एका मुलीला बर्फातून वाचवल्याचा जो व्हिडिओ पाकिस्तानचा सांगून व्हायरल होत आहे तो पूंछ, जम्मू आणि काश्मीर चा असल्याचे विश्वास न्यूज च्या तपासात सिद्ध झाले.
विश्वास न्यूज (नवी दिल्ली): विश्वास न्यूज ला दीड मिंटचा एक व्हिडिओ सोशल मीडिया च्या विविध प्लॅटफॉर्म वर व्हायरल होताना दिसला. ह्या व्हिडिओ मध्ये एका मुलीला बर्फातून वाचवताना बघितले जाऊ शकते. असा दावा करण्यात येत आहे कि हा व्हिडिओ, मुरी पाकिस्तान चा आहे. पण विश्वास न्यूज च्या तपासात असे कळले कि हा व्हिडिओ पूंछ, जम्मू काश्मीर मधील आहे.
काय होत आहे व्हायरल?
फेसबुक पेज, صدائے نرتوپہ ने एक व्हिडिओ आपल्या प्रोफाइल वर शेअर करून उर्दू मध्ये लिहले: مری برف میں دبی زندہ سیاح عورت کو مقامی افراد نے اپنی مدد آپ کے تحت ریسکیو کر کے طبعی امداد کےلئے ہسپتال منتقل کر دیا۔۔
भाषांतर: मुरीच्या बर्फात फसलेल्या जिवंत पर्यटक महिलेला स्थानिकांनी बाहेर काढले आणि तिला वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात हलवले.
हि पोस्ट आणि त्याचा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.
तपास:
आम्हाला कळले कि हा व्हिडिओ पाकिस्तान येथे आलेल्या हिमवादळानंतर व्हायरल होत आहे, जो जानेवारी मध्ये आला.
विश्वास न्यूज ने सगळ्यात आधी तपासाची सुरुवात इन्व्हिड टूल वर हा व्हिडिओ अपलोड करून तपास सुरु केला.
आम्ही बरेच स्क्रीनग्रेब्स मिळवले आणि त्यानंतर प्रत्येक ग्रॅब वर गूगल रिव्हर्स इमेज सर्च चा वापर केला.
आम्हाला CNN-News18 च्या युट्युब चॅनेल वर हा व्हिडिओ सापडला. ह्या व्हिडिओ सोबत लिहले होते:
जम्मूमधील पूंछ भागात हिमस्खलन झाल्याने एक मुलगी जाड बर्फाखाली गाडली गेली. तिला सतर्क स्थानिकांच्या एका गटाने वाचवले ज्यांनी तिला वेळीच बर्फातून बाहेर काढले. मुलगी आता रूग्णालयात बरी असून धोक्याबाहेर आहे.
आम्हाला एक बातमी Jammu Links News ह्या पोर्टल वर देखील मिळाली.
ह्यात लिहले होते: जम्मू आणि काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यातील एका दुर्गम गावात शनिवारी हिमस्खलनातून 37 वर्षीय महिला आणि तिच्या अल्पवयीन मुलीला गावकऱ्यांनी वाचवले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यांनी सांगितले की, गावकऱ्यांनी त्वरीत काम केले आणि महिलेला आणि तिच्या मुलीला बर्फातून बाहेर काढल्यानंतर दोघांना बाहेर काढले.
आम्हाला newsflare वेबसाईट वर देखील एक व्हिडिओ सापडला.
ह्या आर्टिकल मध्ये देखील लिहले होते कि लोकांनी भारतातील एका मुलीला बर्फातून वाचवले.
शेवटी विश्वास न्यूज ने दैनिक जागरण च्या काश्मीर ब्यूरो चीफ, नवीन नवाझ ह्यांना संपर्क केला. त्यांनी सांगितले कि हि घटना, सुरनकोट परिसर, पुंछमधील मनाई गाव मध्ये घडली. एक महिला आणि तिची मुलगी पाणी भरायला जात असताना हिम वादळ आले आणि त्या बर्फाखाली अडकल्या लोकांनी त्यांना नंतर वाचवले.
शेवटच्या टप्प्यात विश्वास न्यूज ने फेसबुक यूजर चा तपास केला. त्यात कळले कि صدائے نرتوپہ ह्यांना 4100 लोक फोल्लो करतात आणि त्या प्रोफाइल ला 557 लोकं फॉलो करतात.
निष्कर्ष: एका मुलीला बर्फातून वाचवल्याचा जो व्हिडिओ पाकिस्तानचा सांगून व्हायरल होत आहे तो पूंछ, जम्मू आणि काश्मीर चा असल्याचे विश्वास न्यूज च्या तपासात सिद्ध झाले.
Knowing the truth is your right. If you have a doubt on any news that could impact you, society or the nation, let us know. You can share your doubts and send you news for fact verification on our mail ID contact@vishvasnews.com or whatsapp us on 9205270923