नवी दिल्ली (विश्वास न्यूज). सोशल मीडियाच्या विभिन्न प्लेटफार्मवर सध्या एक फोटो चांगलाच व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये एकाच फ्रेममध्ये विमान, बस, ट्रेन आणि बोट या वाहतुकीच्या चार वेगवेगळ्या पद्धती दर्शविल्या आहेत. सोशल मीडियाचे वापरकर्ते हे दर्शविण्याचा प्रयत्न करीत आहेत की, हे खरे चित्र आहे, ज्यामध्ये वाहतुकीच्या चार पद्धती एकत्र आहेत.
विश्वास न्यूजने केलेल्या तपासात चार प्रकारच्या वाहतुकीची छायाचित्रे एडिट करण्यात आल्याचे समोर आले आहे. या फोटोशी छेडछाड करून हा व्हायरल फोटो तयार करण्यात आल्याचे आमच्या तपासात समोर आले आहे. एडिट केलेल्या फोटोला खरा समजून व्हायरल केले जात आहे. याआधीही हा फोटो अनेकवेळा व्हायरल झाला आहे.
तपासाविषयी इथे माहिती वाचता येईल.
फेसबुक वापरकर्त्या सबीना बी यांनी 28 ऑगस्ट रोजी एक व्हायरल फोटो पोस्ट करत दावा केला आहे की, “छायाचित्रकाराचे कौतुक करावे लागेल, किती सुंदर चित्र आहे. वाहतुकीची चार साधने एकत्र: जलमार्ग, रेल्वे, रस्ते आणि हवाई मार्ग.”
या व्हायरल पोस्टला खरी मानून इतर वापरकर्तेही तिला व्हायरल करत आहेत. पोस्टची संग्रहित आवृत्ती येथे पहा.
व्हायरल फोटोची सत्यता तपासण्यासाठी विश्वास न्यूजने प्रथम गुगल रिव्हर्स सर्च टूलचा वापर केला. इंटरनेटवर या फोटोविषयी माहिती शोधत असताना 16 नोव्हेंबर 2021ची फेसबुक पोस्ट सापडली. 16 नोव्हेंबर 2021 रोजी अपलोड केलेला हा फोटो Aurobindo_sf नावाच्या हँडलसह एडिट केला गेला आहे.
तपास पुढे नेत या हँडलचा शोध घेण्यात आला. इन्स्टाग्रामवर हे हँडल सापडले. 30 ऑक्टोबर 2021 रोजी या हँडलवर फोटो पोस्ट करताना असे सांगण्यात आले की, मूळ फोटोमध्ये विमानाची प्रतिमा जोडून हा फोटो तयार करण्यात आला आहे. मूळ फोटोही इन्स्टाग्रामवर पोस्ट करण्यात आला आहे.
विश्वास न्यूजने या व्हायरल फोटोबद्दल इन्स्टाग्राम हँडल Aurobindo_sf शी संपर्क साधला. त्यांनी हा व्हायरल फोटो त्यांच्यासोबत शेअर केला आहे. त्यांनी स्पष्ट केले की, हे विमान व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये स्वतंत्रपणे जोडले गेले आहे.
तपासाच्या शेवटी, ज्या वापरकर्त्याने बनावट पोस्टला पोस्ट केले होते त्याची तपासणी केली गेली. फेसबुक वापरकर्त्या सबीना बी मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये राहतात. आम्हाला त्यांच्या अकाऊंटवर अनेक वायरल कंटेंट आढळल्या आहेत.
निष्कर्षः वाहतुकीच्या चार पद्धतींचे नाव असलेला व्हायरल फोटो बनावट ठरला. मूळ प्रतिमेमध्ये स्वतंत्रपणे विमान जोडून ही प्रतिमा तयार केली गेली आहे.
Knowing the truth is your right. If you have a doubt on any news that could impact you, society or the nation, let us know. You can share your doubts and send you news for fact verification on our mail ID contact@vishvasnews.com or whatsapp us on 9205270923