भगवान विष्णूच्या वराह अवताराची हजारो वर्षे जुनी मूर्ती म्हणून व्हायरल होत असलेली प्रतिमा नुकतीच २०१५ साली तयार करण्यात आली होती. मंदिराचे बांधकाम २००९ मध्ये सुरू झाले.
नवी दिल्ली (विश्वास न्यूज): विश्वास न्यूजला मोठ्या प्रमाणात शेअर होत असलेली पोस्ट समोर आली आहे. शेअर केलेली प्रतिमा भगवान विष्णूच्या वराह अवताराची आहे. ही मूर्ती हजार वर्षे जुनी असल्याचा दावा पोस्टमध्ये करण्यात आला आहे. तथापि, विश्वास न्यूजला त्यांच्या तपासणीत असे आढळून आले की, मूर्तीची व्हायरल झालेली प्रतिमा हजार वर्षे जुनी नसून, 2009 मध्ये बांधलेल्या मंदिराचा भाग आहे.
काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर, पंडित अजय शर्मा प्रदेश अध्यक्ष ब्राह्मण सुरक्षा प्रकोष्ठ मध्यप्रदेश ने व्हायरल पोस्ट शेअर करत हिंदी मध्ये लिहले,
स्वयं को पहचानो
इस मूर्ति को ध्यान से देखिए, यह भगवान विष्णु के वराह अवतार की है जिसमे वह पृथ्वी को रसातल से निकालते हुए दिखाए गए है।
अब सबसे बड़ा आश्चर्य यह होता है की इसमें पृथ्वी का आकार गोल दिखाया गया,
और दुनिया को पृथ्वी के गोल होने का ज्ञान आज से 500 – 600 साल पहले मिला, जबकि यह मूर्ति जगन्नाथ मंदिर में सहस्त्रों वर्ष पूर्व से ही है।
सनातन का गौरवपूर्ण इतिहास अपनी चीख चीख कर अभिसाक्ष्य दे रहा है।
यही निहितार्थ है कि हमारे पाठ्यक्रम इस विषय को भूगोल के नाम से वर्गीकृत किया, क्योंकि हमारे पूर्वजो को ज्ञान था कि पृथ्वी का आकार वृत्ताकार है।
वाम हस्त से इतिहास लिखने वालों तुम क्या हमारा इतिहास मिटाओगे, हमारा इतिहास तो पत्थरो पर लिखा हुआ है।
सौन्दर्य देखना हो तो यूरोप जाओ किन्तु सौन्दर्य के साथ आश्चर्य और यथार्थ भी देखना हो तो हमारे मंदिर आओ!!
हि पोस्ट आणि ह्याचा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.
तपास:
विश्वास न्यूजने साध्या गुगल रिव्हर्स इमेज सर्चने व्हायरल चित्राची तपासणी सुरू केली.
आम्हाला aminoapps.com नावाची वेबसाइट सापडली जी समुदाय आधारित सोशल मीडिया नेटवर्क आहे. त्याच वेबसाइटवरील ‘मायथॉलॉजी अँड कल्चर्स’ या ब्लॉगवर, आम्हाला 27 मे, 2019 रोजी ‘ब्रोकनस्ट्राँगर’ या वापरकर्त्याने शेअर केलेली प्रतिमा आढळली. ब्लॉगचे शीर्षक होते, ‘इमामी जगन्नाथ मंदिराच्या भिंतीवर वराह अवताराची मूर्ती बसवली आहे ( मंदिर). वापरकर्त्याने टिप्पण्यांमध्ये देखील शेअर केले, “पुन्हा माफ करा, जर चित्र चांगले नसेल तर… मी माझ्या सेल फोनने ते क्लिक केले होते… आणि पुढील पोस्ट वराह अवतारच्या कथेवर असेल.”
त्यामुळे हि मूर्ती इमामी जगन्नाथ मंदिराचा असल्याची पुष्टी झाली. त्यानंतर आम्ही हे मंदिर ऑनलाइन शोधले.
हे मंदिर बालासोर, ओडिशात असल्याचे आम्हाला कळले. आम्हाला मंदिराची वेबसाईटही सापडली.
अबाऊट अस सेक्शन मध्ये, आम्हाला आढळले, “मंदिर बांधण्याचे नियोजन सुरू झाले आहे आणि त्याची सीमा 3.5 एकर जागेवर आहे. हे स्वप्न खरे करण्यासाठी, 2009 च्या उत्तरार्धात, श्री रघुनाथ महापात्रा यांनी भुवनेश्वर येथे 30 कुशल वास्तुविशारदांसह काम सुरू केले. ” त्यामुळे 2009 मध्ये बांधकाम सुरू झाल्याचे स्पष्ट झाले.
आम्हाला इमामी जगन्नाथ मंदिरातील तीच मूर्ती दाखवलेल्या स्थानासाठी Google Maps वर अपलोड केलेली प्रतिमा देखील आढळते.
तपासाच्या पुढच्या टप्प्यात आम्ही इमामी जगन्नाथ मंदिर, बालासोर येथील निखिल समतराय यांच्याशी बोललो. मंदिराच्या बांधकामासोबतच मंदिराच्या भिंतीवर साकारलेली वराह मूर्ती 2015 मध्ये तयार करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. ती मूर्ती हजार वर्ष जुनी नाही असे देखील त्यांनी सांगितले.
त्यामुळे मंदिराच्या बांधकामासोबतच मूर्ती अलीकडेच तयार करण्यात आल्याची पुष्टी झाली.
गोलाकार पृथ्वीबद्दल हिंदू धर्मग्रंथांमध्ये काही संदर्भ आहेत का ते देखील आम्ही तपासले. त्याचा कोणताही ठोस पुरावा आम्हाला सापडला नाही. जरी सपाट पृथ्वी आणि गोल पृथ्वी सिद्धांताभोवती अनेक वादविवाद आम्हाला इंटरनेट वर सापडले.
तपासाच्या शेवटच्या टप्प्यात आम्ही व्हायरल इमेज आणि पोस्ट शेअर करणाऱ्या वापरकर्त्याची सोशल बॅकग्राउंड चेक केले. आम्हाला समजले की पंडित अजय शर्मा प्रदेश अध्यक्ष ब्राह्मण सुरक्षा प्रकोष्ठ मध्यप्रदेश ला 1.5K लोकांनी लाईक केले आहे आणि 1.6K लोकं त्यांना फॉलो करतात.
निष्कर्ष: भगवान विष्णूच्या वराह अवताराची हजारो वर्षे जुनी मूर्ती म्हणून व्हायरल होत असलेली प्रतिमा नुकतीच २०१५ साली तयार करण्यात आली होती. मंदिराचे बांधकाम २००९ मध्ये सुरू झाले.
Knowing the truth is your right. If you have a doubt on any news that could impact you, society or the nation, let us know. You can share your doubts and send you news for fact verification on our mail ID contact@vishvasnews.com or whatsapp us on 9205270923