राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी दलित आयएएस ऑफिसर ला नाही ठार मारले. व्हायरल होत असलेला व्हिडिओ जुगार डेन किंगपिन बाल्या बिनेकर च्या हत्येचा आहे.
नवी दिल्ली (विश्वास न्यूज): विश्वास न्यूज ला नुकतीच एक व्हिडिओ क्लिप सोशल मीडिया वर सापडली, हि क्लिप एका हत्येचं CCTV फुटेज असल्याचे बघितले जाऊ शकते. सप्टेंबर २०२० साल पासून हा व्हिडिओ सोशल मीडिया वेबसाइट्स, खासकरून फेसबुक वर व्हायरल झाल्याचे बघितले जाऊ शकते. या व्हिडिओ सोबत दावा केला जात आहे कि, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी एका दलित आयएएस ऑफिसर ची हत्या केली. यात पुढे असे देखील म्हंटले आहे कि त्यांच्या १६ मुलीचे बलात्कार देखील करण्यात आले.
विश्वास न्यूज च्या तपासात हा दावा खोटा असल्याचे समजले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ च्या कार्यकर्त्यांनी एका दलित आयएएस ऑफिसर चे खून केले नाही.
काय होत आहे व्हायरल?
विश्वास न्यूज ला Sunyd Hassan यांनी फेसबुक वर सप्टेंबर २९, २०२० रोजी शेअर केलेला एक व्हिडिओ आढळला. या व्हिडिओ सोबत मल्याळम मध्ये मजकूर शेअर करण्यात आला आहे. “നാഗപ്പൂരിൽ RSS പ്രവർത്തകർ ദളിത് IAS ഓഫീസറെ പരസ്യമായി വെട്ടിയും കുത്തിയും കൊലപ്പെടുത്തുന്നു . അദ്ദേഹത്തിന്റെ 16 വയസ്സുകാരി മകളെ കാറിൽ കൂട്ടാബലാത്സംഗം ചെയ്യുന്ന ഭീകര കാഴ്ചകൾ ഇതുപോലെ കേരളമാക്കി തീർക്കാനാണ് ലീഗ് കോൺഗ്രസ്സ് ബീജെപി ശക്യം രൂപീകരിക്കുന്നത് സുഹൃത്തുക്കളെ ഒരു വോട്ടുപോലും ഈ കള്ളനാറികൾക്ക് ഇട്ട് പോകരുത്”
आम्ही गूगल ट्रान्सलेट चा वापर करून याचा नेमका अर्थ काय हे जाणून घेतले: नागपुरात आरएसएस कार्यकर्त्यांनी दलित आयएएस अधिकाऱ्याला दिवसाढवळ्या सगळ्यांसमोर ठार मारले. सोळा वर्षाच्या त्यांच्या मुलीवर देखील अतिप्रसंग केला गेला. केरळ सारख्याच घटना आता काँग्रेस आणि भाजप शासित राज्यात होत आहेत.
या पोस्ट चा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.
तपास:
विश्वास न्यूज ने आपल्या तपासाची सुरुवात साध्या कीवर्ड सर्च ने केला. हा नागपूर चा व्हिडिओ असल्याचा दावा करण्यात येत होता आणि म्हणूनच आम्ही नागपूर मध्ये हत्येच्या कोणत्या घटना CCTV मध्ये रेकॉर्ड केल्या गेल्या ते तपासले.
विश्वास न्यूज ला नागपूर टुडे नावाच्या एका वेबसाईट वर एक बातमी सापडली, “Live Video: Gambling den owner, Kishor Binekar killed in broad day light in Nagpur.“
या बातमीत व्हायरल व्हिडिओ चा वापर केला गेला आहे.
तसेच आम्हाला नागपूरच्याच एका पोर्टल वर, ‘द लाईव्ह नागपूर’ वर सप्टेंबर २६, २०२० रोजी अपलोड केलेली एक बातमी सापडली. बातमीत लिहले होते (अनुवादित), “जुगार डेनचे मालक बाल्य बिनेकर यांची हत्या. ” अहवालात म्हटले आहे की, “भोळे पेट्रोल पंप येथे पाच जणांनी एका व्यक्तीला दिवसाढवळ्या ठार मारले. आणि नंतर आपल्या मोटरसायकलवरून घटनास्थळावरून फरार झाले,” या वेबसाईटने देखील व्हायरल व्हिडिओ चा वापर केला आहे.
तसेच आम्हाला या बातमीची पुढील हालचाल देखील कळली. नागपूर टुडे या वेबसाईट वर २७ सप्टेंबर, २०२० रोजी एक बातमी अपलोड केली गेली, त्यात सांगितले होते कि बाल्या बिनेकर यांच्या हत्येप्रकरणी ४ जणांना पकडले गेले.
बातमीत दिल्याप्रमाणे मुख्य आरोपी चेतन हजारे, रजत थांबे, भारत पंडित यांना रामटेक मधून अटक करण्यात आली. तसेच चेतन हजारे या मुख्य आरोपीने आपल्या वडिलांच्या मृत्यूचा सूड उगवण्यासाठी हि हत्या केल्याचे समजले.
विश्वास न्यूज ने आपला तपास ट्विटर वर कीवर्ड सर्च द्वारे सुरु ठेवला. आम्हला नागपूर च्या या हत्येप्रकरणी बऱ्याच बातम्या मिळाल्या.
आम्हाला ANI च्या अधिकृत ट्विटर हॅन्डल वर केलेले एक ट्विट सापडले. त्यात लिहले होते:
तपासाच्या शेवटच्या टप्प्यात विश्वास न्यूज ने नागपूर चे ANI चे ब्युरो चीफ, सौरभ जोशी यांच्यासोबत संपर्क केला. त्यांनी सांगितले कि व्हायरल झालेले CCTV फुटेज नागपूर चे आहे. हि घटना सप्टेंबर मध्ये झाली होती, यात कुख्यात किशोर (बाल्या) बिनेकर यांची क्रूर हत्या करण्यात आली होती. हत्येचे ठिकाण हे गृह मंत्री अनिल देशमुख यांच्या घरापासून एक किलोमीटर च्या अंतरावर होते. या घटनेतील मुख्य आरोपी हा बीनेकर यांनी २००१ साली हत्या केलेल्या व्यक्तीचा मुलगा आहे. बिनेकर जुगार अड्डा चालवायचे आणि त्यांच्यावर बरेच गुन्हे दाखल आहे. या घटनेत कुठल्याच दलित आयएएस चा खून केला गेला नाही तसेच या घटनेत कुठल्याच मुलीचा रेप देखील झालेला नाही.
विश्वास न्यूज ने त्या फेसबुक यूजर चा तपास केला ज्यांनी खोट्या दाव्यासह हा व्हिडिओ शेअर केला. Sunyd Hassan हे कन्नूर चे रहिवासी आहेत. या व्हिडिओ ला हजार पेक्षा जास्ती व्यू आहेत.
निष्कर्ष: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी दलित आयएएस ऑफिसर ला नाही ठार मारले. व्हायरल होत असलेला व्हिडिओ जुगार डेन किंगपिन बाल्या बिनेकर च्या हत्येचा आहे.
Knowing the truth is your right. If you have a doubt on any news that could impact you, society or the nation, let us know. You can share your doubts and send you news for fact verification on our mail ID contact@vishvasnews.com or whatsapp us on 9205270923