नवी दिल्ली (विश्वास न्यूज). अमेरिका, कॅनडासह काही देशांत 8 एप्रिल रोजी सूर्यग्रहण दृष्टीस पडले आणि तेव्हापासून एक फोटो व्हायरल होत आहे. 2024 च्या सूर्यग्रहणाचा हा फोटो असल्याचे सांगून विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हा फोटो शेअर केला जात आहे. या फोटोला खरा समजून इतर वापरकर्तेही या फोटोला फॉर्वर्ड करत आहेत.
विश्वास न्यूजला त्यांच्या तपासात आढळले की, 8 एप्रिलला सूर्यग्रहणाच्या नावाखाली प्रसारित केला जाणारा हा फोटो खरा नाही, तर तो एआय (AI) म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजंसच्या माध्यमातून तयार करण्यात आला आहे.
फेसबुक वापरकर्त्याने व्हायरल पोस्ट शेअर करताना लिहिले आहे की, “Amaziing astronomy, probably the best photo of total solar eclipse 2024 (आश्चर्यकारक खगोलशास्त्र, कदाचित संपूर्ण सूर्यग्रहण 2024 चा सर्वोत्कृष्ट फोटो)”
पोस्टची संग्रहित आवृत्ती येथे पहा.
सोशल मीडियावर अनेकदा खरा समजून एआय (AI) द्वारे तयार करण्यात आलेले फोटो व्हायरल होतात,या आधारावर आम्ही व्हायरल फोटो ‘हाईव्ह मॉडरेशन (Hive Moderation)’वर अपलोड केला, तपासणीत, हा फोटो एआय (AI) द्वारे बनवण्याची शक्यता 99.9% असल्याचे सांगण्यात आले आहे.
त्याच वेळी, आम्ही हा फोटो एआय (AI) फोटो ओळखणारे एक दुसरे टूल, इज इट एआय डॉट कॉमवर देखील अपलोड केला, आणि येथे सापडलेल्या निकालानुसार, हा फोटो 94.16% एआय (AI)द्वारे बनविला गेला आहे.
आम्ही हा फोटो एआय (AI) तज्ज्ञ चातक वाजपेयी यांच्यासोबत शेअर केला आहे. त्यांनी पुष्टी करून सांगितले की, हा फोटो एआय (AI)द्वारे बनविला गेला आहे.
सूर्यग्रहणाचा एक संपादित केलेला हा फोटो शेअर करताना वापरकर्ते दावा करत होते की, तो पोर्तुगालमध्ये दाखवल्या गेलेल्या सूर्यग्रहणाचे आहे, तर विश्वास न्यूजला त्यांच्या तपासणीत हा व्हायरल फोटो स्पेनमधील असल्याचा आढळला आणि त्याला संपादित करून सूर्याच्या फोटोशी जोडले गेले आहे. फॅक्ट चेक येथे वाचले जाऊ शकते.
बनावट पोस्टला शेअर करणाऱ्या फेसबुक वापरकर्त्याच्या सोशल स्कॅनिंगमध्ये आम्हाला आढळले की, वापरकर्त्याला एक हजाराहून अधिक फॉलोअर्स आहेत.
निष्कर्ष: विश्वास न्यूजने व्हायरल करण्यात आलेल्या फोटोचे तपशीलवार परीक्षण केले. वेगवेगळी साधने वापरण्यात आले. याशिवाय तज्ज्ञांचीही मदत घेण्यात आली. सूर्यग्रहणाच्या नावाने एआय (AI) फोटो व्हायरल करून खोटी बातमी पसरवली जात असल्याचे तपासात समोर आले आहे.
Knowing the truth is your right. If you have a doubt on any news that could impact you, society or the nation, let us know. You can share your doubts and send you news for fact verification on our mail ID contact@vishvasnews.com or whatsapp us on 9205270923