विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल पोस्ट मध्ये केलेला दावा खोटा असल्याचे समजले. तपासात कळले कि महाराष्ट्रातील अमरावतीच्या परतवाड़ा बस स्टैंड वर झालेल्या एका मोक ड्रिल चा व्हिडिओ खरे समजून काही लोकं ह्याला व्हायरल करत आहेत.
नवी दिल्ली (विश्वास न्यूज): सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 2:54 मिनिटांच्या या व्हिडिओमध्ये अनेक सैनिक दिसत आहेत. हे लोक दोन लोकांना बसमधून उतरवताना दिसतात. हा व्हिडिओ व्हायरल करताना युजर्स दावा करत आहेत की महाराष्ट्रात दोन दहशतवादी पकडले गेले आहेत. विश्वास न्यूजने व्हायरल पोस्टच्या दाव्याची सखोल चौकशी केली. अमरावतीच्या परतवाडा बसस्थानकावर झालेल्या मॉक ड्रीलचा व्हिडिओ काही लोक खरी घटना म्हणून व्हायरल करत असल्याचे आम्हाला समजले. आमच्या तपासणीत, व्हायरल पोस्ट बनावट असल्याचे निष्पन्न झाले.
काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर Yogesh Pashine ने 23 ऑक्टोबर रोजी एक व्हिडिओ अपलोड केला ज्यासोबत दावा करण्यात येत होता कि: ‘महाराष्ट्र के अमरावती (परतवाड़ा) मे दो आतंकवादी पकडे गये। ये बस मे बम ले कर जा रहे थे। अब सवाल या है कि पुलवामा में विस्फोटक कहा से आया पूछने वालों अब क्या पूछोंगे ।🤔🤔 आपको बता दु महाराष्ट्र में शिवसेना की एनसीपी और कांग्रेस के समर्थन की सरकार है।’
फेसबुक पोस्ट चा कन्टेन्ट इथे जसाच्या तास बघा. व्हिडिओ खरा समजून लोकं त्याला व्हायरल करत आहेत. ह्या पोस्ट चा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.
तपास:
विश्वास न्यूज ने व्हायरल पोस्ट चा तपास व्हायरल व्हिडिओ ची सोशल स्कॅनिंग करण्यापासून केली . आम्हाला व्हिडिओ पाहताच कळले कि हा व्हिडिओ नक्कीच कुठल्या मोक ड्रिल चा आहे. ह्या नंतर आम्ही संबंधित किवर्डस वापरून युट्युब वर हा ओरिजिनल व्हिडिओ मिळतो का हे शोधले. आम्हाला युट्युब वर हा व्हिडिओ मिळाला. जीएमएस फॉस्ट नावाच्या चॅनेल वर उपलोंडेड ह्या व्हिडिओ वर मोक ड्रिल लिहले होते. हा इथे बघा.
व्हायरल व्हिडिओ सारखाच एक व्हिडिओ आम्हाला दुसऱ्या युट्युब चॅनेल वर मिळाला. ह्यात देखील लिहले होते कि कि हा व्हिडिओ परतवाडा बस स्टैंड च्या मॉक ड्रिल चा आहे. बातमीत देखील सांगितले होते कि हा परतवाडा च्या बस स्टैंड मध्ये मोक ड्रिल मध्ये थानेदार सदानंद मानकर आणि क्यूआरटी टीम ने आरोपीला पकडले. पूर्ण व्हिडिओ इथे बघा. हा व्हिडिओ विदर्भ प्रभात नावाच्या युट्युब चॅनेल वर 14 ऑक्टोबर रोजी अपलोड केला गेला.
तपासाच्या पुढच्या टप्प्यात विश्वास न्यूज ने पुलिस निरीक्षक एस. एच. मानकर ह्यांना संपर्क केला. त्यांनी सांगितले व्हायरल व्हिडिओ मोक ड्रिल चा आहे. कुठलाच आतंकवादी पकडला गेला नाही.
व्हायरल पोस्ट शेअर करणारे यूजर Yogesh Pashine ह्यांची सोशल स्कॅनिंग केल्यावर आम्हाला कळले कि यूजर महाराष्ट्राच्या गोंदिया चे रहिवासी आहे. ते एका विशिष्ठ विचारधाऱ्याने प्रभावित आहेत.
निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल पोस्ट मध्ये केलेला दावा खोटा असल्याचे समजले. तपासात कळले कि महाराष्ट्रातील अमरावतीच्या परतवाड़ा बस स्टैंड वर झालेल्या एका मोक ड्रिल चा व्हिडिओ खरे समजून काही लोकं ह्याला व्हायरल करत आहेत.
Knowing the truth is your right. If you have a doubt on any news that could impact you, society or the nation, let us know. You can share your doubts and send you news for fact verification on our mail ID contact@vishvasnews.com or whatsapp us on 9205270923