विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल व्हिडिओ सात वर्ष जुना असल्याचे समोर आले. व्हिडिओ 2014 चा आहे आणि व्हिडिओ मध्ये दिसत असलेले पूर्व आमदार यांचे 2015 साली निधन झाले आहे. व्हायरल पोस्ट दिशाभूल करणारी आहे.
विश्वास न्यूज (नवी दिल्ली): सोशल मीडिया च्या विभिन्न प्लॅटफॉर्म्स वर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ह्यात काँग्रेस चे एक पूर्व दिवंगत नेते गुरफान अली हा दावा करताना दिसत आहेत कि त्यांनी नुकतेच राहुल गांधी च्या विरोधात, सोनिया गांधी ह्यांना एक पत्र लिहले आहे. विश्वास न्यूज च्या तपासात हा दावा दिशाभूल करणारा असल्याचे समजले. गुरफान अली ह्यांचा एक जुना व्हिडिओ आता मुद्दाम व्हायरल करण्यात येत असल्याचे दिसत आहे, जेव्हाकी त्यांचे निधन 2015 साली झाले.
काय होत आहे व्हायरल?
फेसबुक आणि ट्विटर वर एक व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहे, ह्यात दावा करण्यात येत आहे कि पूर्व संसद गुरफान अली ह्यांनी सोनिया गांधी ह्यांना पत्र लिहून सांगितले कि तुमचा मुलगा त्या लायकीचा नाही तर त्याला नेता का बनवत आहेत.
ह्या पोस्ट चा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.
तपास:
विश्वास न्यूज ने सगळ्यात आधी व्हायरल व्हिडिओ ला निरखून बघितले. ह्यात एबीपी न्यूज चा जुना लोगो दिसत होता, जेव्हाकी आता एबीपी चॅनेल चा लोगो बदलला आहे. म्हणजे हे स्पष्ट आहे कि हा व्हिडिओ जुना आहे. ह्यात पूर्व आमदार सांसद गुफरान आजम ह्यांना राहुल गांधी च्या विरोधात बोलताना बघितले जाऊ शकते.
तपासाच्या पुढच्या टप्प्यात आम्ही युट्युब वर हा खरा व्हिडिओ शोधण्यास सुरु केला. ओरिजिनल व्हिडिओ 14 जुलै 2014 रोजी आम्हाला एबीपी चॅनेल च्या युट्युब अकाउंट वर मिळाला, ज्यात पूर्व आमदार गुफरान आजम ह्यांना राहुल गांधी च्या विरोधात बोलताना बघितले जाऊ शकते. पण हा व्हिडिओ सात वर्ष जुना आहे.
तपासादरम्यान आम्हाला असे बरेच मीडिया रिपोर्ट्स मिळाले ज्यात कळले कि पूर्व आमदार गुफरान आजम ह्यांचे 2015 साली मुंबई येथे निधन झाले.
तपासाच्या पुढच्या टप्प्यात आम्ही काँग्रेस चे राष्ट्रीय प्रवक्ता अखिलेश प्रताप सिंह ह्यांना संपर्क केला. त्यांनी आम्हाला सांगितले कि व्हायरल व्हिडिओ बराच जुना आहे, आता ह्याचा काही संबंध नाही.
तपासाच्या शेवटच्या टप्प्यात आम्ही त्या यूजर चा टापा केला ज्यानी जुना व्हिडिओ शेअर केला. फेसबुक यूजर Puranjan Naik च्या सोशल स्कँनिंग मध्ये कळले कि यूजर चे हजार पेक्षा जस्ती फ्रेंड्स आहेत. यूजर छत्तीसगढ चा रहिवासी आहे.
निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल व्हिडिओ सात वर्ष जुना असल्याचे समोर आले. व्हिडिओ 2014 चा आहे आणि व्हिडिओ मध्ये दिसत असलेले पूर्व आमदार यांचे 2015 साली निधन झाले आहे. व्हायरल पोस्ट दिशाभूल करणारी आहे.
Knowing the truth is your right. If you have a doubt on any news that could impact you, society or the nation, let us know. You can share your doubts and send you news for fact verification on our mail ID contact@vishvasnews.com or whatsapp us on 9205270923