विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल व्हिडिओ दिशाभूल करणारा ठरला. मध्यप्रदेशच्या सागर मध्ये झालेला एक्सीडेंट चा व्हिडिओ काही लोक महाराष्ट्राचा समजून व्हायरल करत आहे.
नवी दिल्ली (विश्वास न्यूज): सोशल मीडिया वर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात एक अनियंत्रित ट्रक खूप साऱ्या वाहनांना चिरडून रेल्वे गेट तोडून निघून जाताना दिसतो. काही यूजर्स कडून असा दावा करण्यात येत आहे कि हा व्हिडिओ, लासल गांव गेट (नासिक, महाराष्ट्र) इथला आहे.
युट्युब वर अपलोड केलेल्या या व्हिडिओचा विश्वास न्यूज ने तपास केला, त्यात आम्हाला असे कळले कि हा व्हिडिओ काही दिवसांपूर्वी झालेल्या मध्य प्रदेश च्या सागर जिल्ह्यातला ऍक्सिडेंट चा व्हिडिओ आहे. इंटरनेट वर काही लोक याला महाराष्ट्राचा सांगून व्हायरल करत आहेत. विश्वास न्यूज च्या तपासात, यूजर्स ने केलेला दावा खोटा ठरला.
काय होत आहे व्हायरल?
ऍक्सिडेंट चा एक व्हिडिओ ‘Vaibhav Pawar /motha mahadev’ नावाच्या एका यूट्यूब चैनल वर अपलोड केला आहे त्यात असा दावा करण्यात येत आहे कि व्हिडिओ महाराष्ट्रात झालेल्या घटनेचा आहे. अपलोड केलेल्या व्हिडिओमध्ये दावा केला आहे: ‘लासलगाव गेट पर बड़ी घटना accidentअनजान की मौत accident bus vs pickup accident treatment at hospital’
व्हिडिओ ९ सप्टेंबर रोजी अपलोड केला गेला होता, या पोस्ट चा अर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.
तपास:
विश्वास न्यूज ने आधी शेअर केलेल्या व्हिडिओ ला नीट निरखून बघितले, त्यात एक अनियंत्रित ट्रक एका महिलेला टक्कर देऊन रेल्वे गेट तोडून निघून जाताना दिसतो. विश्वास न्यूज ने व्हायरल व्हिडिओ चे खुप सारे स्क्रीन ग्रॅब घेतले आणि नंतर त्यांना गूगल रिव्हर्स इमेज सर्च मध्ये सर्च केले. आम्हाला नवभारत टाइम्स च्या वेबसाईट वर एक व्हिडिओ न्यूज मिळाली. आम्हाला या बातमीत तोच व्हिडिओ सापडला व्हायरल होत आहे. या बातमीत सांगितले गेले आहे कि, हि घटना मध्यप्रदेशच्या सागर मध्ये खुरई-सागर रोड वर ठाकुरबाबा जरुआखेड़ा च्या रेलवे गेट नंबर 11 ची आहे. हि बातमी ३ सप्टेंबर २०२० रोजी पब्लिश करण्यात आली होती.
तपास करताना पुढे आम्ही गूगल रिव्हर्स इमेज सर्च ची मदत घेतली, संबंधित कीवर्ड सर्च मध्ये आमहाला, नईदुनिया और दैनिक भास्कर च्या वेबसाईट वर बातम्या मिळाल्या. नईदुनिया ने ४ सप्टेंबर रोजी प्रकाशित केलेल्या बातमीत सांगितले कि सागर-बीना रोड रेलवे गेट नंबर 11 वर एक ट्रक अनियंत्रित हुन बंद रेल्वे फाटक तोडले आणि एका महिलेला चिरडून काही वाहनांना धडक दिली. या घटनेत नफीसा नामक महिलेचा मृत्यू झाला. हि पूर्ण बातमी इथे वाचा.
तपासात पुढे आम्ही सागर स्थित नईदुनिया ब्यूरो चीफ ओम द्विवेदी, यांच्या सोबत संपर्क केला त्यांनी हे सांगितले कि हि घटना ३ सप्टेंबर ची, सागर मधली आहे.
निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल व्हिडिओ दिशाभूल करणारा ठरला. मध्यप्रदेशच्या सागर मध्ये झालेला एक्सीडेंट चा व्हिडिओ काही लोक महाराष्ट्राचा समजून व्हायरल करत आहे.
Knowing the truth is your right. If you have a doubt on any news that could impact you, society or the nation, let us know. You can share your doubts and send you news for fact verification on our mail ID contact@vishvasnews.com or whatsapp us on 9205270923