नवी दिल्ली (विश्वास न्यूज). आपल्या मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी 13 फेब्रुवारीला ‘दिल्ली चलो’ मोर्चा काढला. शेतकऱ्यांच्या या आंदोलनाबद्दल सोशल मीडियावर अनेक दिशाभूल करणारे आणि खोटे दावे व्हायरल होत आहेत. या दरम्यान, एक फोटो व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ट्रॅक्टर टँकसारखे दिसत आहेत. दावा केला जात आहे की, हा फोटो शेतकरी आंदोलनाचा आहे.
विश्वास न्यूजच्या तपासात व्हायरल झालेला दावा चुकीचा असल्याचे समोर आले आहे. व्हायरल झालेला फोटो खरा नाही, परंतु तो एआय क्रीएटेड (AI) आहे. लोक फोटोला खरा समजून त्याला चुकीच्या दाव्यासह शेअर करत आहेत.
सोशल मीडिया वापरकर्ता ‘Apna mohalla-अपना मोहल्ला’ ने हा व्हायरल फोटो (संग्रहित लिंक) शेअर केला आणि लिहिले आहे की, “PM निवासस्थानाला घेरण्यासाठी शेतकऱ्यांच्या रुपात दहशतवादी जमाव पोहोचला दिल्लीत, हे तथाकथित शेतकरी आपल्या देशाच्या राजधानीत आंदोलन करणार आहेत किंवा ट्रॅक्टरला मॉडिफाय बदल करून शत्रू देशाच्या सीमेवर हल्ला करणार आहेत, जेणेकरून ते बॅरिकेड तोडू शकतील आणि आगीचा सामना करू शकतील आणि अश्रू धुराचा देखील त्यावर परिणाम होणार नाही, कोणता शेतकरी चळवळीसाठी इतका खर्च करू शकेल?????????????????? आता हे स्पष्ट झाले आहे की, शेतकऱ्यांच्या नावावर देशविरोधी लोकांचा हा मेळावा आहे….. त्यांना शत्रूंनी दिलेल्या पैशातून देशात अराजकता निर्माण करायची आहे. सरकारने प्रथम NSA लागू करून त्यांच्या सर्व नेत्यांना बंद केले पाहिजे …….. नंतर त्यांचा चांगला समाचार घेऊन सत्य शोधून काढले पाहिजे ……..।”
इतर अनेक वापरकर्त्यांनी हा फोटो याच आणि मिळत्या-जुळत्या दाव्यासह शेअर केला आहे.
व्हायरल फोटोचा तपास करण्यासाठी आम्ही फोटो काळजीपूर्वक पाहिला. या फोटोमध्ये रस्त्याची रचना आणि रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने चालणाऱ्या गाड्यांची रचना काहीशी वेगळी वाटत आहे. त्यामुळे त्यांच्या प्रामाणिकपणावर शंका उपस्थित केली जात आहे. आम्ही तपास करण्यासाठी एआय टूल्सचा वापर केला. आम्ही हा फोटो hivemoderation.com टूलवर अपलोड केला. मिळालेल्या माहितीनुसार, हा फोटो एआय द्वारे बनवलेला असण्याची शक्यता 85.4 टक्के आहे.
तपासात पुढे आम्ही आणखी एका एआय टूल contentatscale. ai च्या माध्यमातून देखील व्हायरल फोटोचा शोध घेतला. या टूलनुसार, हा फोटो एआय द्वारे बनवलेला असण्याची शक्यता 82% आहे.
आमच्या आतापर्यंतच्या तपासणीतून हे स्पष्ट झाले आहे की, व्हायरल फोटो वास्तविक नसून तो एआय टूल्सच्या मदतीने तयार केला गेला आहे. आम्ही एआय एक्सपर्ट अमर सिन्हा यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी हा फोटो एआय द्वारे निर्मित असल्याचे सांगितले आहे. ते म्हणतात की, आजकाल एआय चा वापर इतका वाढला आहे की, त्याच्या वापर करून असे कोणतेही चित्र सहजपणे तयार केले जाऊ शकते, जे अगदी वास्तविक दिसते.
अनेक वापरकर्त्यांनी हा फोटो एका बातमीच्या स्क्रीनशॉटसह शेअर केला आहे. या बातमीमध्ये ‘एएनआय’ लिहिलेले आहे. आम्हाला ही बातमी एएनआयच्या वेबसाइटवर 11 फेब्रुवारी 2024 रोजी प्रकाशित झालेली आढळली. पण बातमीमध्ये एका अन्य फोटोचा वापर करण्यात आला आहे.
शेतकरी आंदोलनाशी संबंधित फॅक्ट चेक रिपोर्ट येथे वाचता येतील.
व्हायरल फोटोला चुकीच्या दाव्यासह शेअर करणाऱ्या वापरकर्त्याला फेसबुकवर सुमारे 47 हजार लोक फॉलो करत आहेत.
निष्कर्षः विश्वास न्यूजच्या तपासात असे आढळले आहे की, अलीकडील शेतकरी आंदोलनाशी संबंधित ट्रॅक्टरचा व्हायरल केला जात असलेला फोटो वास्तविक नसू, तो एआय द्वारे निर्मित आहे आणि सोशल मीडियाचे वापरकर्ते त्यास खरा समजून व्हायरल करत आहेत.
Knowing the truth is your right. If you have a doubt on any news that could impact you, society or the nation, let us know. You can share your doubts and send you news for fact verification on our mail ID contact@vishvasnews.com or whatsapp us on 9205270923