विश्वास न्यूज च्या तपासात नसीरुद्दीन शाह यांच्या नावाने व्हायरल होत असलेला ट्विट खोटा असल्याचे समजले.
विश्वास न्यूज (नवी दिल्ली): बॉलीवूड अभिनेते, नसिरुद्दीन शाह, यांच्या नावाने परत एकदा खोटे ट्विट व्हायरल होत आहे. या ट्विट ला खरे मानून बाकीचे यूजर्स देखील या ट्विट ला व्हायरल करत आहेत. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे समोर आले.
विश्वास न्यूज च्या तपासात कळले की नसिरुद्दीन शाह यांच्या नावाने व्हायरल होत असलेली पोस्ट खोटी आहे. या आधी देखील नसिरुद्दीन शाह यांच्या नावाने खोटे ट्विट व्हायरल झाले आहे. या संबंधित तपास तुम्ही इथे बघू शकता.
काय होत आहे व्हायरल?
फेसबुक पेज ग्रेट इंडिया ने 30 एप्रिल रोजी नसीरुद्दीन शाह यांचे फेक ट्विट पोस्ट करून लिहले: ‘सवाल ये नहीं की बस्तियां किसने जलाई, सवाल ये हैं कि पागल के हाथ में माचिस किसने दी? जरा ठंडे दिमाग से से सोचिये?’
या फेसबुक पोस्ट चे आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.
तपास:
विश्वास न्यूज ने आपल्या तपासाची सुरुवात नसीरुद्दीन शाह यांच्या नावाने व्हायरल होत असलेल्या ट्विट चे स्कँनिंग करून केली. आम्ही जेव्हा @Naseeruddin_sah नावाचे हॅन्डल शोधण्यास सुरुवात केली, तेव्हा आम्हाला कळले कि हे एक पैरोडी अकाउंट आहे.
हे ट्विटर हॅन्डल नसीरुद्दीन शाह यांचे छायाचित्र वापरून बनवले गेले आहे. ह्या अकाउंट मध्ये स्पष्ट शब्दात दिले आहे कि हे एक पैरोडी अकाउंट आहे. त्यांच्या बायो मध्ये देखील लिहले आहे कि या अकाउंट चा नसीरुद्दीन शाह यांच्या सोबत काहीच संबंध नाही.
याच हॅन्डल वर आम्हाला तो ट्विट देखिल मिळाला जो व्हायरल होत आहे. २३ एप्रिल रोजी कलेला ट्विट तुम्ही इथे बघू शकता.
तपासाच्या पुढच्या टप्प्यात विश्वास न्यूज ने मुंबई मध्ये बॉलीवूड कव्हर करणारे दैनिक जागरण च्या मुख्य संवाददाता स्मिता श्रीवास्तव यांना संपर्क केला. त्यांच्या सोबत आम्ही व्हायरल पोस्ट देखील शेअर केली. त्यांनी आम्हाला सांगितले कि हे अकाउंट फेक आहे.
तपासाच्या शेवटच्या टप्प्यात विश्वास न्यूज ने खोटी पोस्ट करणाऱ्या यूजर चा तपास केला. त्यात आम्हाला कळले कि फेसबुक पेज ग्रेट इंडिया ला १४६३ लोकं फॉलो करतात. ते एका विशिष्ठ विचारधारेसोबत संबंधित आहे. हा पेज त्यांनी २ नोव्हेंबर २०१८ रोजी बनवला होता.
निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात नसीरुद्दीन शाह यांच्या नावाने व्हायरल होत असलेला ट्विट खोटा असल्याचे समजले.
Knowing the truth is your right. If you have a doubt on any news that could impact you, society or the nation, let us know. You can share your doubts and send you news for fact verification on our mail ID contact@vishvasnews.com or whatsapp us on 9205270923