Fact Check: मध्यप्रदेशात कोविड – 19 च्या दरम्यान पोलिसांनी तरुणाला बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ दिशाभूल करणाऱ्या दाव्यासह व्हायरल
विश्वास न्यूजला त्यांच्या तपासणीत असे आढळले की, व्हायरल व्हिडिओ हा, मध्य प्रदेशातील छिंदवाडाचा आहे. तरुणाला मारहाण करणाऱ्या दोन्ही पोलिसांवर कारवाई करण्यात आली होती. आता हा जुना व्हिडिओ दिशाभूल करणाऱ्या दाव्यासह शेअर केला जात आहे.
- By: Umam Noor
- Published: Jun 15, 2024 at 05:42 PM
- Updated: Jun 25, 2024 at 12:53 PM
नवी दिल्ली (विश्वास न्यूज). सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये काही पोलीस एका तरुणाला निर्घृणपणे मारहाण करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ शेअर करताना वापरकर्ते असा दावा करत आहेत की, हे प्रकरण नुकतेच समोर आले आहे आणि हा व्हिडिओ इतका शेअर केला गेला पाहिजे की, जेणेकरून तो सरकारपर्यंत पोहोचू शकेल आणि या प्रकरणावर कार्यवाही होऊ शकेल.
विश्वास न्यूजने केलेल्या त्यांच्या तपासात हा व्हिडिओ 2020 सालातील मध्य प्रदेशातील छिंदवाड्यातील असल्याचे समोर आले आहे. तरुणाला मारहाण करणाऱ्या दोन्ही पोलिसांवर कारवाई करण्यात आली होती. आता हा जुना व्हिडिओ चुकीच्या दाव्यासह शेअर केला जात आहे.
काय आहे व्हायरल पोस्टमध्ये?
फेसबुक वापरकर्त्याने ही पोस्ट शेअर करत लिहिले आहे की, “देशातील रक्षकांची स्थिती पहा.”
पोस्टची संग्रहित आवृत्ती येथे पहा.
तपास
आमचा तपास सुरू केल्यावर आम्ही सर्वप्रथम व्हायरल व्हिडिओचे कीफ्रेम काढले आणि गूगल लेन्सद्वारे त्यांचा शोध घेतला. 23 मे 2020 रोजी एक्स हँडलवर अपलोड केलेला हा व्हिडिओ आम्हाला सापडला, येथे दिलेल्या माहितीनुसार, हे प्रकरण मध्य प्रदेशातील छिंदवाडाचे आहे.
या आधारावर आम्ही आमचा तपास सुरू केला आणि आम्हाला इंडियन एक्स्प्रेसच्या बातम्यांमध्ये या व्हिडिओचा स्क्रीनग्रॅब मिळाला. मध्य प्रदेशातील छिंदवाड्यापासून सुमारे 70 किमी अंतरावर असलेल्या पिपल्यानारायणवार गावात हे प्रकरण उघडकीस आले, जिथे एका बँकेच्या बाहेर गडबड निर्माण केल्याबद्दल पोलिसांनी एका 35 वर्षीय व्यक्तीला मारहाण केली. या हल्ल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आठ दिवसांनी दोन पोलिसांना निलंबित करण्यात आले असून त्यांच्याविरोधात विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे.
बिझनेस स्टँडर्डच्या म्हणण्यानुसार, क्रूर मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लगेचच, मध्य प्रदेश पोलिसांनी दोन्ही पोलिसांच्या विरुद्ध प्रत्युत्तरादाखल कारवाईत कॉन्स्टेबल कृष्णा डोंगरे आणि कॉन्स्टेबल आशिष यांना फील्ड ड्युटीवरून हटविले किंवा “लाइन हजर” केले. अतिरिक्त पोलिस अधीक्षक (एएसपी) शशांक गर्ग म्हणाले, “एक मद्यधुंद माणूस गोंधळ घालत होता आणि दोन पोलिसांनी त्याच्याविरुद्ध बळाचा वापर केला.” ते म्हणाले की, पोलिस उपविभागीय अधिकारी (एसडीओपी) या प्रकरणाची चौकशी करतील, ज्याच्या आधारावर पुढील कारवाई केली जाईल.
त्याचवेळी, हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, ‘मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव छिंदवाडा शहरातील पिपल्यानारायणवार येथील राजमिस्त्री नानू असे आहे. 30 वर्षीय व्यक्तीला 10 दिवसांहून अधिक काळापूर्वी मारहाण करण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, दोन्ही कॉन्स्टेबलना निलंबित करण्यात आले असून चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.’
व्हायरल पोस्टशी संबंधित पुष्टीकरणासाठी, आम्ही आमचे सहकारी नई दुनियाचे छिंदवाडाचे ब्युरो चीफ आशिष मिश्रा यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांच्यासोबत व्हायरल पोस्ट शेअर केली. त्यांनी आम्हाला पुष्टी केली की, हा व्हिडिओ मध्य प्रदेशातील एक जुने प्रकरण आहे.
दिशाभूल करणाऱ्या पोस्ट शेअर करणाऱ्या फेसबुक वापरकर्त्यांच्या सोशल स्कॅनिंगमध्ये आम्हाला आढळले की, या वापरकर्त्याला 16 हजार लोक फॉलो करतात.
निष्कर्ष: विश्वास न्यूजला त्यांच्या तपासणीत असे आढळले की, व्हायरल व्हिडिओ हा, मध्य प्रदेशातील छिंदवाडाचा आहे. तरुणाला मारहाण करणाऱ्या दोन्ही पोलिसांवर कारवाई करण्यात आली होती. आता हा जुना व्हिडिओ दिशाभूल करणाऱ्या दाव्यासह शेअर केला जात आहे.
- Claim Review : पोलिसांकडून एका तरुणाला मारहाण केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे.
- Claimed By : FB User- Mohd Ashfaq
- Fact Check : Misleading
Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!
Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.