म्यानमार च्या नावाने व्हायरल होत असलेला व्हिडिओ हा भारतातील BrahMos मिसाईल च्या टेस्ट लाँच चा आहे.
नवी दिल्ली (विश्वास न्यूज): विश्वास न्यूज ला एक व्हिडिओ आणि काही तसेच चित्र फेसबुक वर व्हायरल होत असल्याचे लक्षात आले. असा दावा करण्यात येत आहे कि भारताजवळच्या म्यानमार म्हणजे ब्रह्मदेशाने ह्या मिसाईल फायर केल्या आहेत. विश्वास न्यूज च्या तपासात हा दावा खोटा असल्याचे लक्षात आले. आम्हाला आमच्या तपासात समजले कि हे चित्र आणि व्हिडिओ ब्रह्मदेशाचे नसून भारताचे असल्याचे विश्वास न्यूज च्या लक्षात आले. हा व्हिडिओ BrahMos supersonic cruise missile च्या मार्च महिन्यात झालेल्या टेस्ट फायरिंग चा आहे. ह्या मिसाईल ला चीन आणि भारताने डेव्हलप केले आहे.
काय होत आहे व्हायरल?
Facebook user, Newwave Bgf Ko Ko ह्यांनी एक व्हिडिओ त्यांच्या अकॉउंट वर पोस्ट केला आणि बर्मिस भाषेत लिहले: ‘BRAHMOS Super Sonic Crusie Missile တစ်စင်း၊ မြန်မာ့တပ်မတော်တွင် စမ်းသပ် ပစ်လွှတ် အောင်မြင်ခဲ့ကြောင်း ဂုဏ်ယူစွာဖြင့် တင်ပြပါရစေ.(ကိုကိုးကျွန်း) crd #Newwave’
मराठी भाषांतर: मला सांगायला अभिमान वाटतो की म्यानमारच्या सैन्यात ब्राह्मोस सुपर सोनिक क्रूसिबल क्षेपणास्त्र यशस्वीपणे प्रक्षेपित करण्यात आले आहे. (कोको बेट) crd #नवीन लहर
हि पोस्ट आणि त्याचा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.
आम्हाला काही अकाउंट्स वर चित्र शेअर केलेले देखील दिसले.
तपास:
विश्वास न्यूज ने सगळ्यात आधी हा व्हिडिओ इन्व्हिड टूल मध्ये टाकून त्याचे स्क्रीनग्रेब घेतले.
त्या स्क्रीनग्रेब वर आम्ही गूगल रिव्हर्स इमेज सर्च चा वापर करून शोधले.
विश्वास न्यूज ला ट्विटर हॅन्डल ‘Mint’ @livemint वर हा व्हिडिओ सापडला, ज्यात लिहले होते कि अंदमान आणि निकोबार बेटांवर #BRAHMOS सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राची पृष्ठभागापासून पृष्ठभागावर यशस्वी चाचणी घेण्यात आली.
आम्हाला हा व्हिडिओ @livefist ‘LiveFist’ ट्विटर हॅन्डल वर देखील सापडला. कॅप्शन होते: अंदमान बेटांवर आजच्या ब्रह्मोस ER लाँचचा एका नागरिकाने घेतलेला व्हिडिओ’
आम्हाला हा व्हिडिओ Defence Squad च्या ट्विटर हॅन्डल वर देखील सापडला.
विश्वास न्यूज ला हे आर्टिकल Frontline च्या वेबसाईट वर सापडले त्याचे हेडलाईन होते: India successfully tests extended range version of BrahMos cruise missile from Andaman and Nicobar Islands
मार्च 24, 2022 रोजी प्रकाशित ह्या आर्टिकल मध्ये लिहले होते, “भारताने 23 मार्च रोजी अंदमान आणि निकोबार बेटांमधील लॉन्च पॅडवरून ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राच्या विस्तारित श्रेणीच्या आवृत्तीची यशस्वी चाचणी केली. प्रक्षेपणाशी संबंधित अधिका-यांनी सांगितले की, “विस्तारित श्रेणीच्या ब्रह्मोस क्षेपणास्त्राने अचूकतेने लक्ष्य गाठले.”
एनडीटीव्ही ने देखील हि बातमी मार्च 24, 2022 रोजी प्रकाशित केली होती आणि त्याचे शीर्षक होते: Extended Range BrahMos Missile Test-Fired, Minister Says “Proud Moment” ह्या लिंक मध्ये देखील हा व्हिडिओ वापरला गेला होता.
किरेन रिजिजू, देशाचे न्याय मंत्री, ह्यांनी देखील हा व्हिडिओ ट्विट केला होता.
आम्ही हे देखील तपासले कि म्यानमार ने कुठले मिसाईल टेस्ट फायर केले आहेत का, आम्हाला त्याच्या अधिकृत बातम्या कुठेच मिळल्या नाही.
तपासाच्या शेवटच्या टप्प्यात, विश्वास न्यूज ने नेशनल सेक्युरिटी अनॅलिस्ट नितीन गोखले, ह्यांना संपर्क केला. त्यांनी सांगितले कि हा व्हिडिओ म्यानमार चा नाही, अंदमान आणि निकोबार चा आहे जेथे भारतीय सशस्त्र दलांनी ब्रह्मोस सुपरसॉनिक विस्तारित श्रेणीच्या सर्फेस टू सर्फेस मारा करणाऱ्या क्रूझ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली.
विश्वास न्यूज ने शेवटच्या टप्प्यात व्हिडिओ शेअर करणाऱ्या प्रोफाइल चा तपास केला, त्यात कळले कि त्यांच्या प्रोफाइल वर जास्ती माहिती नाही आहे पण जास्ती मजकूर बर्मिस भाषेतला आहे.
निष्कर्ष: म्यानमार च्या नावाने व्हायरल होत असलेला व्हिडिओ हा भारतातील BrahMos मिसाईल च्या टेस्ट लाँच चा आहे.
Knowing the truth is your right. If you have a doubt on any news that could impact you, society or the nation, let us know. You can share your doubts and send you news for fact verification on our mail ID contact@vishvasnews.com or whatsapp us on 9205270923