X
X

Fact Check: सोनू सूद आणि स्वरा भास्कर च्या नावानी हमास आतंकवादी संगठनेला केलेले ट्विट खोटे आहे

आमच्या तपासात हे स्पष्ट झाले कि व्हायरल स्क्रीनशॉट खरी नाही आहे. तसेच हमास चे अधिकृत ट्विटर हॅन्डल नाही आणि व्हायरल स्क्रीनशॉट मधले सोनू सूद आणि स्वरा भास्कर चे ट्विटर हॅन्डल देखील खरे नाही.

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): इस्राएल आणि पॅलेस्टाईन मध्ये संघर्ष सुरु असताना, सोशल मीडिया वर एका ट्विट चे स्क्रीनशॉट व्हायरल होत होते. या ट्विट मध्ये पॅलेस्टाईन चे आतंकवादी संघटन हमास चे इंग्रजीत ट्विट दिसते, ज्यात ते ५ राफेल जेट ची मागणी करताना दिसतात, ज्याच्या मदतीने ते इस्राएल सोबत युद्ध करू शकतील. या ट्विट वर स्वरा भास्कर यांचे ट्विट दिसते, ज्यात त्या सोनू सूद यांना मदत करण्यास आवाहन करताना दिसतात. त्यात उत्तरात सूद देखील उद्या पर्यंत पाच राफेल पोहोचतील असे लिहताना दिसतात. या तिन्ही सोशल मीडिया हॅन्डल समोर ब्ल्यू टिक असल्याकारणाने यूजर ह्या ट्विट ला खरे समजून व्हायरल करताना दिसत आहेत. विश्वास न्यूज च्या तपासात हे ट्विट खोटे असल्याचे कळले.

हमास चे कुठलेच अधिकृत ट्विटर हॅन्डल नाही आहे. तसेच व्हायरल स्क्रीनशॉट मधले स्वरा भास्कर आणि सोनू सूद यांचे देकील ट्विटर हॅन्डल चुकीचे आहेत.

काय होत आहे व्हायरल?
फेसबुक पेज The Right Side ने हा स्क्रीनशॉट ने शेअर केला, ज्यात लिहलेला टेक्स्ट या प्रमाणे आहे: आम्हाला ५ राफेल जेट्स ची खूप गरज आहे, ज्याचा वापर करून आम्ही झाओनिस्ट सोबत लढू शकू. त्याच्या उत्तरात स्वरा भास्कर लिहते – आम्ही तुमचे दुःख समजतो @SonuSood मानवतेची शेवटची किरण आहे. सोनू सूद चे उत्तर: @hamas काळजी करू नका, उद्या सकाळ पर्यंत तुम्हाला ५ राफेल जेट्स मिळून जातील.

या पोस्ट चा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.

तपास:
विश्वास न्यूज ने व्हायरल स्क्रीनशॉट च्या तपासाची सुरुवात सोनू सूद आणि स्वरा भास्कर यांचे ट्विटर हॅन्डल शोधण्यापासून केली. आम्ही त्यांचे अधिकृत ट्विटर हॅन्डल तपासले पण आम्हाला काहीच मिळाले नाही. व्हायरल स्क्रीनशॉट निरखून बघितल्यावर आम्हाला दिसले कि स्वरा भास्कर यांच्या ट्विटर हॅन्डल वर @SwaraBhaskar आणि सोनू सूद यांच्या ट्विटर हैंडल वर @OxygenData लिहले होते. स्वरा भास्कर यांचे खरे ट्विटर हॅन्डल, @ReallySwara असे आहेत तर सोनू सूद यांचे @SonuSood आहे. म्हणजेच व्हायरल होत असलेल्या स्क्रीनशॉट चे ट्विटर हॅन्डल त्यांचे नाही.

या नंतर आम्ही व्हायरल होत असलेले ट्विटर हॅन्डल @SwaraBhaskar शोधले तर ते आम्हाला सस्पेंडेड मिळाले. तसेच @OxygenData सर्च केल्यावर आम्हाला बीजिंग च्या डेटा प्लेयर चे अकाउंट मिळाले, पण या अकाउंट वर २०१८ नंतर एक पण पोस्ट नाही आहे. आम्ही हमास चे ट्विटर हॅन्डल @Death_To_Juice पण सर्च केले आम्हाला असे कुठले हॅन्डल मिळाले नाही.

आम्ही अशी कुठली रिपोर्ट इंटरनेट वर मिळते का ते देखील शोधण्याचा प्रयत्न केला, आम्हाला अशी बातमी मिळाली नाही.

अधिक माहिती साठी आम्ही मुंबई मध्ये बॉलीवूड बीट कव्हर करणाऱ्या, दैनिक जागरण च्या मुख्य संवाददात स्मिता श्रीवास्तव यांना संपर्क केला. त्यांनी स्पष्ट केले कि स्वरा आणि सोनू सूद ने असे कुठलेच ट्विट केले नाही. व्हायरल होत असलेला स्क्रीनशॉट एडिटिंग टूल्स च्या मदतीने बनवला गेला आहे.

आम्ही फेसबुक वर पोस्ट शेअर करणारे पेज The Right Side चे प्रोफाइल स्कॅन केले. या पेज ला ५९०००० पेक्षा जास्ती लोकं फॉलो करतात.

निष्कर्ष: आमच्या तपासात हे स्पष्ट झाले कि व्हायरल स्क्रीनशॉट खरी नाही आहे. तसेच हमास चे अधिकृत ट्विटर हॅन्डल नाही आणि व्हायरल स्क्रीनशॉट मधले सोनू सूद आणि स्वरा भास्कर चे ट्विटर हॅन्डल देखील खरे नाही.

  • Claim Review : सोनु सूद आणि स्वरा भास्कर ने हमास ला ट्विटर वर उत्तर दिले
  • Claimed By : The Right Side
  • Fact Check : False
False
Symbols that define nature of fake news
  • True
  • Misleading
  • False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

Post your suggestion

No more pages to load

संबंधित लेख

Next pageNext pageNext page

Post saved! You can read it later