केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांच्या नावाने व्हायरल होत असलेली पोस्ट ज्यात दावा करण्यात येत आहे कि त्यांनी उताराचे रस्ते हे इंधन दरवाढीला पर्याय म्हणून बांधण्यास सांगितले ते खोटे आहे. विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल न्यूज खोटी असल्याचे समजले.
नवी दिल्ली (विश्वास न्यूज): केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नावाने एक पोस्ट बऱ्याच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स वर व्हायरल होत आहे. या पोस्ट मध्ये दावा करण्यात येत आहे कि एका वृत्तपत्रात आलेल्या बातमी प्रमाणे, गडकरी यांनी म्हंटले, “इंधन दरवाढीला पर्याय, देशातील सर्व रस्ते उताराचे बनवणार.”
दाव्याप्रमाणे, हि बातमी मराठी वृत्तपत्र, लोकसत्ता मध्ये आली होती. विश्वास न्यूजच्या तपासात व्हायरल होत असलेला दावा खोटा असल्याचे समजले.
काय होत आहे व्हायरल?
फेसबुक पेज, ‘Political METRO’ ने व्हायरल पोस्ट आपल्या प्रोफाइल वर शेअर केली आणि लिहले: ‘परत येताना गाडी उचलून आणायची का?? एक शंका फक्त’. या पोस्ट ला बाकी यूजर्स देखील खरे मानून शेअर करत आहेत.
हि पोस्ट आणि याचे आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.
तपास:
विश्वास न्यूज ने लोकसत्ता या वृत्तपत्राच्या वेबसाईट वर हि बातमी शोधण्यापासून आपल्या तपासाची सुरुवात केली. विश्वास न्यूज ला अशी कुठलीच बातमी लोकसत्ताच्या वेबसाईट वर सापडली नाही.
आम्ही इतर वेबसाईट आणि पोर्टल देखील शोधले. जर नीतीन गडकरींनी असे कुठले वक्तव्य केले असते तर केंद्रीय मंत्री असल्याकारणाने नक्कीच हि एक मोठी बातमी झाली असती.
पण आम्हाला कुठेच हि बातमी सापडली नाही ज्यात व्हायरल होत असलेला दावा खरा ठरेल.
आम्ही आमच्या तपासात लोकसत्ता चे ट्विटर हॅन्डल देखील तपासले. लोकसत्ता नि एका ट्विट मध्ये स्पष्ट केले आहे कि त्यांनी अशी कुठलीच बातमी प्रकाशित केली नाही.
हा ट्विट इथे बघा.
विश्वास न्यूज ने एएनआई चे नागपूर कॉररेस्पॉण्डेण्ट सौरभ जोशी यांना संपर्क केला. त्यांनी देखील सांगितले कि केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी असे वक्तव्य केले नाही. त्यांनि हे देखील सांगितले कि गडकरी यांनी त्यांच्या ऑनलाईन आणि ऑफलाईन इव्हेंट मध्ये देखील हे वक्तव्य केले नाही.
विश्वास न्यूज ने व्हायरल पोस्ट शेअर करणाऱ्या व्यक्तीचे सोशल बॅकग्राऊंड चेक केले. त्यात असे कळले कि फेसबुक पेज Political METRO ला 96,108 लोकांनी लाईक केले आहे आणि 1,68,067 लोकं या पेज ला फॉलो करतात.
निष्कर्ष: केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांच्या नावाने व्हायरल होत असलेली पोस्ट ज्यात दावा करण्यात येत आहे कि त्यांनी उताराचे रस्ते हे इंधन दरवाढीला पर्याय म्हणून बांधण्यास सांगितले ते खोटे आहे. विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल न्यूज खोटी असल्याचे समजले.
Knowing the truth is your right. If you have a doubt on any news that could impact you, society or the nation, let us know. You can share your doubts and send you news for fact verification on our mail ID contact@vishvasnews.com or whatsapp us on 9205270923