विश्वास न्यूजने तपासात तिरंग्यामध्ये रोशन धरणाचा व्हायरल झालेला व्हिडिओ गुजरातचा नसून महाराष्ट्रातील उजनी धरण असल्याचे निष्पन्न झाले आहे.
नवी दिल्ली (विश्वास न्यूज): तिरंग्याच्या रंगात रंगलेल्या धरणाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ‘हर घर तिरंगा’ मोहिमेअंतर्गत गुजरातमधील काकरापार धरणही तिरंग्याप्रमाणे उजळून निघाले, असा व्हिडिओ शेअर करून सांगण्यात येत आहे. विश्वास न्यूजच्या तपासात हा व्हायरल दावा दिशाभूल करणारा निघाला. व्हायरल झालेला व्हिडिओ महाराष्ट्रातील उजनी धरणाचा आहे.
काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर Singla Inder ने व्हायरल व्हिडिओ शेअर करून लिहले, “गुजरात के काकरापार बांध में तिरंगे का चित्रण! बेहद ख़ूबसूरत।”
पोस्ट चा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.
तपास:
व्हायरल दाव्याची सत्यता जाणून घेण्यासाठी, आम्ही व्हिडिओचे अनेक ग्रॅब काढले आणि Google रिव्हर्स इमेजद्वारे ते शोधले. दरम्यान, आम्हाला 12 ऑगस्ट रोजी TV9 मराठीच्या अधिकृत YouTube चॅनेलवर अपलोड केलेल्या व्हायरल दाव्याचा अहवाल सापडला. व्हिडिओमध्ये दिलेल्या माहितीनुसार, व्हायरल झालेला व्हिडिओ गुजरातचा नसून महाराष्ट्रातील उजनी धरणाचा आहे. इतर अहवाल येथे पाहिले जाऊ शकतात.
तपास पुढे नेत, आम्ही संबंधित कीवर्डसह शोध सुरू केला. या दरम्यान आम्हाला जिल्हा माहिती कार्यालय, पुणे यांच्या अधिकृत ट्विटरवर व्हायरल व्हिडिओ अपलोड करण्यात आला. 13 ऑगस्ट 2022 रोजी व्हिडिओ शेअर करताना त्याचे वर्णन महाराष्ट्रातील उजनी धरण असे करण्यात आले आहे.
अधिक तपशिलांसाठी आम्ही पुण्यातील पत्रकार अमन सईद यांच्याशी बोललो. व्हायरल झालेला व्हिडिओ आम्ही त्यांच्यासोबत शेअर केला आहे. हा व्हिडिओ उजनी धरणाचा असल्याचे त्यांनी सांगितले.
पूर्ण खात्री करण्यासाठी किरण मोघे, जिल्हा माहिती अधिकारी, पुणे, महाराष्ट्र यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी आम्हाला सांगितले की व्हायरल दावा खोटा आहे. हा व्हिडिओ गुजरातमधील काक्रापार धरणाचा नाही. आझादीचा अमृत महोत्सव आणि ‘हर घर तिरंगा अभियान’चा एक भाग म्हणून सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरण तिरंग्याच्या दिव्यांनी उजळून निघाले. हा व्हिडिओ त्याचाच आहे.
शेवटच्या टप्प्यात, आम्ही Singla Inder चे सोशल स्कॅनिंग केले, ज्याने व्हायरल दावा शेअर केला. स्कॅनिंगवरून आम्हाला कळले की युजर भटिंडा येथील रहिवासी आहे. प्रोफाईलवर दिलेल्या माहितीनुसार, डिसेंबर 2010 पासून फेसबुकवर सक्रिय आहे.
निष्कर्ष: विश्वास न्यूजने तपासात तिरंग्यामध्ये रोशन धरणाचा व्हायरल झालेला व्हिडिओ गुजरातचा नसून महाराष्ट्रातील उजनी धरण असल्याचे निष्पन्न झाले आहे.
Knowing the truth is your right. If you have a doubt on any news that could impact you, society or the nation, let us know. You can share your doubts and send you news for fact verification on our mail ID contact@vishvasnews.com or whatsapp us on 9205270923