Fact Check: उत्तर प्रदेश मधील थिएटर मालकांनी पठाण फिल्म दाखवण्यास नाही दिले नकार, व्हायरल पोस्ट खोटी

विश्वास न्यूजने आपल्या तपासात असे आढळले की उत्तर प्रदेशातील थिएटर मालकांनी पठाण चित्रपट प्रदर्शित करण्यास नकार दिला नाही. व्हायरल पोस्टचा दावा खोटा आहे.

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): शाहरुख खानच्या पठाण या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जसजशी जवळ येत आहे, तसा बहिष्काराचा जोर देखील वाढत आहे. दरम्यान, काही सोशल मीडिया यूजर्स असा दावा करत आहेत की उत्तर प्रदेशातील थिएटर मालकांनी पठाण चित्रपट प्रदर्शित करण्यास नकार दिला आहे.

विश्वास न्यूजच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे आढळून आले आहे. उत्तर प्रदेशातील थिएटर मालकांनी पठाण चित्रपट प्रदर्शित करण्यास नकार दिला नाही.

काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर ने व्हायरल पोस्ट शेअर करत लिहले, ‘बड़ी खुशखबरी विरोध के बाद उत्तरप्रदेश के थिएटर मालिकों ने #पठान फिल्म लगाने से इंकार किया। जय श्री राम।’

या पोस्ट चा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.

तपास:
आमचा तपास सुरू करत, आम्ही सगळ्यात आधी बातम्यांचा शोध घेतला, परंतु शोध दरम्यान आम्हाला अशी कोणतीही बातमी सापडली नाही. मात्र, अशी कोणतीही बातमी खरी असती तर ती बातमीत नक्कीच आली असती.

व्हायरल पोस्टची पुष्टी करण्यासाठी आम्ही मेरठ सिनेमा असोसिएशनचे अध्यक्ष अजय गुप्ता यांच्यासोबत बोललो आणि त्यांनी ही बातमी खोटी असल्याचे सांगितले. उत्तर प्रदेशातील थिएटर मालकांनी असा कोणताही निर्णय घेतलेला नाही.

यूपी सिनेमा एक्झिक्युटर फाऊंडेशनचे अध्यक्ष आशिष अग्रवाल यांनी सांगितले की पठाण चित्रपटाला कोणताही विरोध नाही. सेन्सॉर बोर्डाने चित्रपट पास केल्यावर विरोध करण्यात अर्थ नाही.

दैनिक जागरणमधील लखनऊचे उपसंपादक धर्मेंद्र पांडे यांनीही पुष्टी केली की यूपीच्या थिएटर मालकांनी पठाणला थिएटरमध्ये सहभागी करण्यास नकार दिला नाही.

फेक पोस्ट शेअर करणाऱ्या फेसबुक युजरच्या सोशल स्कॅनिंगमध्ये आम्हाला आढळून आले की हे युजर ‘आलोक द्विवेदी’ हे अलाहाबादचे रहिवासी आहे आणि त्यांचे 4000 फेसबुक मित्र आहेत.

निष्कर्ष: विश्वास न्यूजने आपल्या तपासात असे आढळले की उत्तर प्रदेशातील थिएटर मालकांनी पठाण चित्रपट प्रदर्शित करण्यास नकार दिला नाही. व्हायरल पोस्टचा दावा खोटा आहे.

False
Symbols that define nature of fake news
Know The Truth...

Knowing the truth is your right. If you have a doubt on any news that could impact you, society or the nation, let us know. You can share your doubts and send you news for fact verification on our mail ID contact@vishvasnews.com or whatsapp us on 9205270923

Related Posts
नवीनतम पोस्ट