Fact Check: हा नुकत्याच झालेल्या महाविकास आघाडी मोर्चा चा व्हिडिओ नसून मराठा क्रांती मोर्चाचा व्हिडिओ आहे

फ्लायओव्हरवर गर्दी असलेल्या मार्चचा व्हायरल व्हिडिओ अलीकडील MVA रॅलीचा नाही तर पाच वर्षांपूर्वीच्या मराठा क्रांती मोर्चाचा आहे.

Fact Check: हा नुकत्याच झालेल्या महाविकास आघाडी मोर्चा चा व्हिडिओ नसून मराठा क्रांती मोर्चाचा व्हिडिओ आहे

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): महाराष्ट्रातील विरोधी पक्षांनी नुकत्याच केलेल्या ताकदीच्या प्रदर्शनात, महाविकास आघाडी (MVA) पक्षानी एकनाथ शिंदे-भाजप सरकारच्या विरोधात ‘हल्ला बोल’ मोर्चा काढला आणि छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्याबद्दल राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना हटवण्याची मागणी केली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या रॅलीला ‘नॅनो मोर्चा’ असे म्हंटले.
या शब्दयुद्धादरम्यान विश्वास न्यूजला एक व्हिडिओ विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर शेअर होत असल्याचा समोर आला. दावा करण्यात येत होता कि हा व्हिडिओ एमव्हीए रॅलीचा आहे. विश्वास न्यूजच्या तपासात हा व्हिडिओ पाच वर्षांहून जुना आणि मराठा क्रांती मोर्चाचा असल्याचे समोर आले.

काय होत आहे व्हायरल?

फेसबुक यूजर Jilani Sheik ने व्हायरल व्हिडिओ शेअर केला आणि मराठीत लिहले:

देवेंद्र फडणवीस ज्यास नॅनो मोर्चा म्हणून हिणवत आहेत तो हाच!
महाराष्ट्र प्रेमी जनतेचा बुलंद आवाज.
देवेंद्र जी..हे वागणे बरे नाही.
जय महाराष्ट्र!

हि पोस्ट आणि त्याचा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.

शिव सेना नेते संजय राऊत ह्यांनी देखील हा व्हिडिओ आपल्या ट्विटर प्रोफाइल वर शेअर केला.

बाकी यूजर्स देखील हा दावा करत, व्हायरल व्हिडिओ शेअर करत आहेत.

तपास:

विश्वास न्यूजने व्हिडिओचे काळजीपूर्वक निरीक्षण करून आणि शेअर केलेल्या पोस्टवरील कमेंट्स वाचून तपास सुरू केला. अनेकांनी हा मराठा क्रांती मोर्चाचा व्हिडिओ असल्याचे लिहले होते.

आम्हाला हा व्हिडिओ Abhinay Kohale या फेसबुक यूजर ने शेअर केलेला आढळला. या यूजर ने 9 ऑगस्ट, 2017 रोजी हा व्हिडिओ शेअर करून लिहले कि हा व्हिडिओ मराठा क्रांती मोर्चा चा असून जे जे फ्लायओव्हर चा आहे.

आम्हाला TOI Plus च्या अधिकृत ट्विटर हँडलवर एक असाच व्हिडिओ सापडला. हा व्हिडिओ 9 ऑगस्ट 2017 रोजी पोस्ट करण्यात आला असून तो मराठा क्रांती मोर्चाचा असल्याचे सांगण्यात आले.

हा व्हिडिओ मराठा क्रांती मोर्चाचा असल्याचे आता स्पष्ट झाले होते.

तपासाच्या पुढच्या टप्प्यात, आम्ही महाराष्ट्र टाइम्स, मुंबईचे पत्रकार सौरभ शर्मा यांना संपर्क केला. त्यांनी मराठा क्रांती मोर्चा कव्हर केला होता. आम्ही त्यांना व्हायरल व्हिडिओ आणि दावा पाठवला. शर्मा यांनी आम्हाला सांगितले की हा व्हिडिओ मराठा क्रांती मोर्चाचा आहे आणि अलीकडील MVA रॅलीचा नाही.

तपासाच्या पुढच्या टप्प्यात आम्ही MVA रॅलीचे कोणते व्हिडिओ सापडतात का ते तपासले. ‘मिडडे इंडिया’च्या यूट्यूब चॅनेलवर आम्हाला एक व्हिडिओ सापडला.

Jagran.com ने देखील या व्हिडिओची सत्यता तपासली होती. ते इथे वाचा.

तपासाच्या शेवटच्या टप्प्यात आम्ही व्हायरल व्हिडिओ शेअर करणाऱ्या यूजरचे आम्ही सोशल बॅकग्राउंड चेक केले. Jilani Sheik मुंबई चे रहिवासी आहेत.

निष्कर्ष: फ्लायओव्हरवर गर्दी असलेल्या मार्चचा व्हायरल व्हिडिओ अलीकडील MVA रॅलीचा नाही तर पाच वर्षांपूर्वीच्या मराठा क्रांती मोर्चाचा आहे.

Misleading
Symbols that define nature of fake news
Know The Truth...

Knowing the truth is your right. If you have a doubt on any news that could impact you, society or the nation, let us know. You can share your doubts and send you news for fact verification on our mail ID contact@vishvasnews.com or whatsapp us on 9205270923

Related Posts
नवीनतम पोस्ट