Fact Check: व्हायरल सीसीटीव्ही फुटेज मुंबई मधील मारेकऱ्याची नाही, व्हायरल दावा खोटा आहे

व्हायरल होत असलेले सीसीटीव्ही फुटेज अंधेरी मधील हॅट मॅन किलर चे नाही, जो मुंबई च्या रस्त्यांवर मोकाट फिरत आहे. व्हिडिओ नवीन येत असलेला चित्रपट मारीच च्या प्रोमोशन साठी शेअर करण्यात आला आहे. व्हायरल दावा खोटा आहे.

Fact Check: व्हायरल सीसीटीव्ही फुटेज मुंबई मधील मारेकऱ्याची नाही, व्हायरल दावा खोटा आहे

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): विश्वास न्यूजला एक व्हिडिओ समोर आला, जो विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर होत असलेल्या सीसीटीव्ही फुटेजसारखा दिसत होता. हे सीसीटीव्ही फुटेज मुंबईत महिलांची हत्या करणाऱ्या हॅट मॅन किलरचे असल्याचा दावा केला जात होता. हा व्हिडिओ अंधेरीचा असल्याचा दावा करण्यात आला आहे. विश्वास न्यूजच्या तपासात हा व्हिडिओ अभिनेता तुषार कपूरच्या आगामी ‘मारीच’ या चित्रपटाच्या प्रमोशन चा असल्याचे आढळून आले आहे. व्हायरल दावा खोटा आहे.

काय होत आहे व्हायरल?
ट्विटर यूजर Munendra Singh ह्यांनी व्हायरल व्हिडिओ शेअर केला आणि इंग्रजीत लिहले: Be safe Guys and aware from this type of men , don’t live lonely in deserted place #HatmanKillerInMumbai

ह्या पोस्ट चा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.

हा दावा इंस्टाग्राम आणि फेसबुक वर देखील शेअर करण्यात येत आहे.

तपास:
विश्वास न्यूज ने तपासाची सुरुवात ह्या व्हिडिओ चे निरीक्षण करण्यापासून केली.

आम्हाला एक वॉटरमार्क ह्या व्हिडिओ क्लिप वर सुरुवातीला दिसला, ज्यावर ‘MAARRICH’ असे लिहले होते.

त्यानंतर आम्ही मारीच बद्दल इंटरनेट वर शोधले. आम्हाला कळले कि मारिच हा चित्रपट 9 डिसेंबर 2022 रोजी थिएटरमध्ये रिलीज होण्‍यासाठी सज्ज आहे. आम्‍हाला त्‍याच्‍या सोबत निगडित असलेले काही रिपोर्ट्स देखील इंटरनेट वर सापडले.

तपासाच्या पुढच्या टप्प्यात आम्ही ट्विटर वर किवर्ड सर्च करून हॅट मॅन बद्दलचे ट्विट्स शोधले, आम्हाला त्यात मुंबई पोलीस च्या अधिकृत अकाउंट वरून करण्यात आलेले ट्विट सापडले. त्या ट्विट मध्ये लिहले होते: Debunked :

A widely circulated video given the title ‘Hatman Killer in Mumbai’ shows CCTV footage of the stabbing of a woman in Andheri.
We have confirmed that the clip is completely fake & request all to not share it for it furthers chaos and panic.

त्यानंतर आम्ही ह्यासंबंधीत बातम्या तपासल्या.

आम्हाला FirstPost वर एक बातमी सापडली, बातमी चे शीर्षक होते: The Hatman killer video in Mumbai turns out to be a promotional campaign for the upcoming film Maarrich

तसेच आम्हाला Times Now वर देखील एक रिपोर्ट सापडली. रिपोर्ट चे शीर्षक होते: There is no ‘Hatman Killer’ in Mumbai; police call the viral CCTV video ‘completely fake’

तपासाच्या पुढच्या टप्प्यात आम्ही ज्येष्ठ बॉलीवूड पत्रकार पराग चापेकर ह्यांना संपर्क केला, त्यांनी देखील हे स्पष्ट केले कि व्हायरल व्हिडिओ येणारे चित्रपट मारीच सोबत संबंधित आहे. हा व्हिडिओ त्यांनी चित्रपटाच्या प्रोमोशन करता वापरला असावा. त्यांनी असे देखील सांगितले कि लोकांनी अश्या व्हिडिओस वर विश्वास ठेवण्यापेक्षा फॅक्ट चेक वाचावे आणि मगच ते शेअर करावे.

तपासाच्या शेवटच्या टप्प्यात आम्ही ह्या ट्विटर हॅन्डल नि हा व्हिडिओ शेअर केला त्याचे सोशल बॅकग्राऊंड चेक केले. आम्हाला कळले की Munendra Singh हे व्यवसायाने कन्टेन्ट रायटर आहेत आणि त्यांनी सप्टेंबर 2020 मध्ये ट्विटर जॉईन केले.

निष्कर्ष: व्हायरल होत असलेले सीसीटीव्ही फुटेज अंधेरी मधील हॅट मॅन किलर चे नाही, जो मुंबई च्या रस्त्यांवर मोकाट फिरत आहे. व्हिडिओ नवीन येत असलेला चित्रपट मारीच च्या प्रोमोशन साठी शेअर करण्यात आला आहे. व्हायरल दावा खोटा आहे.

False
Symbols that define nature of fake news
Know The Truth...

Knowing the truth is your right. If you have a doubt on any news that could impact you, society or the nation, let us know. You can share your doubts and send you news for fact verification on our mail ID contact@vishvasnews.com or whatsapp us on 9205270923

Related Posts
नवीनतम पोस्ट