विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल पोस्ट खोटी असल्याचे सिद्ध झाले. प्रियांका गांधी झाडू लावत असल्याच्या ओरिजिनल व्हिडिओ सोबत खोडतोड करून पंजा चिन्ह लावण्यात आले आहे. ओरिजिनल व्हिडिओ मध्ये प्रियांका खोलीत झाडू लावताना दिसतात, काँग्रेस च्या चिन्हावर नाही.
नवी दिल्ली (विश्वास न्यूज): काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी वाद ह्यांचा एक एडिटेड व्हिडिओ व्हायरल होत आहे. ह्यात दावा करण्यात येत आहे कि त्या जमिनीवर बनलेली काँग्रेस ची निशाणी पंजा मिटवत आहेत. सोशल मीडिया वर विविध प्लॅटफॉर्म वर काही लोकं ह्या एडिटेड व्हिडिओ ला व्हायरल करत आहेत. विश्वास न्यूज च्या तपासात कळले कि, प्रियांका नि युपी च्या सीतापुर गेस्ट हाउस मध्ये अटक च्या वेळी खराब झालेल्या खोली मध्ये झाडू मारला. त्यावेळी व्हिडिओ ला कोणी एडिट करून त्यात पंज्याचा निशाण जोडला आहे. विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल व्हिडिओ खोटा असल्याचे समजले.
काय होत आहे व्हायरल?
फेसबुक आणि ट्विटर वर प्रियांका गांधी ह्यांचा एडिटेड व्हिडिओ व्हायरल होत आहे. काही लोक काँग्रेस वर निशाणा देखील साधत आहे. ट्विटर हॅन्डल ऋषि राज शंकर ने 6 ऑक्टोबर रोजी हा व्हिडिओ अपलोड केला आणि लिहले: ‘बेझिझक #झाड़ू आप यूं लगाइए, कांग्रेस देश से #साफ़ करती जाइए, नानी इंतजार तेरा कर रही बहुत! भाई को भी साथ वहां लेके जाइए…✍🏽 कांग्रेस #मुक्त भारत की #ब्रांड एम्बेसडर बनी प्रियंका वाड्रा, क्या करें बेचारा भाई अकेला थक गया था।’
फेसबुक पोस्ट चा कन्टेन्ट इथे जसाच्या तास दिला गेला आहे. ह्या पोस्ट चा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.
तपास:
विश्वास न्यूज ने व्हायरल व्हिडिओ च्या तपासात सत्य जाणून घेण्यासाठी विविध किवर्ड टाईप करून गूगल सर्च केले. आम्हाला बऱ्याच मीडिया प्लॅटफॉर्म्स वर हा व्हिडिओ मिळाला. व्हिडिओ मध्ये स्पष्ट दिसत आहे कि प्रियांका वाद घाण झालेल्या खोलीत झाडू मारत आहेत. संपूर्ण खोलीत कुठेच पंजा चिन्ह दिसत नाही आहे. जागरण डॉट कॉम वर 5 ऑक्टोबर रोजी प्रकाशित झालेली बातमीत सांगितले गेले कि यूपी च्या लखीमपुर खीरी मध्ये जाण्याच्या प्रयासात असलेल्या लखनऊ वरून निघालेल्या प्रियांका गांधी वाद ह्यांना सीतापूर मध्ये अटक करण्यात आली. ह्या वेळी पीएसी द्वितीय वाहिनी च्या गेस्ट हाऊस मध्ये मध्ये एका खोलीत त्यांना ठेवण्यात आले होते. ह्यावेळी त्यांनी खोली झाडू लावला. हि संपूर्ण बातमी इथे वाचा.
आम्हाला तपासादरम्यान हा खरा व्हिडिओ कांग्रेस नेता आचार्य प्रमोद कृष्णम ह्यांच्या ट्विटर हॅन्डल वर देखील मिळाला. 4 ऑक्टोबर रोजी ह्या व्हिडिओ ला शेअर करून आचार्य ह्यांनी लिहले: गिरफ़्तारी के दौरान “हवालात” में झाड़ू लगाती हुई इंदिरा गांधी की पोती और “राक्षसों” का वध करने वाली आदि शक्ति प्रियंका गांधी
ओरिजिनल व्हिडिओ खाली बघा.
तपासादरम्यान आम्हाला ओरिजिनल व्हिडिओ युट्युब वर देखील मिळाला. 4 ऑक्टोबर रोजी अपलोड केलेल्या ह्या बातमीत सांगण्यात आले होते कि यूपी मधील लखीमपुर खीरी मध्ये झालेल्या हिंसेनंतर कांग्रेस महासचिव प्रियंका गांधी वाड्रा, ज्या तिथे भेट घ्यायला आल्या होत्या, त्यांना अटक करण्यात आले.
त्यांना सीतापूर गेस्ट हाऊस मध्ये ठेवण्यात आले होते. तेथील त्यांचा एक व्हिडिओ समोर आला, ज्यात त्या झाडू मारताना दिसतात. संपूर्ण व्हिडिओ इथे बघा.
तपासाच्या पुढच्या टप्प्यात विश्वास न्यूज ने कांग्रेस सोशल मीडिया टीम चे नेशनल को-ऑर्डिनेटर डॉक्टर विपिन यादव ह्यांना संपर्क केला. त्यांच्या सोबत आम्ही व्हायरल व्हिडिओ व्हाट्सअँप वर शेअर केला. त्यांनी संगीतले कि हि पोस्ट पूर्णपणे खोटी आहे.
तपासाच्या शेवटच्या टप्प्यात हा व्हिडिओ शेअर करणाऱ्या यूजर चा तपास केला. त्यात कळले कि ऋषि राज शंकर हा ट्विटर अकाउंट जुलै 2021 मध्ये बनवण्यात आला. त्याला 1492 लोकं फॉलो करतात. यूजर एका विशिष्ट विचारधारेचा आहे.
निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल पोस्ट खोटी असल्याचे सिद्ध झाले. प्रियांका गांधी झाडू लावत असल्याच्या ओरिजिनल व्हिडिओ सोबत खोडतोड करून पंजा चिन्ह लावण्यात आले आहे. ओरिजिनल व्हिडिओ मध्ये प्रियांका खोलीत झाडू लावताना दिसतात, काँग्रेस च्या चिन्हावर नाही.
Knowing the truth is your right. If you have a doubt on any news that could impact you, society or the nation, let us know. You can share your doubts and send you news for fact verification on our mail ID contact@vishvasnews.com or whatsapp us on 9205270923