification on our mail ID contact@vishvasnews.com or whatsapp us on 9205270923

Related Posts
नवीनतम पोस्ट