Fact Check : उर्मिला मातोंडकर नाही आहे मोहन भागवत ची भाच्ची, व्हायरल दावा दिशाभूल करणारा आहे
विश्वास न्यूज च्या तपासात कळले कि उर्मिला मातोंडकर ह्या संघाचे प्रमुख मोहन भागवत यांच्या भाच्ची नाहीत.
- By: Ashish Maharishi
- Published: Jul 28, 2021 at 09:42 PM
विश्वास न्यूज (नवी दिल्ली): सोशल मीडिया वर अभिनेत्री उर्मिला मातोंडकर आणि त्यांचे पती मोहसीन अख्तर यांच्या बद्दल एक खोटी पोस्ट व्हायरल होत आहे. काही लोकं दावा करत आहेत कि उर्मिला मातोंडकर ह्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ चे प्रमुख मोहन भागवत यांच्या भाच्ची आहेत. विश्वास न्यूज च्या तपासात हा दावा खोटा असल्याचा समजले. हे खरे आहे कि उर्मिला मोहसीन यांच्या पत्नी आहेत पण त्यांचा मोहन भागवत सोबत काहीच संबंध नाही. संघाने आणि उर्मिला ने या बाबतीत स्पष्टीकरण दिले आहे.
काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर सोनू बौद्ध ने 25 जुलै 2021 रोजी एक छायाचित्र पोस्ट केले आणि लिहले: ‘मोहन भागवत जी..! जब आपकी भतीजी ने मुस्लिम के साथ शादी की तो हिंदू धर्म खतरे में क्यों नहीं आया..?‘
फेसबुक पोस्ट चा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.
अश्या बऱ्याच पोस्ट व्हायरल होत आहे ज्यात उर्मिला मातोंडकर यांना भागवत च्या नातेवाईक असल्याचे सांगितले गेले आहे.
तपास:
विश्वास न्यूज ने सगळ्यत आधी व्हायरल छायाचित्राला गूगल मध्ये शोधण्यास सुरु केले. आम्ही गूगल रिव्हर्स इमेज टूल ची मदत घेतली. त्यात आम्हाला कळले कि व्हायरल चित्र इंडियन एक्सप्रेस या च्या वेबसाईट वर 25 मे 2016 मध्ये प्रकाशित झाली होती. हि रिपोर्ट इथे बघा.
तसेच आम्हाला जागरण डॉट कॉम वर एक बातमी 6 मार्च 2016 रोजी प्रकाशित एका बातमी प्रमाणे, अभिनेत्री उर्मिला मातोंडकर ने कश्मीर चे बिजनेसमैन आणि आधी मॉडल असलेले मोहसिन अख्तर मीर यांच्यासोबत लग्न केले. हि बातमी इथे वाचा.
तपासाच्या पुढच्या टप्प्यात आम्ही सरळ उर्मिला मातोंडकर यांना संपर्क केला. त्यांनी आम्हाला सांगितले, “मोहन भागवत यांच्यासोबत माझा काहीच संबंध नाही. ते माझे नातेवाईक नाहीत. माझे पती मुसलमान आहेत आणि मी हिंदू.“
विश्वास न्यूज ने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सोबत देखील संपर्क केला. संघाचे सहप्रचार प्रमुख नरेंद्र कुमार यांनी सांगितले कि उर्मिला मातोंडकर या मोहन भागवत च्या भाच्ची नाहीत.
आता आम्ही दिशाभूल करणारी पोस्ट शेअर करणार्याचा तपास केला. यूजर सोनू बौद्ध ने सप्टेंबर २०१३ मध्ये प्रोफाइल बनवला होता.
निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात कळले कि उर्मिला मातोंडकर ह्या संघाचे प्रमुख मोहन भागवत यांच्या भाच्ची नाहीत.
- Claim Review : उर्मिला मातोंडकर मोहन भागवत ची भाच्ची
- Claimed By : सोनू बौद्ध
- Fact Check : False
Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!
Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.