प्लॅटफॉर्म वर गरबा करणाऱ्या यात्रयांचा व्हायरल व्हिडिओ गुजरात चा नाही, जालंधर कैंट रेल्वे स्टेशन चा आहे. शेतकऱ्यांनी रेल रोको आंदोलन च्या वेळी कटरा जाणाऱ्या ट्रेन ला जालंधर कैंट स्टेशन वर थांबवले, ते केले असता गुजरात च्या यात्रिगणने वेळ घालवायला गरबा केला.
विश्वास न्यूज (नवी दिल्ली): सोशल मीडिया वर गरबा करताना काही रेल्वे यात्रींचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. एका पोस्ट मध्ये दावा करण्यात येत आहे कि हा व्हिडिओ रेल रोको आंदोलन च्या वेळी गुजरात चा आहे.
विश्वास न्यूज च्या तपासात हा दावा भ्रामक असल्याचे कळले. हा दावा बरोबर आहे कि हा व्हिडिओ १८ फेब्रुवारी २०२१ च्या शेतकरी प्रदर्शन च्या रेल रोको आंदोलन चा आहे, पण गरबा गुजरात चा नाही, जालंधर कैंट रेलवे स्टेशन वर केला गेला. हे यात्री गुजरात वरून कटरा येथे जात होते आणि जेव्हा जालंधर येथे ट्रेन थांबली तेव्हा वेळ घालवण्यासाठी त्यांनी गरबा नृत्य केले.
काय होत आहे व्हायरल?
Vijay Patel नावाच्या एका ट्विटर हॅन्डल ने व्हायरल व्हिडिओ ट्विट करून लिहले, “कॉमरेड और कांग्रेस के रेल रोको आंदोलन के दौरान गुजरात में गरबा खेलते लोग। हम गुजराती कहीं भी गरबा खेल सकते हैं।”
या पोस्ट चा आर्काइव्ह व्हर्जन तुम्ही इथे बघा.
तपास:
विश्वास न्यूज ने सगळ्यात आधी व्हायरल व्हिडिओ ला निरखून बघितले. या व्हिडिओ वर न्यूज १८ चा लोगो लागला आहे. ह्या व्हिडिओ ला गुजरात चा सांगून ट्विट करणाऱ्या यूजर ने न्यूज 18 गुजराती ट्विटर हैंडल ला देखील टॅग केले आहे. या माहितीच्या आधारावर आणि काही कीवर्डस वापरून आम्ही या व्हिडिओ ला इंटरनेट वर सर्च केले. आम्हाला न्यूज 18 उर्दू च्या अधिकृत युट्युब चॅनेल वर हा व्हायरल व्हिडिओ मिळाला. हा व्हिडिओ १८ फेब्रुवारी २०२१ रोजी अपलोड करण्यात आला होता. इंग्रजी आणि उर्दू मध्ये अशी माहिती देण्यात आली होती कि हा व्हिडिओ जालंधर रेल्वे स्टेशन चा आहे. व्हिडिओ च्या डिस्क्रिप्शन मध्ये दिल्या गेल्याप्रमाणे शेतकऱ्यांनी १८ फेब्रुवारी रोजी रेल रोको आंदोलन केले होते, ज्यात दुपारी १२ ते संध्याकाळी ६ रेल थांबवण्याचे आव्हान करण्यात आले होते. या दरम्यान जालंधर मध्ये जेव्हा ट्रेन थांबली तेव्हा गुजराती यात्री हे गरबा खेळण्यात मग्न झाले. हा व्हिडिओ तुम्ही खाली बघू शकता.
आम्हाला न्यूज 18 गुजराती च्या अधिकृत ट्विटर हॅन्डल वर देखील हा व्हिडिओ मिळाला. १८ फेब्रुवारी २०२१ रोजी हा व्हिडिओ ट्विट करून गुजराती मध्ये एक माजकरू लिहण्यात आला होता. गूगल ट्रान्सलेट ने याचा अनुवाद केल्यास समजले: शेतकऱ्यांचे रेल रोको आंदोलन: जालंधर रेल्वे स्टेशन वर गुजराती यात्रींनीं गरबा केला.
हा ट्विट तुम्ही खाली बघू शकता.
विश्वास न्यूज ने तपासाच्या पुढच्या टप्प्यात, आमचे सहयोगी पंजाबी जागरण चे जालंधर डिस्ट्रिक्ट इंचार्ज जतिंदर पम्मी यांना संपर्क केला. त्यांनी आम्हाला सांगितले कि हा व्हिडिओ जालंधर कॅट रेल्वे स्टेशन चा आहे. त्यांच्या प्रमाणे, शेतकऱ्यांनी जामनगर वरून कटरा जाणाऱ्या ट्रेन ला थांबवले होते, म्हणून लोकांनी वेळ घालवण्यासाठी प्लॅटफॉर्म वर गरबा केला.
विश्वास न्यूज ने व्हायरल दावा शेअर करणाऱ्या ट्विटर यूजर Vijay Patel चे प्रोफाइल तपासल्यावर कळले कि ते गुजरात चे रहिवासी आहेत आणि त्यांचे २६ हजार पेक्षा जास्ती फॉलोवर्स आहेत.
निष्कर्ष: प्लॅटफॉर्म वर गरबा करणाऱ्या यात्रयांचा व्हायरल व्हिडिओ गुजरात चा नाही, जालंधर कैंट रेल्वे स्टेशन चा आहे. शेतकऱ्यांनी रेल रोको आंदोलन च्या वेळी कटरा जाणाऱ्या ट्रेन ला जालंधर कैंट स्टेशन वर थांबवले, ते केले असता गुजरात च्या यात्रिगणने वेळ घालवायला गरबा केला.
Knowing the truth is your right. If you have a doubt on any news that could impact you, society or the nation, let us know. You can share your doubts and send you news for fact verification on our mail ID contact@vishvasnews.com or whatsapp us on 9205270923