X
X

Fact Check: दीपिका पदुकोण यांचे त्यांच्या मुलासोबत शेअर केले जाणारे फोटो एडिट केलेले आहेत, खोटा दावा व्हायरल

विश्वास न्यूजला त्यांच्या तपासात व्हायरल झालेला दावा खोटा असल्याचे आढळले आहे. खरे तर मुलासोबत व्हायरल झालेले दीपिका पदुकोणचे हे फोटो एडिट केलेले आहेत. जे लोक चुकीच्या दाव्यासह शेअर करत आहेत.

नई दिल्ली (विश्वास न्यूज). दीपिका पदुकोण यांच्या काही फोटोंचा एक कोलाज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यात एक मूल त्यांच्या मांडीवर दिसत आहे. काही वापरकर्ते ही पोस्ट शेअर करताना दावा करत आहेत की, दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांच्या घरी मुलाने जन्म घेतला आहे.

विश्वास न्यूजला त्यांच्या तपासात व्हायरल झालेला दावा खोटा असल्याचे आढळले आहे. खरे तर मुलासोबत व्हायरल झालेले दीपिका पदुकोणचे हे फोटो एडिट केलेले आहेत. जे लोक चुकीच्या दाव्यासह शेअर करत आहेत.

काय होत आहे व्हायरल?

फेसबुक पेज Haryanvi Dance ने 28 ऑगस्ट 2024 रोजी ही पोस्ट शेअर करत लिहिले आहे, “आनंदाची बातमी! दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांनी 7 महिन्यांच्या गरोदरपणानंतर प्रथमच एका मुलाला जन्म दिला आहे. 7 महिन्यांची बाळं अशक्त असतात आणि त्यांची जगण्याची शक्यता कमी असते कृपया आपले आशीर्वाद द्या.”

पोस्टची संग्रहित लिंक इथे पाहता येईल.

अशाच आणखी एका पेज bolliwood khawab ने ही दीपिका पदुकोण यांचे मुलासोबतचे फोटो शेअर करत लिहिले आहे की, “लग्नाच्या 5 वर्षांनंतर आई बनलेल्या दीपिका पदुकोणमुळे वडील होण्याच्या आनंदात वेड्या झालेल्या रणवीर सिंग यांनी सर्वांना मिठाई वाटली.”

तपास

अभिनेत्री दीपिका पदुकोण यांनी 29 फेब्रुवारी 2024 रोजी त्यांच्या गरोदरपणाची घोषणा केली. ज्यात त्यांनी सांगितले होते की, त्यांची डिलिव्हरी सप्टेंबर 2024 मध्ये होईल. ज्यामुळे व्हायरल झालेला दावा चुकीचा असल्याचे स्पष्ट होते.

हा तपास पुढे नेत असताना, आम्ही गुगल लेन्सद्वारे व्हायरल कोलाजमध्ये वापरलेले फोटो शोधले. आम्हाला Doctors Hospital of Laredo च्या फेसबुक पेजवर मूळ फोटो सापडला. हा फोटो 4 जानेवारी 2022 रोजी शेअर करण्यात आला होता. मिळालेल्या माहितीनुसार, हा फोटो डॉक्टर्स हॉस्पिटलचा आहे, जिथे नवीन वर्ष 2022 मध्ये जन्मलेल्या सिंडी चावेझ या बाळाचे स्वागत करण्यात आले होते. या फोटोला एडीट करण्यात आले असून त्यात दीपिका पदुकोणचा चेहरा ठेवण्यात आला आहे.

शोधादरम्यान आम्हाला lmtonline.com वेबसाइटवरील छायाचित्राशी संबंधित रिपोर्टही सापडला. हा रिपोर्ट 2 जानेवारी 2022 रोजी प्रसिद्ध करण्यात आला होता. बातमीनुसार, फोटोतील महिलेचे नाव सिंडी शावेझ आहे, ज्यांच्या मुलीचा जन्म डॉक्टर्स हॉस्पिटलमध्ये नवीन वर्षाच्या दिवशी झाला होता. नवीन वर्षात जन्माला आलेल्या बाळाला आणि आईला हॉस्पिटलकडून भेटवस्तू दिल्या जातात.

दुसरा फोटो

आता आम्ही कोलाजचा दुसरा फोटो शोधला. आम्ही गुगल इमेजेसचा वापर केला. आम्हाला purelytwins.com च्या वेबसाईटवर असाच फोटो सापडला.

आम्हाला हा फोटो इतर अनेक वेबसाईटवर सापडला, जो येथे पाहता येईल.

दीपिका पदुकोणशी संबंधित ही पोस्ट व्हायरल होण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही असाच एक दावा व्हायरल झाला होता. ज्याचा तपास विश्वास न्यूजने केला होता. त्यावेळी मुंबईतील बॉलीवूडचे वार्तांकन करणाऱ्या दैनिक जागरणच्या ज्येष्ठ पत्रकार स्मिता श्रीवास्तव यांच्याशी आम्ही संपर्क साधला होता. त्यांनी व्हायरल पोस्ट बनावट असल्याचे म्हटले होते. फॅक्ट चेक रिपोर्ट येथे वाचता येईल.

तपासाअंती आम्ही पोस्ट शेअर करणारे पेज स्कॅन केले. आम्हाला आढळून आले की, फेसबुकवर 119 हजार लोक या पेजला फॉलो करतात.

निष्कर्ष: विश्वास न्यूजला तपासात आढळले की, दीपिका पदुकोणने मुलाला मांडीवर घेतल्याचे व्हायरल झालेले फोटो एडिट केलेले आहेत. लोक या फोटोला खरा समजून खोट्या दाव्यासह शेअर करत आहेत.

  • Claim Review : दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांच्या घरी मुलाने जन्म घेतला आहे.
  • Claimed By : फेसबुक पेज - Haryanvi Dance Fans
  • Fact Check : False
False
Symbols that define nature of fake news
  • True
  • Misleading
  • False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

Post your suggestion

No more pages to load

संबंधित लेख

Next pageNext pageNext page

Post saved! You can read it later