Fact Check: नागपूर मध्ये पाणी भरल्याचे २०१८ चे छायाचित्र आता दिशाभूल करणाऱ्या दाव्यासह व्हायरल

विश्वास न्यूज च्या तपासात या वर्षी चे सांगून व्हायरल होत असलेले पाण्यात बुडलेल्या गाड्यांचे चित्र जुलै 2018 चे आहे. व्हायरल दावा दिशाभूल करणारा आहे.

विश्वास न्यूज (नवी दिल्ली): सोशल मीडिया वर नागपूर चे एक जुने छायाचित्र आत्ताचे सांगून व्हायरल होत आहे. यात रस्त्यावर पाणी भरल्याचे दिसते आणि त्यामुळे कार पाण्यात डुबल्याचे देखील दिसते. यूजर्स दावा करत आहेत कि हे छायाचित्र आताचे आहे. विश्वास न्यूज च्या तपासात, हा दावा दिशाभूल करणारा निघाला. व्हायरल होत असलेले छायाचित्र हे जुने आहे. या वर्षी देखील अतिवृष्टी मुळे नागपूर पाणी साचले, पण व्हायरल छायाचित्र हे तीन वर्ष आधीचे आहे.

काय होत आहे व्हायरल?

फेसबुक यूजर दयाराम अमलानी ने 8 जुलाई रोजी एक छायाचित्र शेअर केले, छायाचित्रात पाण्यात डुबलेल्या गाड्या दिसतात. सोबत लिहले होते कि हे छायाचित्र नागपूरचे आजचे २:३० वाजताचे आहे.

हे छायाचित्र २०२१ चे समजून व्हायरल करण्यात येत आहे. व्हायरल पोस्ट आणि त्याचे आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.

तपास:
विश्वास न्यूज ने व्हायरल छायाचित्र गूगल रिव्हर्स इमेज सर्च मध्ये अपलोड करून सर्च करण्यास सुरुवात केली. आम्हाला हे छायाचित्र बऱ्याच वेबसाईट वर मिळाले. सगळ्यात जुने छायाचित्र हे, नागपूर टुडे नावाच्या वेबसाईट वर, 6 जुलाई 2018 रोजी अपलोड केलेल्या बातमीत हे चित्र होते. हि रिपोर्ट इथे वाचा. याचा अर्थ स्पष्ट होता कि हे छायाचित्र २०१८ चे आहे.

गूगल सर्च द्वारे हे कळले कि या वर्षी देखील नागपुरात बराच पाऊस पडला आणि त्यामुळे विविध ठिकाणी पाणी साचले. या संबंधी नवभारत टाइम्स ची बातमी इथे वाचा.

तपासावेळी आम्हाला एएनआई हिंदी न्‍यूज चा एक ट्विट मिळाला. 8 जुलाई 2021 रोजी केलेल्या या ट्विट मध्ये विविध छायाचित्र होते, ज्यात दिले होते कि महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी रस्त्यावर पाणी साचले. हा ट्विट खाली बघा.

व्हायरल छायाचित्रासंबंधी विश्वास न्यूज ने नागपूर चे एएनआई संवाददाता सौरभ जोशी यांना संपर्क केला. त्यांनी आम्हाला सांगितले कि हे छायाचित्र जुलै 2018 चे आहे, जेव्हा अतिवृष्टी मुळे सगळीकडे पाणी साचले होते. हे छायाचित्र नागपूर च्या एअरपोर्ट रोड चे आहे असे त्यांनी सांगितले.

विश्वास न्यूज ने व्हायरल दावा शेअर करणाऱ्या फेसबुक यूजर दयाराम अमलानी चा तपास केला. त्यात कळले यूजर नागपूर चे रहिवासी आहेत आणि त्यांना 1300 लोकं फॉलो करतात.

निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात या वर्षी चे सांगून व्हायरल होत असलेले पाण्यात बुडलेल्या गाड्यांचे चित्र जुलै 2018 चे आहे. व्हायरल दावा दिशाभूल करणारा आहे.

Misleading
Symbols that define nature of fake news
Know The Truth...

Knowing the truth is your right. If you have a doubt on any news that could impact you, society or the nation, let us know. You can share your doubts and send you news for fact verification on our mail ID contact@vishvasnews.com or whatsapp us on 9205270923

Related Posts
नवीनतम पोस्ट