नागपूर च्या फुटाळा चा सांगून व्हायरल होत असलेला व्हिडिओ जम्मू मधील बाग-ए-बहू च्या म्युसिकल वॉटर फाउंटन चा आहे.
नवी दिल्ली (विश्वास न्यूज): विश्वास न्यूजला फेसबुकवर मोठ्या प्रमाणावर शेअर होत असलेला एक व्हिडिओ समोर आला, ज्यात दावा करण्यात आला होता की तो फुटाळा तलाव, नागपूरचा आहे. तपासात मात्र हा व्हिडिओ नागपूरचा नसून जम्मूचा असल्याचे समोर आले.
काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर, Aliha Wasim ने तीस सेकंड चा व्हिडिओ आपल्या प्रोफाइल वर पोस्ट करून लिहले: Futala lake #Nagpur
हि पोस्ट आणि त्याचा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.
तपास:
विश्वास न्यूज ने तपासाची सुरुवात इन्व्हीड टूल मध्ये व्हिडिओ अपलोड करून किफ्रेम्स मिळवण्यापासून केला. आम्ही प्रत्येक किफ्रेम वर गूगल लेन्स चा वापर करून शोध घेतला.
असाच एक व्हिडिओ युट्युब वर १६ फेब्रुवारी २०२२ रोजी ‘Travelling Keeda’ ह्या चॅनेल वर पोस्ट केल्याचे दिसले. त्यात डिस्क्रिप्शन मध्ये लिहले होते: ‘Jammu meh pehli baar Musical fountain show in bage-bahu’. दहा मिनिटांनंतर ह्या व्हिडिओ मध्ये व्हायरल व्हिडिओ सारखे दृश्य दिसतात.
आम्हाला असाच एक व्हिडिओ Bikram Baba jee Ramban wala ह्या युट्युब चॅनेल वर सापडला. त्यात देखील सांगितले होते कि हा व्हिडिओ बाग-ए-बहू, जम्मू चा आहे.
आम्हाला जम्मू टीव्ही वर हा लाईव्ह व्हिडिओ शेअर केल्याचा आढळले. त्यात कॅप्शन दिले होते. Jammu tourism, Directorate of Tourism Jammu, inaugaration ceremony of musical water fountain with Light and Sound Show.
Music credit: Jai Ho slumsdog millineor
आम्हाला हाच व्हिडिओ विविध फेसबुक पेजेस वर आढळला.
Jammu Parivartan ने १३ फेब्रुवारी रोजी हा लाईव्ह व्हिडिओ शेअर केला होता.
Reasi News Updates ने देखील १३ फेब्रुवारी ला हा शेअर केला होता.
तसेच Jk Peoples voice ने देखील हा व्हिडिओ शेअर केला होता.
सगळ्या व्हिडिओ मध्ये असेच म्हंटले होते कि हा व्हिडिओ बाग-ए-बहू, जम्मू चा आहे.
तपासाच्या पुढच्या टप्प्यात आम्ही नागपूर चे ANI कॉररेस्पॉण्डेण्ट सौरभ जोशी ह्यांना संपर्क केला, त्यांनी सांगितले कि हा व्हिडिओ नागपूर चा नाही.
त्या नंतर आम्ही दैनिक जागरण चे काश्मीर चे संपादक नवीन नवाझ ह्यांना संपर्क केला त्यांनी सांगितले कि हा व्हिडिओ जम्मू मधील बाग-ए-बहू मध्ये होणाऱ्या लाईट शो चा आहे.
तपासाच्या शेवटच्या टप्प्यात आम्ही Aliha Wasim ह्यांचे सोशल बॅकग्राउंड चेक केले, त्यात कळले कि यूजर ला २८ लोकं फॉलो करतात.
निष्कर्ष: नागपूर च्या फुटाळा चा सांगून व्हायरल होत असलेला व्हिडिओ जम्मू मधील बाग-ए-बहू च्या म्युसिकल वॉटर फाउंटन चा आहे.
Knowing the truth is your right. If you have a doubt on any news that could impact you, society or the nation, let us know. You can share your doubts and send you news for fact verification on our mail ID contact@vishvasnews.com or whatsapp us on 9205270923