X
X

Fact-Check: हे सध्याच्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे छायाचित्र नाही, २०१३ चे छायाचित्र होत आहे व्हायरल

एक पोलीस अधिकारी एका वृद्ध माणसावर बंदूक रोखून धरल्याचे छायाचित्र आताच्या शेतकरी आंदोलनाचे नाही, ते २०१३ चे मेरठ च्या खेरा गावाचे आहे. व्हायरल दावा खोटा आहे.

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): रविवारी, राज्य सभेने तीन पैकी दोन फार्म रिफॉर्म बिल मंजूर केले. त्यानंतर देशभरात, खास करून हरियाणा आणि पंजाब मध्ये शेतकऱ्यांनी आंदोलन केले. दोन बिल, फार्मर्स प्रोड्युस ट्रेड अँड कॉमर्स (प्रोमोशन अँड फॅसिलिटेशन), २०२० आणि फार्मर्स (एम्पॉवरमेंट अँड प्रोटेक्शन) अग्रीमेंट ऑफ प्राईस अशुरन्स अँड फार्म सर्विसेस बिल, २०२० मंजूर केले. हे झाल्यानंतर, एक छायाचित्र सोशल मीडिया वर शेअर करण्यात आले, त्यात एक पोलीस दलाचा माणूस एका वयस्कर माणसावर बंदूक रोखून धरल्याचे दिसून येते. पण विश्वास न्यूज च्या तपासादरम्यान हे छायाचित्र जुने असल्याचे लक्षात आले. हे छायाचित्र २०१३ साली खेरा, मेरठ येथे काढले गेले होते, जे आता सध्या सुरु असलेले शेतकरी आंदोलनचे सांगून शेअर करण्यात येत आहे.

काय होत आहे व्हायरल?
ट्विटर यूजर Md Shamim Ashraf यांनी आपल्या ट्विटर प्रोफाइल वर २१ सप्टेंबर रोजी पोस्ट केले, “Ongoing #KishanAndolan at Pnjab, Hryana & othr States. Luk at the Police unifrm, his attitude twrds the old protsting Farmer, And indmitable spirit of the Farmer. Aisa hi Police unifrm Jamia, UP,JNU #CAA protst ke dauran dekha gaya tha ….. Desh Nagpur chlata hai.Koi sarkar nhi

या पोस्ट चे अर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.

तपास:
नुकतेच राज्य सभेने फार्म रिफॉर्म बिल मंजूर केल्यानंतर, संपूर्ण देशात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु झाले, खास करून हरियाणा आणि पंजाब मध्ये. तेव्हापासून एक छायाचित्र सोशल मीडिया वर शेअर करण्यात येत आहे, आणि असा दावा केला जात आहे कि ते छायाचित्र आताच्या शेतकरी आंदोलनाचे आहे.

विश्वास न्यूज ने सगळ्यात आधी या वर रिव्हर्स इमेज सर्च केले. हे सर्च, ‘बिंग’ हे सर्च इंजिन वापरून करण्यात आले. विश्वास न्यूज ला ‘द पायोनीर’ या संकेतस्थळावर हे छायाचित्र सापडले. हे छायाचित्र, ‘Meerut erupts in protest against NSA slap on Som’ या बातमी सोबत घेण्यात आले आहे. हि रिपोर्ट लखनऊ वरून ३० सप्टेंबर, २०१३ रोजी फाईल केली गेली.

विश्वास न्यूज ला हेच छायाचित्र ‘द इंडियन एक्सप्रेस’ या संकेतस्थळावर पण सापडले. रिपोर्ट, ‘Tense Meerut erupts, six hurt in clash with police at banned mahapanchayat’ ३० सप्टेंबर २०१३ रोजी प्रकाशित केली गेली होती. या रिपोर्ट मध्ये व्हायरल होत असलेल्या छायाचित्राचा कॅप्शन देखील देण्यात आला आहे. कॅप्शन मध्ये म्हंटले गेले आहे, “A security officer takes on a villager during the clash in Khera on Sunday. PTI”
अर्थात: एक सेक्युरिटी ऑफिसर, रविवारी खेरा येथे, एका गावकऱ्यावर नेम साधताना. पीटीआय
कॅप्शन वरून असे समजते कि हे छायाचित्र PTI या वृत्त संस्थेचे आहे.

खेरा (खेडा) या गावाचे प्रधान, ओंबीर सिंह, यांनी विश्वास न्यूज सोबत बोलताना सांगितले, “हे छायाचित्र २०१३ च्या पंचायत च्या वेळी घेण्यात आले होते. कवल कांड नंतर हे छायाचित्र घेण्यात आले होते. या पंचायत मध्ये सहरांपुर वरून देखील लोक आले होते. पोलिसांनी पंचायत घेण्यास नकार दिल्यानंतर हिंसक वातावरण झाले.”

दैनिक जागरण मेरठचे चीफ रिपोर्टर, रवी प्रकाश तिवारी यांनी विश्वास न्यूज सोबत बोलताना सांगितले कि हे छायाचित्र २०१३ चे, मेरठच्या सदर तहसील खेरा गावाचे आहे. त्यांनी हे देखील सांगितले कि लोकांना तिथे पंचायत घ्यायची होती पण शासनाने त्याची परवानगी दिली नाही, पण तरी लोकांनी पंचायत भारावली असता, पोलिसांसोबत त्यांची चकमक झाली.

दैनिक जागरण लखनऊ चे वरिष्ठ पत्रकार, यांनी पण या छायाचित्राची पुष्टी केली. त्यांनी सांगितले हे छायाचित्र २९ सप्टेंबर २०१३ रोजी घेतले गेले होते आणि ३० सप्टेंबर २०१३ रोजी प्रकाशित केले गेले होते. त्यांनी हे देखील सांगितले कि PTI या वृत्त संस्थेनी हे छायाचित्र रिलीज केले होते. त्यांनी दैनिक जागरण या वृत्त पत्राचे, ३० सप्टेंबर २०१३ रोजी चे या बातमीचे प्रिंट एडिशन देखील विश्वास न्यूज सोबत शेअर केले.

विश्वास न्यूज ने, ज्याने हे छायाचित्र चुकीच्या दाव्यांसह शेअर केले त्या ट्विटर यूजर चे ट्विटर प्रोफाइल तपासले असता असे कळले कि User Md Shamim Ashraf यांनी डिसेंबर २०१४ रोजी ट्विटर जॉईन केले. ते ७३ लोकांना फॉलो करतात तसेच त्यांना ११ लोक फॉलो करतात. स्वतःच्या बायो मध्ये त्यांनी ‘सोशल आक्टिविस्ट’ असे नमूद केले आहे.

निष्कर्ष: एक पोलीस अधिकारी एका वृद्ध माणसावर बंदूक रोखून धरल्याचे छायाचित्र आताच्या शेतकरी आंदोलनाचे नाही, ते २०१३ चे मेरठ च्या खेरा गावाचे आहे. व्हायरल दावा खोटा आहे.

  • Claim Review : Ongoing #KishanAndolan at Pnjab, Hryana & othr States. Luk at the Police unifrm, his attitude twrds the old protsting Farmer, And indmitable spirit of the Farmer. Aisa hi Police unifrm Jamia, UP,JNU #CAA protst ke dauran dekha gaya tha ..... Desh Nagpur chlata hai.Koi sarkar nhi
  • Claimed By : Md Shamim Ashraf ‏
  • Fact Check : False
False
Symbols that define nature of fake news
  • True
  • Misleading
  • False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

Post your suggestion

No more pages to load

संबंधित लेख

Next pageNext pageNext page

Post saved! You can read it later