मुंबईतील एलआयसी कार्यालयात कोब्रा पाहण्याच्या नावाखाली व्हायरल होत असलेली पोस्ट दिशाभूल करणारी असल्याचे सिद्ध झाले. तर बिलासपूरच्या हॉस्पिटलमध्ये कोब्रा पकडल्याचा व्हिडिओ मुंबईसारखा व्हायरल होत आहे.
नवी दिल्ली (विश्वास न्यूज): फेसबुक, व्हाट्सअँप आणि यूट्यूब अशा विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये एका महिलेने कोब्रा साप पकडलेला दिसतो. काही यूजर्स हा व्हिडिओ मुंबईतील लाइफ इन्शुरन्स ऑफ इंडियाच्या कार्यालयाचा असल्याचा दावा करून व्हायरल करत आहेत. विश्वास न्यूजने व्हायरल पोस्टचा तपास केला त्यात आढळले की व्हिडिओचा मुंबईशी काहीही संबंध नाही. मूळ व्हिडिओ छत्तीसगडमधील बिलासपूरचा आहे. हा कोब्रा 28 सप्टेंबर रोजी डॉक्टरांच्या दवाखान्यातून पकडला गेला.
काय होत आहे व्हायरल?
फेसबुक पेज Expressions of Life ने 13 नव्हेंबर रोजी एक वीडियो अपलोड करून दावा केला: ‘Today Morning a Large Cobra Snake was found in the Record Room of the Mumbai Corporate Office of LIC at Santacruz West. A Fire Department Woman caught the Snake and is Displaying it Very Boldly. She obviously knows how to handle the Snake and is Enjoying the Spectacle. Truly Amazing’
अर्थात: आज सकाळी सांताक्रूझ पश्चिम येथील एलआयसीच्या मुंबई कॉर्पोरेट ऑफिसच्या रेकॉर्ड रूममध्ये एक मोठा कोब्रा साप आढळून आला. अग्निशमन विभागाच्या एका महिलेने सापाला पकडले आहे आणि ते अतिशय धैर्याने दाखवत आहे. सापाला कसे हाताळायचे हे तिला स्पष्टपणे माहित आहे आणि ती तमाशाचा आनंद घेत आहे. खरच आश्चर्यकारक
ह्या पोस्ट ला खरे समजून इतर यूजर्स देखील हा शेअर करत आहेत. ह्या पोस्ट चा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.
तपास:
विश्वास न्यूजने मुंबईशी संबंधित व्हायरल व्हिडिओची सत्यता तपासण्यासाठी विविध ऑनलाइन टूल्स चा वापर केला. गुगल रिव्हर्स इमेज टूलमध्ये अपलोड केलेल्या या व्हिडिओच्या मुख्य फ्रेम्स अपलोड करून शोध घेतल्यावर आम्हाला मूळ व्हिडिओ सापडला नाही, परंतु व्हिडिओमध्ये दिसणारा महिलेचा दुसरा व्हिडिओ सापडला.
कमल चौधरी स्नेक रेस्क्यू टीम बिलासपूर नावाच्या यूट्यूब चॅनलवर हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे. आम्हाला या चॅनलवर सापांशी संबंधित अनेक व्हिडिओ सापडले.
तपास पुढे नेत विश्वास न्यूजने बिलासपूर येथील कमल चौधरी ह्यांना संपर्क केला. त्यांनी सांगितले की, व्हायरल व्हिडिओचा मुंबईशी काहीही संबंध नाही. 28 सप्टेंबर रात्री 8 वाजताचा हा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ छत्तीसगडमधील बिलासपूर येथील बुधिया हॉस्पिटलचा आहे.
कमल चौधरी यांनी सांगितले की, व्हिडिओमध्ये दिसत असलेल्या महिलेचे नाव आरती आहे. हे दोघेही अनेक वर्षांपासून हे काम करत आहेत. त्याने आम्हाला बुधिया हॉस्पिटलमध्ये कोब्रा पकडल्याचा आणखी एक अँगल व्हिडिओ देखील दिला. या व्हिडीओमध्ये डॉ. रश्मी बुधिया यांच्या नावाची पाटी पार्श्वभूमीत स्पष्टपणे दिसत आहे.
तपास पुढे नेत विश्वास न्यूजने गुगल मॅपमध्ये बुधिया हॉस्पिटल शोधले आणि आम्हाला या हॉस्पिटलची माहिती मिळाली. डॉ. रश्मी बुधिया या रुग्णालयाशी संबंधित असल्याचे गुगल सर्चमधूनही समोर आले आहे.
तपासाअंती बिलासपूरचा व्हिडीओ मुंबईचा असल्याचा दावा करून व्हायरल करणाऱ्या फेसबुक पेजची चौकशी करण्यात आली. फेसबुक पेज Expressions of Life च्या सोशल स्कॅनिंगमध्ये असे कळले की, त्यावर व्हायरल कन्टेन्ट अपलोड करण्यात येते.
निष्कर्ष: मुंबईतील एलआयसी कार्यालयात कोब्रा पाहण्याच्या नावाखाली व्हायरल होत असलेली पोस्ट दिशाभूल करणारी असल्याचे सिद्ध झाले. तर बिलासपूरच्या हॉस्पिटलमध्ये कोब्रा पकडल्याचा व्हिडिओ मुंबईसारखा व्हायरल होत आहे.
Knowing the truth is your right. If you have a doubt on any news that could impact you, society or the nation, let us know. You can share your doubts and send you news for fact verification on our mail ID contact@vishvasnews.com or whatsapp us on 9205270923