Fact Check: दिल्ली च्या शाळांमध्ये अनिवार्य नाही आहे उर्दू चा अभ्यास, व्हायरल दावा खोटा आहे
विश्वास न्यूज च्या तपासात कळले कि व्हायरल होत असलेली पोस्ट खोटी आहे. दिल्ली च्या शाळांमध्ये उर्दू भाषा अनिवार्य केली नाही.
- By: Umam Noor
- Published: Oct 8, 2021 at 04:10 PM
नवी दिल्ली (विश्वास न्यूज): सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स वर एक पोस्ट व्हायरल होत आहे. व्हायरल पोस्ट एक ट्विट चा स्क्रीनशॉट आहे. त्यात दावा करण्यात येत आहे कि दिल्ली चे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ह्यांनी सगळ्या दिल्ली च्या शाळांमध्ये उर्दू भाषा अनिवार्य केली आहे. विश्वास न्यूज च्या तपासात हि बातमी खोटी असल्याचे सिद्ध झाले. दिल्ली च्या शाळांमध्ये उर्दू भाषा कंपलसरी करण्यात आली नाही.
काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर ने एका ट्विट चा स्क्रीनशॉट फेसबुक वर शेअर केला. ट्विट मध्ये लिहले होते: दिल्ली के सीएम केजरीवाल ने दिल्ली के सभी स्कूलों में उर्दू कंपलसरी कर दी है क्या आपको जानकारी है ?? कबरुद्दीन का असली चेहरा अब सामने आ रहा है। ओला ओ ओबर।
ह्या पोस्ट चा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.
तपास:
आम्ही तपासाची सुरुवात सगळ्यात आधी गूगल द्वारे किवर्ड सर्च च्या माध्यमाने केली. सर्च मध्ये आम्हाला 12 मार्च 2020 च्या बिसनेस इनसाइडर च्या वेबसाईट वर प्रकाशित झालेला एक आर्टिकल सापडला, ज्यात दिलेल्या माहिती प्रमाणे, “नवीन एजुकेशन पॉलिसी प्रमाणे, जे विद्यार्थी आठवी ची तिसऱ्या भाषेची परीक्षा पास नाही करणार, त्यांना दहावी च्या बोर्ड परीक्षांना बसण्याची अनुमती देण्यात येणार नाही. विद्यार्थ्यांना हिंदी आणि इंग्रजी सोबत एका तिसऱ्या भाषेचा देखील अभ्यास करावा लागेल आणि त्या विषयात पास व्हावे लागेल. हि तिसरी भाषा, संस्कृत, उर्दू किंवा फ्रेंच देखील असू शकते.”
आम्ही ह्या संबंधी बातम्या तपासण्यास सुरु केला. आम्हाला 13 ऑगस्ट 2021 रोजी न्यू इंडियन एक्सप्रेस च्या वेबसाईट वर प्रकाशित झालेला एक आर्टिकल मिळाला, ज्यात दिल्ली च्या सरकारी शाळांमधी उर्दू शिक्षकांसंबंधी माहिती दिली होती. ह्या बातमीत सांगितले होते कि, बऱ्याच शाळांमध्ये उर्दू हि तिसरी भाषा म्हणून शिकवण्यात नाही येत आहे कारण, उर्दू शिकवणारे शिक्षकांची संख्या कमी आहे, जेव्हाकी एनइपी द्वारे विद्यार्थ्यांना एक तिसरी भाषा शिकण्याची संधी मिळाली आहे. दिल्ली च्या सरकारी शाळांमध्ये संस्कृत, पंजाबी आणि उर्दू तिसरी भाषा म्हणून शिकवण्यात येते.”
न्यू इंडियन एक्सप्रेस च्या बातमी प्रमाणे, सध्या दिल्ली मध्ये, उर्दू, संस्कृत, पंजाबी, हिंदी, मैथिली-भोजपुरी, गढ़वाली-कुमाऊंनी-जौनसारी, सिंधी आणि तमिल अश्या आठ भाषा कार्यरत आहे.
विश्वास न्यूज ने पोस्ट संबंधी सत्य जाणून घेण्यासाठी दैनिक जागरण, दिल्ली मध्ये एजुकेशन बीट कवर करणारे रिपोर्टर ऋतिका मिश्रा ह्यांना संपर्क केला आणि व्हायरल पोस्ट त्यांच्यासोबत शेअर केली. त्यांनी दिल्ली शिक्षा निदेशालय ह्यांच्याकडून कन्फर्म करून सांगितले कि, “दिल्ली सरकार ने उर्दू भाषा शाळांमध्ये कंपलसरी नाही केली. हा दावा खोटा आहे.”
खोटी पोस्ट करणारा फेसबुक पेज, ‘100 करोड़ हिन्दुओ एक हो जाओ’ चे सोशल स्कॅनिंग केल्यावर आम्हाला कळले कि यूजर ला, 132,323 लोकं फॉलो करतात.
निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात कळले कि व्हायरल होत असलेली पोस्ट खोटी आहे. दिल्ली च्या शाळांमध्ये उर्दू भाषा अनिवार्य केली नाही.
- Claim Review : दिल्ली च्या शाळांमध्ये अनिवार्य आहे उर्दू चा अभ्यास
- Claimed By : 100 करोड़ हिन्दुओ एक हो जाओ
- Fact Check : False
Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!
Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.