तालिबान च्या कब्ज्यानंतर अफगाणिस्तान वरून भारतीय वायू सेनेच्या C-17 विमानातून 800 भारतीयांना सुरक्षित काढण्याच्या दाव्यासह व्हायरल होत असलेले चित्र 17 नोव्हेंबर 2013 चा फिलिपिन्स मधला आहे जेव्हा जवळपास 670 लोकांना चक्रवाती वादळ ग्रस्त टाकलोनेण्यात आले बान मधून काढून मनिलाला नेण्यात आले. या बचाव अभियानात C-17 ग्लोबमास्टर III द्वारे पूर्ण करण्यात आले.
नवी दिल्ली (विश्वास न्यूज): अफगाणिस्तान वर तालिबान ने कब्जा केल्यानंतर भारतासोबत इतर देशांनी देखील तीथुन आपले नागरिक काढण्यास अभियान राबवले. या संदर्भात सोशल मीडिया वर एक चित्र चुकीच्या दाव्यासह व्हायरल होताना आम्हाला दिसले. ह्यात सांगण्यात आले होते कि भारतीय वायु सेनेच्या C17 विमानाने आलेल्या नागरिकांचे हे चित्र आहे, ज्यात 800 लोकांना सुखरूप काढण्यात आले.
विश्वास न्यूज च्या तपासात हा दावा खोटा असल्याचे कळले. भारत ने अफगाणिस्तान दूतावास मध्ये अडकलेल्या आपल्या लोकांना तिथून सुखरूप काढले आहे, पण व्हायरल होत असलेले छायाचित्र हे भारत च्या बचाव अभियानाचे नाही.
काय होत आहे व्हायरल?
सोशल मीडिया यूजर ‘Simple’ ने व्हायरल चित्र शेअर केले (आर्काइव्ह लिंक) आणि लिहले: IAF C17 airlifts from Kabul airport with 800 Indians. A record which previously stood at 670.
सोशल मीडिया च्या विविध प्लॅटफॉर्म वर अन्य यूजर देखील हे चित्र, मिळत्या-जुळत्या दाव्याने शेअर करत आहे. फेसबुक यूजर, Rajnish Singh यांनी देखील हे छायाचित्र अश्याच काही दाव्यासह शेअर केले.
तपास:
न्यूज सर्च मध्ये आम्हाला अशी कुठलीच बातमी मिळाली नाही ज्यात सांगितले असेल कि तालिबान च्या कब्ज्यानंतर अफगाणिस्तान मध्ये असलेल्या भारतीय अधिकारी आणि सुरक्षा बल च्या लोकांना तिथून सुखरूप काढण्यात आले आहे. न्यूज एजेन्सी एएनआई ने केलेल्या ट्विट प्रमाणे, काबुल मध्ये काम करणाऱ्या भारतीय अधिकाऱ्यांना वायू सेनेच्या C-17 विमानाद्वारे गुजरातच्या जामनगर ला आणण्यात आले. त्यासोबतच, दोन वायू सेनेचे विमान हिंडणं एयरबेस वर देखील उतरले, ज्यांनी काबुल वरून टेक ऑफ केले होते.
द हिंदू च्या वेबसाईट वर 17 अगस्त 2021 रोजी प्रकाशित रिपोर्ट प्रमाणे, “अफगाणिस्तान वर तालिबान च्या कब्ज्यानंतर 140 लोकं (120 दूतावास चे कर्मचारी आणि सुरक्षा बल, 16 सामान्य नागरिक आणि चार मीडियाकर्मी) दिल्ली ला आणल्या गेले. ह्या ओकांना वापस आणण्यासाठी भारतीय वायुसेनेच्या C-17 विमानाचा वापर करण्यात आला.’
द हिंदू मधेच एका दुसऱ्या रिपोर्ट प्रमाणे, या आधी 16 ऑगस्ट रोजी C-17 विमानाद्वारे 40 राजनयिक आणि अन्य लोकांना वापस आणले गेले. एका दुसऱ्या रिपोर्ट प्रमाणे, 15 ऑगस्ट रोजी एयर इंडिया च्या विमानाद्वारे काबुल वरून 129 भारतीयांना दिल्ली वापस आणलं गेले.
