Fact Check: मध्य प्रदेश चे मुख्यमंत्री शिवराज यांच्यावर जोडा फेकण्याची घटना २ वर्ष जुनी आहे, व्हिडिओ परत होत आहे व्हायरल
विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल पोस्ट खोटी ठरली. २०१८ च्या घटनेचा एक व्हिडिओ आता मुद्दाम खोट्या दाव्यांसोबत व्हायरल होत आहे.
- By: Ashish Maharishi
- Published: Sep 29, 2020 at 02:59 PM
- Updated: Sep 29, 2020 at 03:04 PM
नवी दिल्ली (विश्वास न्यूज): मध्य प्रदेश चे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यावर जोडा फेकल्या गेल्याचा एक जुना व्हिडिओ आता व्हायरल होत आहे. या व्हिडिओ ला घेऊन दावा केला जात आज कि हि घटना नुकतीच घडली आहे. हा व्हिडिओ बरेच यूजर वेग-वेगळे दावे करून शेअर करत आहे.
विश्वास न्यूज ने व्हायरल पोस्ट चा तपास केल्यानंतर असे कळले कि हि घटना २०१८ ची आहे आणि काही लोकं हि घटना नुकतीच घडली असल्याचे सांगून हा व्हिडिओ व्हायरल करत आहेत. फेसबुक आणि व्हाट्सअँप सारख्या सोशल नेटवर्किंग वेबसाईट्स वर लोकं हा व्हिडिओ शेअर करत आहेत.
काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर Md Sadre Alam यांनी ११ सप्टेंबर रोजी एक व्हिडिओ अपलोड केला आणि त्यात दावा केला: ‘चप्पल जुते से स्वागत होना सुरु हो गया है मामा जी को अब समझ जाना चाहिए!’
पोस्ट चे अर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.
या व्हिडिओ ला लोक आत्ताचा समजून व्हायरल करत आहे.
तपास:
विश्वास न्यूज ने सगळ्यात आधी या व्हिडिओ ला निरखून बघितले. त्यात आम्हाला मध्य प्रदेश चे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान खूप साऱ्या लोकांना संबोधित करताना दिसले. या व्हिडिओ मध्ये कोणीच मास्क घातलेला नाही असे आम्हाला आढळले. कोरोनाव्हायरस महामारी ची भयावह स्तिथी असताना जेव्हा सगळे लोकं मास्क चा वापर करत आहेत, या व्हिडिओ मध्ये आम्हाला तसे दिसले नाही.
तपास करताना पुढे आम्ही हा व्हिडिओ InVID टूल मध्ये अपलोड केला. त्यात आम्हाला बरेच स्क्रीन ग्रैब्स मिळाले त्यांना आम्ही त्यानंतर गूगल रिवर्स इमेज टूल च्या मदतीने शोधले. सर्च च्या वेळी आम्हाला हा व्हायरल व्हिडिओ खूप वेबसाईट्स वर मिळाला. हा व्हिडिओ २०१८ चा आहे असे कळले. सर्च च्या वेळी आम्हाला हा व्हिडिओ वनइंडिया या वेबसाईट वर मिळाला. या बातमीत व्हायरल व्हिडिओ वापरला गेला होता. ५ सप्टेंबर २०१८ रोजी प्रकाशित या बातमीत सांगितले कि मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यावर जोडा फेकल्याची घटना २०१८ मध्ये सीधी येथे घडली जेव्हा ते एका सभेला संबोधित करत होते. हि पूर्ण बातमी इथे वाचा.
सर्च च्या वेळी आम्हाला नवभारत टाइम्स च्या यूट्यूब चैनलवर पण आम्हाला हाच व्हिडिओ मिळाला. यात सांगितले गेले कि मध्य प्रदेश चे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यावर जोडा फेकला गेला. व्हिडिओ ३ सप्टेंबर २०१८ रोजी अपलोड केला गेला होता. संपूर्ण व्हिडिओ इथे बघा.
व्हायरल व्हिडिओ वरून विश्वास न्यूज ने नईदुनिया चे स्टेट ब्यूरो चीफ धनंजय प्रताप सिंह यांच्यासोबत देखील संपर्क केला. त्यांनी विश्वास न्यूज ला सांगितले कि हा व्हिडिओ २०१८ चा विधानसभा निवडणुकांच्या आधीचा आहे, जेव्हा शिवराज सिंह चौहान पूर्ण प्रदेशात जन आशीर्वाद यात्रेवर निघाले होते. त्याच वेळी हि घटना घडली होती. त्याच वेळी हि घटना सीधी जिल्ह्यात घडली होती. हा तेव्हाच व्हिडिओ आहे, जो आता व्हायरल होत आहे.
तपासाच्या शेवटच्या टप्प्यात आम्ही फेसबुक यूजर Md Sadre Alam यांच्या अकाउंट चा तपास केला. आम्हाला असे कळले कि यूजर कोलकाता चा रहिवासी आहे. त्यांनी मार्च २०१४ रोजी फेसबुक अकाउंट बनवले होते. या अकाउंट च्या तपासावरून असे कळले कि यूजर एक राजनीतिक पार्टी सोबत जुडलेला आहे. या अकाउंट वर आम्हाला व्हायरल कन्टेन्ट जास्ती दिसले.
निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल पोस्ट खोटी ठरली. २०१८ च्या घटनेचा एक व्हिडिओ आता मुद्दाम खोट्या दाव्यांसोबत व्हायरल होत आहे.
- Claim Review : चप्पल जुते से स्वागत होना सुरु हो गया है मामा जी को अब समझ जाना चाहिए…
- Claimed By : Md Sadre Alam
- Fact Check : False
Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!
Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.