X
X

Fact Check: हि पैंटिंग पंजशीर महालात नाही, ह्या पेंटर चे कारागीर एक रशियन आर्टिस्ट आहे

पंजशीर महालात असलेल्या पैंटिंग च्या नावाने व्हायरल होत असलेले चित्र हे एका रशियन आर्टिस्ट चे कार्य आहे. व्हायरल दावा खोटा आहे.

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): विश्वास न्यूज ला एक पैंटिंग विविध सोशल मीडिया वेबसाईट्स वर व्हायरल होताना दिसली. ह्यात दावा करण्यात येत होता कि, पोस्ट मध्ये दिलेल्या पैंटिंग मध्ये, महाभारत चे दृश्य आहे आणि हे चित्र अफगाणिस्तान च्या पंजशीर महालात लागले आहे. पण विश्वास न्यूज च्या तपासात असे समोर आले कि हि पैंटिंग एका रशियन कलाकाराने काढली आहे आणि, हि पंजाशीर च्या महालात नाही.

काय होत आहे व्हायरल?
विश्वास न्यूज ला एक सुंदर पैंटिंग इंटरनेट वर व्हायरल होताना दिसली, फेसबुक पेज ‘Charapal Vs Lokpal’ वर 19 सप्टेंबर रोजी एक पोस्ट शेअर करण्यात आला आणि त्यात दावा केला गेला कि, अनुवाद: ही पेंटिंग पंज-शीर पॅलेसमध्ये अस्तित्वात आहे. हे सध्याच्या अफगाणिस्तानात महाभारताच्या काळापासून गांधार राज्यामध्ये आहे. युनेस्कोने हे हेरिटेज साईट का घोषित केले नाही आणि ते नष्ट होणार नाही याची खात्री का केली नाही? ‘पंजशीर’ हे नाव मूळ नाव ‘पंच शेर’ म्हणजे पाच (पंचा) लायन्स (शेर) चे विचलन आहे. चित्रकला आणि राजवाडा पाच पांडव बंधूंच्या सन्मानार्थ करण्यात आली. सर्व आशियाईंना माहित आहे की बौद्ध धर्माच्या उत्तरार्धातही गांधार हे पूर्णपणे हिंदू राज्य होते. हे नंतर मुस्लिम शिया पंथात गेले, आक्रमणकर्त्यांनी ज्याचे त्वरित इस्लमिक राज्यात रूपांतर केले. तथापि, त्यांनी हिंदू वारसा आणि शाही अवशेष नष्ट केले नाहीत, जसे की हे चित्र आणि गांधारातील हिंदू संस्कृतीचे चित्रण करणारे इतर अनेक मौल्यवान पुरातन वस्तू. आज या प्रदेशाला खंडारा म्हटले जाते, जे प्रसिद्ध ट्रान्स-कॉन्टिनेंटल मार्केटसाठी ओळखले जाते. खंडारामध्ये बहुतेक हिंदू मंदिरे अस्तित्वात आहेत. पण, आता सुन्नी-पंथाचे वर्चस्व असलेल्या तालिबान्यांनी अफगाणिस्तान ताब्यात घेतले आहे. ज्या इतिहासकारांना प्रत्यक्षात भारताचा इतिहास माहित आहे त्यांना अफगाणिस्तानातील सर्व हिंदू लोक आणि हिंदू स्मृती नष्ट होतील अशी भीती वाटते. इतिहासाच्या या मानवी जिवंत तुकड्यांच्या परिणामांचा विचार करण्यासाठी आपल्याकडे फार कमी वेळ शिल्लक आहे. साभार

हि पोस्ट आणि याचा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.

हीच पोस्ट मिळत्या जुळत्या मजकुरासह, ‘sanataniamericanhindu’, ह्या ट्विटर हॅन्डल नि शेअर केले.
हि पोस्ट आणि त्याचा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.

तपास:
विश्वास न्यूज ने आपल्या तपासाची सुरुवात एक सध्या गूगल रिव्हर्स इमेज पासून केली.

आम्हाला हे चित्र Art Spb ह्या रशियन वेबसाईट वर अपलोड केलेले दिसले.

आम्हाला ह्या पैंटिंग खाली, ‘रसिकानंद’ हे नाव लिहलेले दिसले, ह्याचाच अर्थ, ह्या चित्राचे चित्रकार, ‘रसिकानंद’ हे आहेत.

आम्ही वेबसाईट च्या आर्टिस्ट सेक्शन मध्ये त्यांची माहिती शोधली, त्यात आम्हाला असे कळले कि रसिकानंद ह्यांचा जन्म 1973 मध्ये Komsomolsk-on-Amur येथे झाला. त्यांनी कलेत पदवी शिक्षण घेतले आहे आणि 1990 ते 1993 मध्ये ते Vladivostok Art School इथे शिकलेत. 1993 पासून ते international publishing house BBT (Bhaktivedanta Book Trust) यांच्यासोबत पुस्तकांचे दृष्टांत करतात. ते Creative Union of Artists of Russia आणि International Federation of Artists (IFA) चे सदस्य आहेत.

अजून तपास केल्यावर आम्हाला रसिकानंद दास ह्यांचा फेसबुक प्रोफाइल मिळाला.

रसिकानंद ह्यांनी आपल्या प्रोफाइल वर ह्या पोस्ट चे खंडन केले होते.

तपासच्या पुढच्या टप्प्यात आम्ही थेट रसिकानंद ह्यांना संपर्क केला.
विश्वास न्यूज सोबत बोलताना रसिकानंद दास म्हणाले, “हरे कृष्णा! हि माझीच पैंटिंग आहे. मी सोची, सौथ रशिया मध्ये 1999 साली हि पैंटिंग बनवली. ह्या चित्राचा विषय श्रीमद भागवत, 7-व्या कॅन्टोचा आहे. ही चित्रकला माझी मूळ निर्मिती आहे. आणि ती अजिबात पंजशीर येथे नाही. त्यांनी जे लिहिले ते सर्व साफ खोटे आहे.

आम्ही हे देखील तपासले कि पंजाशीर महाल नावाचा कुठला महाल अफगाणिस्तान मध्ये आहे का, पण आम्हाला त्याचा देखील कुठेच उल्लेख मिळाला नाही.
शेवटच्या टप्प्यात आम्ही व्हायरल दावा शेअर करणाऱ्या यूजर्स चा तपास केला.
फेसबुक पेज Charapal Vs Lokpal ह्यांना 11,572 लोकांनी लाईक केले आहे.
तसेच ट्विटर यूजर sanataniamericanhindu ह्यांचे 2824 फॉलोवर आहे आणि ते 4590 लोकांना फॉलो करतात.

निष्कर्ष: पंजशीर महालात असलेल्या पैंटिंग च्या नावाने व्हायरल होत असलेले चित्र हे एका रशियन आर्टिस्ट चे कार्य आहे. व्हायरल दावा खोटा आहे.

  • Claim Review : पंजाशीर महालातील पैंटिंग.
  • Claimed By : sanataniamericanhindu
  • Fact Check : False
False
Symbols that define nature of fake news
  • True
  • Misleading
  • False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

Post your suggestion

No more pages to load

संबंधित लेख

Next pageNext pageNext page

Post saved! You can read it later