Fact Check: बेडया बान्ध्लेले वृध कैदी बाबूराम बलवान सिंह यांचे छायाचित्र फादर स्टेन स्वामी च्या नावाने व्हायरल

विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल होत असलेले छायाचित्र ज्यात दावा करण्यात येत आहे कि तो स्वामी स्टेन यांचा आहे, तो दावा खोटा ठरला. हे छायाचित्र एटा जेल मधील एका कैद्याचे जुन्या घटनेशी संबंधित आहे. छायाचित्रात वृद्ध इसम फादर स्टेन स्वामी नसून, युपी च्या एटा जिल्ह्यातील जेल मध्ये जन्मठेप भोगत असलेला कैदी बाबूराम बलवान सिंह आहे.

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): सोशल मीडिया वर एका वृद्ध इसमाचे छायाचित्र फादर स्टेन स्वामी यांच्या नावाने व्हायरल होत आहे. व्हायरल छायाचित्रात एका दवाखान्याच्या बेड वर एक वृद्ध इसम बसल्याचे दिसते, ज्याच्या हाता-पायात बेड्या असल्याचे दिसते. सोशल मीडिया यूजर्स हा फोटो फादर स्टेन स्वामी यांचा असल्याचा दावा करत आहेत, ज्यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. विश्वास न्यूज च्या दाव्यात हा दावा खोटा असल्याचे समजले. छायाचित्रात दिसत असलेला व्यक्ती युपी च्या एटा जिल्ह्यात आजीवन कारावास भोगत असलेला कैदी बाबूराम बलवान आहे.

काय होत आहे व्हायरल?
फासिबूक यूजर Rajesh Nokhwal ने 05 जुलै 2021 रोजी एका वृद्ध इसमाचा फोटो शेअर केला आणि लिहले: स्टेन स्वामी गंभीर थे। पार्किंसन के साथ कोविड से भी लड़ रहे थे। लेकिन इस हालात में भी उनके पैर को बेड़ियों से बेड में बांधा गया था।कितनी क्रूर, हत्यारी और निर्दयी है ये सरकार 84 साल के वृद्ध के हौसले से आगे हार गए।स्टेन स्वामी नहीं रहे। वह 84 वर्ष के थे, जिस प्रकार सरकार ने उन्हें बिना किसी जुर्म के जेल में ठूँस दिया था और उनके साथ क्रूर और घटिया व्यवहार किया, यह हमेशा याद रखा जाएगा। सरकार को भी एक बात याद रखनी चाहिए की दमन कभी क्रांति को दबा नहीं सकता। सलाम-श्रद्धांजलि 

 यह मोदी की तानाशाही की सबसे क्रूरतम तस्वीर है।
या पोस्ट चे आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.

तपास:
मागील काही दिवसात सामाजिक कार्यकर्ते फादर स्टेन स्वामी यांचे निधन झाले. ते भीमा कोरेगांव केस मध्ये आरोपी होते आणि मुंबईच्या जेल मध्ये होते. त्यांनी कोर्टात त्यांच्या वयाच्या आणि तब्येतीचे कारण सांगून जमानत याचिका दाखल केली होती, पण उपचारादरम्यानच त्यांचे निधन झाले.
फादर स्टेन स्वामी यांच्या निधनानंतर हे छायाचित्र व्हायरल होत आहे, ज्यात फादर स्टेन स्वामी यांना दवाखान्यात बेड्यांमध्ये ठेवले होते असा दावा करत व्हायरल केले जात आहे.

आम्ही सगळ्यात आधी गूगल रिव्हर्स इमेज सर्च द्वारे या छायाचित्राला शोधण्याचा प्रयत्न केला. आम्हाला व्हायरल छायाचित्राबद्दल बरेच रिपोर्ट मिळाले. इंडिया टुडे च्या वेबसाईट वर 13 मे 2021 रोजी प्रकाशित एका रिपोर्ट मध्ये आम्हाला हे छायाचित्र मिळाले. रिपोर्ट प्रमाणे, छायाचित्रातील व्यक्ती, युपी चा एटा जिल्ह्यातील कैदी सांगण्यात आला आहे. रिपोर्ट प्रमाणे वृद्ध कैद्यांसोबत अमानवीय व्यवहार होत असल्याने जेल डीजी ने जेल वॉर्डन ला सस्पेंड केले होते. हि रिपोर्ट इथे क्लीक करून वाचा.

हे छायाचित्र आम्हाला एनडीटीवी च्या वेबसाईट वर 13 मई 2021 रोजी प्रकाशित असल्याचे देखील मिळाले. यात देखील या वृद्ध इसमाला एटा जेल चा कैदी असल्याचे सांगितले आहे. ते जन्मठेप भोगत असल्याचे सांगितले आहे. त्यांना मे मध्ये २०२१ मध्ये श्वास घेण्याच्या त्रासामुळे अलिगढ ला पाठवले गेले होते.
तिथे बेड ना मिळाल्यामुळे त्यांना एटा जिल्ह्यातील कोविड वॉर्ड मध्येच दाखल केले गेले. हि रिपोर्ट इथे क्लीक करून वाचा.

18 जून 2021 रोजी प्रकाशित एनडीटीव्ही च्या एका रिपोर्ट मध्ये देखील हे व्हायरल छायाचित्र मिळाले. दवाखान्यात बेड ला कैद्याला बांधून ठेवल्याने, राष्ट्रीय मानवाधिकार आयोग ने प्रदेश सरकार ला नोटीस बजावली. हि रिपोर्ट इथे क्लिक करून बघा.

तपासाच्या पुढच्या टप्प्यात आम्ही एटा जेल चे जेलर कुलदीप सिंह भदोरिया यांना संपर्क करून त्यांना व्हायरल छायाचित्र आणि दावा पाठवला. त्यांनी फोटो पाहून सांगितले कि हे छायाचित्र  कैदी बाबूराम बलवान सिंह यांचे आहे.

विश्वास न्यूज ने व्हायरल दावा शेअर करणाऱ्या फेसबुक यूजर Rajesh Nokhwal यांच्या प्रोफाइल चा तपास केला. यूजर हनुमानगढ़ चे रहिवासी आहेत आणि एका विशिष्ठ पार्टी चे समर्थक आहे.

(With inputs from Vivek Tiwari)

 

निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल होत असलेले छायाचित्र ज्यात दावा करण्यात येत आहे कि तो स्वामी स्टेन यांचा आहे, तो दावा खोटा ठरला. हे छायाचित्र एटा जेल मधील एका कैद्याचे जुन्या घटनेशी संबंधित आहे. छायाचित्रात वृद्ध इसम फादर स्टेन स्वामी नसून, युपी च्या एटा जिल्ह्यातील जेल मध्ये जन्मठेप भोगत असलेला कैदी बाबूराम बलवान सिंह आहे.

False
Symbols that define nature of fake news
Know The Truth...

Knowing the truth is your right. If you have a doubt on any news that could impact you, society or the nation, let us know. You can share your doubts and send you news for fact verification on our mail ID contact@vishvasnews.com or whatsapp us on 9205270923

Related Posts
नवीनतम पोस्ट