Fact Check: व्हायरल चित्रात केजरीवाल गडकरींना माफी पत्र देत नाही आहेत, दावा दिशाभूल करणारा

व्हायरल पोस्ट ज्यात दावा करण्यात येत आहे कि हे चित्र केजरीवाल ह्यांनी नितीन गडकरी ह्यांना माफी पत्र दितानाचे आहे, हि पोस्ट खोटी आहे. हा दावा दिशाभूल करणारा असून हे चित्र ए-रिक्षा नियमित करण्यासाठी घेतलेल्या भेटीचे आहे.

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा फोटो विश्वास न्यूजला व्हायरल होत असल्याचे लक्षात आले. अरविंद केजरीवाल यांनी नितीन गडकरींवर खोटे आरोप केल्याबद्दल लेखी माफीनामा सादर केल्याचे चित्र असल्याचा दावा केला जात होता.
विश्वास न्यूजने केलेल्या तपासात हा दावा दिशाभूल करणारा असल्याचे आढळून आले.

काय होत आहे व्हायरल?

फेसबुक पेज ‘The Positive Indian’ ने व्हायरल फोटो शेअर केला आणि लिहले: This is a historic picture of Kejriwal submitting written apology to Nitin Gadkari for making false allegations!

भाषांतर: केजरीवाल नितीन गडकरींना लेखी माफी पत्र देतानाच ऐतिहासिक चित्र.

हि पोस्ट आणि त्याचा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.

तपास:

विश्वास न्यूजने इंटरनेटवर चित्र शोधण्यास सुरुवात केली. व्हायरल चित्रात Getty Images वॉटरमार्क होता. म्हणून, आम्ही थेट गेटी इमेजेसच्या वेबसाइटवर कीवर्डद्वारे शोधले.

ह्या चित्राच्या कॅप्शन मध्ये म्हंटले होते:
AAP Leader Arvind Kejriwal Met Transport Minister Nitin Gadkari On Regularizing E-Rickshaws

NEW DELHI, INDIA – SEPTEMBER 16: Aam Aadmi Party convener Arvind Kejriwal with Union Minister for Road Transport and Highways Nitin Gadkari during a meeting on regularizing e-rickshaws at Transport Bhawan on September 16, 2014 in New Delhi, India. The Delhi High Court last week said the ban on plying of “illegal” e-rickshaws in Delhi would continue till the law is amended to bring them under the ambit of the Motor Vehicles Act, adding that “what is prohibited by law is not permitted in action (Photo by Arvind Yadav/Hindustan Times via Getty Images)

भाषांतर: ई-रिक्षा नियमित करण्याबाबत आप नेते अरविंद केजरीवाल यांनी परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली.

नवी दिल्ली, भारत – 16 सप्टेंबर: आम आदमी पक्षाचे निमंत्रक अरविंद केजरीवाल केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत नवी दिल्ली, भारत येथे 16 सप्टेंबर 2014 रोजी परिवहन भवन येथे ई-रिक्षा नियमित करण्याबाबत झालेल्या बैठकीदरम्यान. दिल्ली उच्च न्यायालयाने गेल्या आठवड्यात सांगितले की, दिल्लीतील “बेकायदेशीर” ई-रिक्षा चालवण्यावरील बंदी जोपर्यंत त्यांना मोटार वाहन कायद्याच्या कक्षेत आणण्यासाठी कायद्यात सुधारणा होत नाही तोपर्यंत कायम राहील आणि “कायद्याद्वारे प्रतिबंधित असलेल्या गोष्टींना परवानगी नाही. कृतीत (गेट्टी इमेजेसद्वारे अरविंद यादव/हिंदुस्तान टाइम्सचे छायाचित्र)

आम्हाला २०१४ मधील ह्या सगळ्या बातम्या सापडल्या.

रिपोर्ट आणि चित्र 2014 चे आहे, पण अरविंद केजरीवाल ह्यांनी माफीचे पत्र नितीन गडकरींना 2018 साली दिले होते. त्याच्या काही बातम्या आम्हाला सापडल्या.

रिपोर्ट्स मध्ये म्हंटल्या प्रमाणे: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना लिहिलेल्या पत्रात केजरीवाल यांनी गडकरींवर केलेल्या असत्यापित आरोपांबद्दल खेद व्यक्त केला आहे. “माझं तुमच्याविरुद्ध वैयक्तिक काहीही नाही. मला त्याचं खेद वाटतो. आपण या घटनेला मागे टाकू आणि न्यायालयीन कामकाज बंद करू,” असं केजरीवाल यांनी पत्रात लिहिलं आहे.

खाली ह्या पत्राची प्रत बघा.

तपासाच्या पुढील टप्प्यात आम्ही आपचे प्रवक्ते प्रभात अग्रवाल यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी पुष्टी केली की हे चित्र 2014 चे आहे जेव्हा ते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना नवी दिल्लीतील परिवहन भवन येथे ई-रिक्षा नियमित करण्यासाठी भेटले होते. व्हायरल झालेली पोस्ट आम आदमी पार्टी आणि अरविंद केजरीवाल यांना बदनाम करण्याचा प्रचार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

तपासाच्या पुढच्या टप्प्यात आम्ही फेसबुक पेज, The Positive Indian चा तपास केला. ह्या पेज ला एक लाख पेक्षा अधिक लोक फोल्लो करतात.

निष्कर्ष: व्हायरल पोस्ट ज्यात दावा करण्यात येत आहे कि हे चित्र केजरीवाल ह्यांनी नितीन गडकरी ह्यांना माफी पत्र दितानाचे आहे, हि पोस्ट खोटी आहे. हा दावा दिशाभूल करणारा असून हे चित्र ए-रिक्षा नियमित करण्यासाठी घेतलेल्या भेटीचे आहे.

Misleading
Symbols that define nature of fake news
Know The Truth...

Knowing the truth is your right. If you have a doubt on any news that could impact you, society or the nation, let us know. You can share your doubts and send you news for fact verification on our mail ID contact@vishvasnews.com or whatsapp us on 9205270923

Related Posts
नवीनतम पोस्ट