बांगलादेशात हिंदू मंदिरांची तोडफोड आणि देवतांच्या मूर्तींची तोडफोड केल्याचा दावा करून जो व्हिडिओ व्हायरल होत आहे, तो पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील रहीम यार खान जिल्ह्यातील भोंग शहरातील जुन्या घटनेचा आहे, दिशाभूल करणारा दावा करून तो व्हायरल करण्यात येत आहे. हा व्हिडिओ बांगलादेशमधील नाही.
नवी दिल्ली (विश्वास न्यूज): सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमध्ये हिंसक जमाव मंदिरातील हिंदू देवतांच्या मूर्तींची तोडफोड करताना दिसत आहे. मंदिर तोडफोडीची ही घटना बांगलादेशशी संबंधित असल्याचा दावा करण्यात येत आहे, जिथे मुस्लिम दंगलखोरांनी पुन्हा एकदा हिंदू मंदिरांवर हल्ला केला आहे असे देखील सांगण्यात येत आहे.
आमच्या तपासात हा दावा दिशाभूल करणारा असल्याचा समजला. व्हायरल होत असलेला व्हिडिओ हा मंदिराच्या विध्वंसाशी संबंधित आहे, मात्र ही घटना बांगलादेशची नसून पाकिस्तानची आहे. काही महिन्यांपूर्वी बांगलादेशमध्ये अनेक हिंदू मंदिरांची तोडफोड करण्यात आली होती आणि या घटनांचे व्हिडिओ पश्चिम बंगालमधील घटना म्हणून देखील शेअर करण्यात आले होते.
काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर ‘Dinakar Natyaalaya’ ने व्हायरल पोस्ट (आर्काइव्ह लिंक) शेअर केली आणि लिहले: हिंदू समुदाय के लोगों को उनके गांवों में नहीं रहना चाहिए क्योंकि बांग्लादेश में यह सब हो रहा है।
बरेच अन्य यूजर देखील हा व्हिडिओ अश्याच दाव्यांसह व्हायरल करत आहेत.
तपास:
व्हायरल व्हिडिओच्या की-फ्रेम्सच्या Google रिव्हर्स इमेज सर्चमध्ये 5 ऑगस्ट 2021 रोजी पाकिस्तान-आधारित वृत्तपत्र डॉनच्या वेबसाइटवर प्रकाशित झालेला रिपोर्ट मध्ये सापडले, ज्यामध्ये वापरलेले चित्र व्हायरल व्हिडिओच्या व्हिज्युअलशी मिळते जुळते आहे.
5 ऑगस्ट 2021 रोजी पाकिस्तानच्या द डॉन या वृत्तपत्राच्या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या रिपोर्ट सोबत दिलेल्या माहितीनुसार, ‘मदरशात एका हिंदू मुलाने लघवी केल्याची अफवा पसरवून मुस्लिम बदमाशांनी रहीम यार खान जिल्ह्यातील भोंग शहरात एका हिंदू मंदिराची तोडफोड केली आणि सुकूर-मुलतान मोटार-मार्ग रोखला. महामार्ग रोखून धरला.”
पाकिस्तान हिंदू कौन्सिलचे मुख्य संरक्षक डॉ रमेश वांकवानी यांनी 4 ऑगस्ट 2021 रोजी त्यांच्या ट्विटर हँडलवरून ही घटना पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील रहीम यार खानचे भोंग शहर असे वर्णन करून शेअर केली.
आतापर्यंतच्या तपासातून हे स्पष्ट झाले की व्हायरल होत असलेला व्हिडिओ हा हिंदू मंदिरावरील हल्ल्याचा आहे, मात्र ही घटना बांगलादेश नाही तर पाकिस्तानशी संबंधित आहे.
यापूर्वी, पश्चिम बंगालमधील मुस्लिमांच्या हिंदू मंदिराच्या तोडफोडीचे वर्णन करत हाच व्हिडिओ खोट्या दाव्यासह सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. आमचे सहकारी दैनिक जागरणचे कोलकाता ब्युरो चीफ जेके वाजपेयी यांनी या दाव्याचे खंडन केले आणि सांगितले की, ‘मंदिर तोडफोडीचा हा व्हिडिओ बंगालशी संबंधित नसून पाकिस्तानचा आहे आणि भारत सरकारच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.’
5 ऑगस्ट रोजी ‘रिपब्लिक वर्ल्ड’च्या वेरिफाइड यूट्यूब चॅनेलवर अपलोड केलेल्या बुलेटिननुसार, पाकिस्तानमधील हिंदू मंदिरातील तोडफोडीच्या घटनेवर टीका करणारे विधान भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने जारी केले होते.
बुलेटिनमध्ये दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील भोंग शहरातील एका हिंदू मंदिराची तोडफोड करताना देवतांच्या मूर्तींची विटंबना करण्यात आली आणि त्यानंतर दंगलखोरांनी मंदिराला आग लावली. यासोबतच दंगलखोर जमावाने नजीकच्या हिंदू कुटुंबांनाही लक्ष्य केले.
एका सोशल मीडिया शोधात पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर एक ट्विट देखील सापडले, ज्यामध्ये या घटनेची टीका करण्यात आली आणि स्थानिक प्रशासनाला सर्व आरोपींना अटक करण्याचे आणि पोलिसांच्या निष्काळजीपणाच्या प्रकरणात कारवाई करण्याचे निर्देश दिले. यासोबतच त्यांनी मंदिराची दुरुस्ती पाकिस्तान सरकारकडून करून घेण्याची घोषणाही केली होती.
भ्रामक दावा करून व्हायरल व्हिडिओ शेअर करणाऱ्या युजरला फेसबुकवर सुमारे चार हजार लोक फॉलो करतात.
निष्कर्ष: बांगलादेशात हिंदू मंदिरांची तोडफोड आणि देवतांच्या मूर्तींची तोडफोड केल्याचा दावा करून जो व्हिडिओ व्हायरल होत आहे, तो पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील रहीम यार खान जिल्ह्यातील भोंग शहरातील जुन्या घटनेचा आहे, दिशाभूल करणारा दावा करून तो व्हायरल करण्यात येत आहे. हा व्हिडिओ बांगलादेशमधील नाही.
Knowing the truth is your right. If you have a doubt on any news that could impact you, society or the nation, let us know. You can share your doubts and send you news for fact verification on our mail ID contact@vishvasnews.com or whatsapp us on 9205270923