X
X

Fact Check: हा खरा पक्षी नाही, एक डिजिटल आर्टवर्क आहे

विश्वास न्यूज ला आपल्या तपासात व्हायरल दावा खोटा असल्याचे समजले. छायाचित्र डिजिटल एडिटिंग टूल च्या मदतीने बनवले आहे.

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): सोशल मीडिया वर सध्या एक चित्र व्हायरल होत आहे, ज्यात दोन हिरव्या रंगाचे पोपट सारखे दिसणारे पक्षी दिसतात. पोस्ट मध्ये दावा करण्यात येत आहे कि हे खरे मलेशियाई फ्रॉगमाउथ पक्षी आहेत. विश्वास न्यूज च्या तपासात हा दावा खोटा असल्याचे समोर आले. चित्रात दिसत असलेले पक्षी डिजिटल टूल च्या साहाय्याने बनवले गेले आहे.

काय होत आहे व्हायरल?
Animals TV नावाच्या सोशल मीडिया यूजर ने हि पोस्ट शेअर करून लिहले: Malaysia large Frogmouth art 💚

तपास:
ह्या पोस्ट चा तपास विश्वास न्यूज ने रिव्हर्स इमेज सर्च चा वापर करून सुरु केले. आम्हाला हे चित्र mymodernmet.com वर मिळाले. वेबसाईट वर दिलेल्या माहिती प्रमाणे, ऑस्ट्रेलिया चे फोटोग्राफिक इलस्ट्रेटर जोश डाइकग्राफ हे प्रकृती मध्ये असलेल्या फुलपानांचे चित्र घेऊन डिजिटल टूल च्या मदतीने त्यांचे रूपांतरण पक्षी आणि जनावरांमध्ये करतात आणि त्यातून नवीन आर्टवर्क बनवतात.

आम्हाला हे चित्र designswan.com वर देखील मिळाले. ह्या बातमी प्रमाणे हे चित्र ऑस्ट्रेलियाई फोटोग्राफिक इलस्ट्रेटर जोश डाइकग्राफ ह्यांनी एडिटिंग टूल्स च्या मदतीने बनवले आहे. बातमी प्रमाणे एक आर्टवर्क बनवायला 30 ते 60 तास लागतात आणि फोटोशॉप मध्ये जवळपास त्यात 2000 ते 3000 परत लागतात.

हे चित्र आम्हाला डिस्क्रिप्शन सोबत designboom.com वर देखील मिळाले.

आम्ही या विषयी ऑस्ट्रेलियाई फोटोग्राफिक इलस्ट्रेटर जोश डाइकग्राफ ह्यांना मेल द्वारे संपर्क केला. त्यांनी आम्हाला उत्तरात सांगितले हे खरे चित्र नाही, ह्याला एडिटिंग टूल्स च्या मदतीने बनवण्यात आले आहे.

ह्या छायाचित्राला चुकीच्या दाव्यासह Animals TV नावाच्या फेसबुक यूजर ने शेअर केले, ज्यांचे 122,693 फॉलोअर्स आहे.

निष्कर्ष: विश्वास न्यूज ला आपल्या तपासात व्हायरल दावा खोटा असल्याचे समजले. छायाचित्र डिजिटल एडिटिंग टूल च्या मदतीने बनवले आहे.

  • Claim Review : large Frogmouth art
  • Claimed By : Animals TV
  • Fact Check : False
False
Symbols that define nature of fake news
  • True
  • Misleading
  • False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

Post your suggestion

No more pages to load

संबंधित लेख

Next pageNext pageNext page

Post saved! You can read it later