X
X

Fact-check: कपूर, लवंग, ओवा आणि निलगिरी च्या तेलाचा वापर केल्याने ऑक्सिजन ची पातळी वाढत नाही, व्हायरल दावा खोटा आहे

व्हायरल होत असलेली पोस्ट ज्यात सांगितले गेले होते कि कपूर, लवंग, ओवा आणि निलगिरी चे तेल वापरल्यास ऑक्सिजन ची पातळी वाढते, हा दावा खोटा आहे. एक्सपर्टस प्रमाणे यात कुठलेच वैज्ञानिक तथ्य नाही

विश्वास न्यूज (नवी दिल्ली): विश्वास न्यूज कडे नुकताच एक दावा आला जो सोशल मीडिया वेबसाईट्स वर मराठी, इंग्रजी आणि हिंदी भाषेत शेअर करण्यात येत होता. दावा करण्यात येत होता कि एका पोटली मध्ये जर का कपूर, लवंग, अज्वाईन आणि निलगिरीचे तेल घेतले आणि त्याचा वापर केला तर माणसात ऑक्सिजन ची पातळी वाढते. विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल दावा खोटा असल्याचे समजले. या पोटलीमुळे ऑक्सिजन ची पातळी वाढत नाही.

काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर, Bharat Pawale यांनी फेसबुक वर एक दावा शेअर केला आणि लिहले, कापूर लवंग ओवा काही थेंब निलगिरी चे तेल.दिवस रात्र पोटली बनवून वास घ्या.ऑक्सिजन ची पातळी वाढण्यास मदत होते.ऑक्सिजन ची पातळी कमी असते तेंव्हा लढाख मधील पर्यटकांना ही पोठली दिली जाते.बऱ्याच रुग्णवाहिका आता ह्या गोष्टी देखील ठेवत आहेत.हा एक घरगुती उपचार आहे.सर्वांना पाठवा.
हि पोस्ट आणि अर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.

हा दावा केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी देखील फेसबुक वर शेअर केला.
हि पोस्ट आणि त्याचा अर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.

तपास:
विश्वास न्यूज ने सगळ्यात आधी या दाव्यासाठी रिसर्च पेपर्स शोधण्यास सुरुवात केली.
सगळ्यात आधी आम्ही कापुरवर रिसर्च पेपर शोधला.
सीडीसी प्रमाणे जर माणूस 2-Camphonone, Gum camphor, Laurel camphor, Synthetic camphor याच्या संपर्कात आला तर त्याला डोळ्याला त्रास, स्किन ला इर्रिटेशन, म्युकस मेम्बरेन ला इर्रिटेशन, उलटीसारखा वाटणे, डोकेदुखी वगरे सारखे त्रास हू शकतात.
हा रिसर्च पेपर तुम्ही इथे वाचू शकता.

विश्वास न्यूज ला ‘Pediatrics Official Journal of the American Academy of Pediatrics‘ यात पण एक अभ्यास सापडला, ज्याचे शीर्षक होते, Vapor Rub, Petrolatum, and No Treatment for Children With Nocturnal Cough and Cold Symptoms.
त्यात सांगितले होते कि: वेपोर रब, त्यात कपूर, मेथॅनॉल, निलगिरी तेल वापरल्यास लहान मुलांना सर्दी पासून आराम मिळाल्याचे समजले आहे. ते चांगले झोपल्याचे देखील समोर आले, तसेच त्याचे पालक देखील शान्त झोपले, त्या मुलांच्या तुलनेत ज्यांना हे उपचार मिळाले नाही.
हि स्टडी इथे वाचा.

लवंग पण आरामदायी असल्याचे एका रिसर्च पेपर च्या भरवश्यावर सांगण्यात आले असल्याचे समोर येते, रिसर्च पेपर चे नाव आहे, “Molecular Basis of the Therapeutical Potential of Clove ( Syzygium aromaticum L.) and Clues to Its Anti-COVID-19 Utility”

त्या पेपर मध्ये सांगितले गेले आहे कि लवंग अनेक वर्षांपासून श्वासाच्या आजारांवर वापरले गेले आहे. लवंग मध्ये अँटी-वायरल आणि अँटी-इन्फ्लमेटरी तत्व असतात. म्हणून लवंगी चा वापर कोरोनाव्हायरसपासून बचाव करण्यास देखील करता येतो.
हा रिसर्च इथे वाचा.

आम्हाला अज्वाईन आणि निलगिरी तेलावर कुठलेच रिसर्च पेपर सापडले नाही.

हा दाव्याची अधिक पुष्टी करण्यासाठी विश्वास न्यूज ने नागपूर चे पुलमोनोलॉजिस्ट डॉ विवेक गुप्ता यांच्यासोबत संपर्क साधला. त्यांनी सांगितले कि या दाव्यात कुठलेच वैज्ञानिक तथ्य नाही. व्हायरल होत असलेला मेसेज खोटा आहे. लोकांना ऑक्सिजन ची कमी पातळी असल्यास त्यांनी त्वरित डॉक्टर ला संपर्क करावे.

विश्वास न्यूज ने आयुर्वेद प्रॅक्टिशनर, डॉ ललित जैन यांना देखील संपर्क केला. त्यांनी आम्हाला सांगितले कि आयुर्वेद मध्ये असे ठोस पुरावे नाही जे सांगितली कि व्हायरल होत असलेल्या मेसेज मध्ये दिलेल्या साहित्यामुळे ऑक्सिजन ची पातळी वाढेल. पण हे साहित्य कफ कमी करण्यास मदत करतात.
विश्वास न्यूज देखील वाचकांना सांगू इच्छिते कि लोकांनी ऑक्सिमीटर नेहमी सोबत ठेवावे आणि ऑक्सिजन ची पातळी कमी झाल्यास डॉक्टर कडे अजून तब्येत खराब व्हायच्या आधी जावे.

हा दावा शेअर करणाऱ्या यूजर चा आम्ही तपास केला. त्यात कळले कि यूजर Bharat Pawale हे पनवेल, नवी मुंबई चे रहिवासी आहेत आणि त्यांनी फेसबुक प्रोफाइल मे २०१० मध्ये बनवले होते. त्यांना २९४ लोकं फॉलो करतात.

निष्कर्ष: व्हायरल होत असलेली पोस्ट ज्यात सांगितले गेले होते कि कपूर, लवंग, ओवा आणि निलगिरी चे तेल वापरल्यास ऑक्सिजन ची पातळी वाढते, हा दावा खोटा आहे. एक्सपर्टस प्रमाणे यात कुठलेच वैज्ञानिक तथ्य नाही

  • Claim Review : कपूर, ओवा, ओवाआणि निलगिरी च्या तेलाचा वापर केल्याने ऑक्सिजन ची पातळी वाढते
  • Claimed By : Bharat Pawale
  • Fact Check : False
False
Symbols that define nature of fake news
  • True
  • Misleading
  • False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

Post your suggestion

No more pages to load

संबंधित लेख

Next pageNext pageNext page

Post saved! You can read it later