Fact Check: पेट्रोल पंप वर लागलेल्या आगीचा व्हिडिओ हरियाणा चा नाही

विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल दावा खोटा निघाला. हा व्हिडिओ हरताना चा नसून इराण चा आहे. ह्या व्हिडिओ ला भारताचा सांगून व्हायरल करण्यात येत आहे.

विश्वास न्यूज (नवी दिल्ली): सोशल मीडिया वर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात एका मोटरसायकल वर असलेल्या व्यक्ती ला पेट्रोल पंप वर आग लावताना बघितले जाऊ शकते. यूजर दावा करत आहे कि हा व्हिडिओ हरियाणा चा आहे, असा दावा करण्यात येत आहे कि पेट्रोल च्या वाढत्या किमती मुळे एका व्यक्ती ने पेट्रोल पंप ला आग लावली. विश्वास न्यूज च्या तपासात हा दावा खोटा असल्याचे समोर आले. हा व्हिडिओ हरियाणा चा नसून इराण चा आहे, ज्याला भारताचा असल्याचे सांगून व्हायरल करण्यात येत आहे.

काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर Bablu Yadav ने व्हायरल व्हिडिओ शेअर करून लिहले, “हरियाणा में पेट्रोल पम्प फूककर फरार ‍ तेल कि बढ़ती क़ीमत से था परेशान “
या पोस्ट चा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.

तपास:
विश्वास न्यूज ने आपल्या तपासाची सुरुवात इंटरनेट सर्च पासून केली. आम्ही हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला कि आता हरियाणा मध्ये अशी कुठली घटना घडली का. आम्हाला या संबंधी कुठलीच ऑथेंटिक रिपोर्ट मिळाली नाही.

या व्हिडिओ चे स्क्रीनग्रेब्स आणि किवर्डस सोबत रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर आम्हाला हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्राम वर फ्लिपड फॉर्म मध्ये मिळाला. म्हणजे जसा व्हायरल व्हिडिओ मध्ये पेट्रोल पंप डाव्या बाजूला दिसतो, तसाच जुन्या इराण च्या फेसबुक पेज वर अपलोड केलेल्या व्हिडिओ मध्ये पेट्रोल पंप उजव्या बाजूला दिसतो. म्हणजेच हा व्हिडिओ फ्लिप करून व्हायरल केल्या जात आहे.

आता आम्ही खऱ्या व्हिडिओ चे स्क्रीनग्रेब घेऊन परत गूगल सर्च केले. आम्हाला https://www.yjc.news/ ची एक बातमी मिळाली, ज्यात व्हायरल व्हिडिओ चा थम्ब इमेज आम्हाला या व्हिडिओ मध्ये वापरलेला मिळाला. बातमी प्रमाणे हि घटना १० जून ची आहे, जेव्हा एका युवक मध्ये आणि पेट्रोल पंप कार्यकर्त्यांमध्ये भांडण झाल्यानंतर त्या युवकाने पेट्रोल पंपावर आग लावली. आम्हाला या व्हिडिओ चा थंब इमेज काही बातम्यांसोबत इराण च्या न्यूज वेबसाईट वर देखील मिळाला.

अधिक माहिती साठी विश्वास न्यूज ने दैनिक जागरण च्या हरियाणा च्या डिजिटल चे प्रभारी सुनील झा यांना संपर्क केला. त्यांनी आम्हाला सांगितले कि व्हायरल व्हिडिओ मधल्या सारखी कुठलीच घटना हरियाणा मध्ये नाही झाली.

आता आम्ही फेसबुक पोस्ट शेअर करणाऱ्या यूजर ‘Bablu Yadav’ च्या प्रोफाइल ला स्कॅन केले. प्रोफाइल स्कॅन केल्यावर आम्हाला कळले कि यूजर गुजरातच्या सुरत चा रहिवासी आहे.

निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल दावा खोटा निघाला. हा व्हिडिओ हरताना चा नसून इराण चा आहे. ह्या व्हिडिओ ला भारताचा सांगून व्हायरल करण्यात येत आहे.

False
Symbols that define nature of fake news
Know The Truth...

Knowing the truth is your right. If you have a doubt on any news that could impact you, society or the nation, let us know. You can share your doubts and send you news for fact verification on our mail ID contact@vishvasnews.com or whatsapp us on 9205270923

Related Posts
नवीनतम पोस्ट