कोणत्यापण रिपोर्ट मध्ये आम्हाला हे चित्र मिळाले नाही होत आहे. सोबतच कोणत्याच रिपोर्ट मध्ये आम्हाला हि देखील माहिती मिळाली नाही ज्यात एक सोबत विमानात ८०० पेक्षा जास्ती भारतीय वापस आणल्याचे सांगितले आहे. तेज टीव्ही च्या ट्विटर हॅन्डल वर 18 ऑगस्ट रोजी केलेल्या एका ट्विट प्रमाणे, अफगाणिस्तान मधून भारतीय दूतावास चे अधिकारी, स्टाफ आणि सुरक्षाकर्मी यांना वापस आणल्या नंतर आता बाकी भारतीयांना देखील काढण्याची तयारी सुरु आहे.
रिपोर्ट प्रमाणे आतापर्यंत 1600 पेक्षा जास्ती भारतीयांना अफगाणिस्तान मधून काढण्यासाठी भारतीय दूतावास ने मदत मागितली आहे.
व्हायरल होत असलेल्या चित्राचे खरे सोर्स जाणून घेण्यासाठी आम्ही गूगल रिव्हर्स इमेज ची मदत केली. सर्च च्या वेळी आम्हाला हे चित्र अमेरिकी एयर फोर्स च्या वेबसाईट वर मिळाली.
दिलेल्या माहिती प्रमाणे, ‘फिलीपींस में 17 नवंबर 2013 को चक्रवाती तूफान हैयान की वजह से अमरिकी एयर फोर्स ने C-17 ग्लोबमास्टर III की मदद से 670 लोगों को सुरक्षित निकाला गया था।’
ह्या चित्राला अफगाणिस्तान मधून भारतीयांना सुखरूप काढण्याच्या दाव्यासह व्हायरल करण्यात येत आहे. व्हायरल चित्रासंबंधी आम्ही भारतीय वायू सेनेच्या एका अधिकाऱ्यांसोबत संपर्क केला. त्यांनी सांगितले कि, “भारतीय वायू सेने ने काबुल मधून भारतीय राजनयिक आणि अन्य अधिकाऱ्यांना काढण्यासाठी C-17 विमानाचा वापर केला आणि लोकांना काढले देखील. पण हे छायाचित्र त्या अभियानाचे नाही.
न्यूज सर्च मध्ये आम्हाला ते चित्र देखील मिळाले, ज्यात वायू सेने ने C-17 विमान वापरून अफघाण च्या शरणार्थ्यांना काबुल वरून कतार ला आणले. रिपोर्ट प्रमाणे विमानात ६४० लोकं होते.
व्हायरल छायाचित्र शेअर करणाऱ्या यूजर चा देखील आम्ही बॅकग्राऊंड चेक केला. त्यात कळले कि त्यांना जवळपास पाच हजार लोकं फॉलो करतात. ते दिल्ली चे रहिवासी आहेत.
निष्कर्ष: तालिबान च्या कब्ज्यानंतर अफगाणिस्तान वरून भारतीय वायू सेनेच्या C-17 विमानातून 800 भारतीयांना सुरक्षित काढण्याच्या दाव्यासह व्हायरल होत असलेले चित्र 17 नोव्हेंबर 2013 चा फिलिपिन्स मधला आहे जेव्हा जवळपास 670 लोकांना चक्रवाती वादळ ग्रस्त टाकलोनेण्यात आले बान मधून काढून मनिलाला नेण्यात आले. या बचाव अभियानात C-17 ग्लोबमास्टर III द्वारे पूर्ण करण्यात आले.
Knowing the truth is your right. If you have a doubt on any news that could impact you, society or the nation, let us know. You can share your doubts and send you news for fact verification on our mail ID contact@vishvasnews.com or whatsapp us on 9205270923