Fact Check: PIA प्लेन चा जुना कराची च्या पुरस्तिथीतला व्हिडिओ आताचा सांगून व्हायरल

कराची एअरपोर्ट च्या रनवे वर पीआयए चा प्लेन उतरल्याचा व्हिडिओ जो आताचा सांगून व्हायरल होत आहे तो ऑगस्ट 2020 चा आहे. व्हायरल दावा दिशाभूल करणारा आहे.

Fact Check: PIA प्लेन चा जुना कराची च्या पुरस्तिथीतला व्हिडिओ आताचा सांगून व्हायरल

विश्वास न्यूज (नवी दिल्ली): विश्वास न्यूज ला एका पुरस्तिथीत एरोप्लेन लँडिंग चा व्हिडिओ सोशल मीडिया वर व्हायरल होत असताना दिसला. दावा करण्यात येत आहे कि हा व्हिडिओ आताचा आहे. बरेच यूजर्स हा व्हिडिओ शेअर करत आहेत. विश्वास न्यूज च्या तपासात हा दावा दिशाभूल करणारा असल्याचे कळले. हा व्हिडिओ २०२० सालचा आहे.

काय होत आहे व्हायरल?

फेसबुक यूजर ZK Productions नि व्हायरल व्हिडिओ शेअर केला आणि लिहले: live from Karachi airport

हा पोस्ट आणि आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.

हा व्हिडिओ पाकिस्तानी राजकारणी आणि पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफचे ज्येष्ठ सदस्य फवाद चौधरी यांनीही या ट्विटर प्रोफाइलवर शेअर केला आहे.

काही यूजर्स ने ह्या व्हिडिओ चा स्क्रीनग्रॅब देखील शेअर केला.

Times of Islamabad, ह्या फेसबुक पेज ने देखील हा व्हिडिओ शेअर केला आणि लिहले: PIA plane landing at an inundated Runway at Karachi Airport goes viral on social media

तपास:

विश्वास न्यूज ला असे खुपसारे कमेंट्स फेसबुक आणि ट्विटर वर शेअर केलेल्या व्हिडिओ मध्ये सापडले, ज्यात सांगण्यात येत होते कि हा व्हिडिओ जुना आहे.

आम्ही त्यानंतर हा व्हिडिओ इन्व्हिड टूल मध्ये मिळालेल्या किफ्रेम्स द्वारे शोधला.

आम्ही यांडेक्स ची देखील ह्या तपासासाठी मदत घेतली. आम्हाला त्यात फेसबुक पेज AIRLIVE.net वर हा व्हिडिओ सापडला.
हा व्हिडिओ 28th ऑगस्ट, 2020 रोजी शेअर करण्यात आला होता. ह्याचाच अर्थ, हा व्हिडिओ जुना आहे.
कॅप्शन मध्ये लिहले होते: Karachi airport flooded. This PIA A320 was the last aircraft before the airport stopped operations.

आम्हाला Pakistan Civil Aviation Authority चे अधिकृत ट्विटर हॅन्डल आणि त्यावर केलेले पोस्ट देखील मिळाले.

ह्या मध्ये म्हंटल्याप्रमाणे हा व्हिडिओ जुना आहे.

किवर्डस द्वारे शोधल्यावर विश्वास न्यूज ला एक 24 News HD नावाच्या युट्युब चॅनेल वर अपलोड केलेला सापडला. ह्या चॅनेल चे 6.54 मिलियन स्बस्क्राइबर्स आहेत.

कॅप्शन मध्ये लिहले होते: Exclusive!! PIA Plane Emergency Landing On Water At Airport In Floods

आता हे स्पष्ट झाले होते कि हा व्हिडिओ ऑगस्ट 27, 2020.

तपासाच्या पुढच्या टप्प्यात आम्ही डॉन न्यूज, पाकिस्तानमधील पत्रकार सागर सुहिंदरो यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी विश्वास न्यूजला सांगितले की, हा व्हिडिओ अलीकडचा नाही. 2020 साली पीआयएचे प्लेन कराचीच्या रनवेवर उतरले. हा व्हिडिओ तेव्हाचा आहे.

तपासाच्या शेवटच्या टप्प्यात, आम्ही ZK Productions पेज चा तपास केला. त्या पेज ला १२४ लोक लाईक करतात आणि १४७ लोक फॉलो करतात. ह्या पेज वर पाकिस्तान चा मजकूर जास्ती असतो.

निष्कर्ष: कराची एअरपोर्ट च्या रनवे वर पीआयए चा प्लेन उतरल्याचा व्हिडिओ जो आताचा सांगून व्हायरल होत आहे तो ऑगस्ट 2020 चा आहे. व्हायरल दावा दिशाभूल करणारा आहे.

Misleading
Symbols that define nature of fake news
Know The Truth...

Knowing the truth is your right. If you have a doubt on any news that could impact you, society or the nation, let us know. You can share your doubts and send you news for fact verification on our mail ID contact@vishvasnews.com or whatsapp us on 9205270923

Related Posts
नवीनतम पोस्ट