Fact Check: या व्हायरल छायाचित्रात दिसत असलेला ब्रिज बिहार नाही, चीन चा आहे
विश्वास न्यूज च्या तपासात आम्हाला कळले कि बिहार च्या ग्लास ब्रिज च्या नावावर शेअर करण्यात येणारे छायाचित्र हे चीन च्या गुआंग्डोंग प्रांत चे आहे.
- By: Ashish Maharishi
- Published: Dec 21, 2020 at 10:29 PM
नवी दिल्ली (विश्वास न्यूज): सोशल मीडिया वर एक ग्लास ब्रिज चे छायाचित्र व्हायरल होत आहे. यूजर्स दावा करत आहे कि हे छायाचित्र बिहार चे राजगिरा मध्ये बनलेल्या काचेच्या पुलाचे आहे.
विश्वास न्यूज ने व्हायरल पोस्ट चे तपास केले, त्यात आम्हाला कळले कि बिहार च्या नावावर काही लोकं चायना च्या गुआंग्डोंग प्रांताच्या काचेच्या ब्रिज चे छायाचित्र व्हायरल करत आहे. बिहार च्या राजगीर मध्ये काचेचा पूल बनला पण हे छायाचित्र तिथले नाही जे व्हायरल होत आहे.
काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर गोलन सिंह भूमिहार ने १८ डिसेंबर ला एक छायाचित्र अपलोड करून दावा केला कि छायाचित्रात दिसत असलेला काचेचा ब्रिज हा नालंदा च्या राजगिर मधला आहे. छायाचित्राच्या वर लिहले होते: हे दृश्य चीन चे नाही. बिहार मध्ये पूर्वोत्तर देशातील, पहिला काचेचा ब्रिज बनला.
तपास:
विश्वास न्यूज ने सगळ्यात आधी व्हायरल छायाचित्र गूगल रिव्हर्स इमेज टूल मध्ये अपलोड करून सर्च केले. सर्च च्या वेळी आम्हाला काही ठिकाणी हे छायाचित्र चीन च्या गुआंग्डोंग प्रांत मधल्या ग्लास ब्रिज च्या नावाने आढळले.
गूगल सर्च वर आम्हला news.cgtn.com नावाची वेबसाईट सापडली. १७ जानेवारी २०१९ रोजी पब्लिश झालेल्या एका बातमीत आम्हाला व्हायरल छायाचित्राचा वापर केला असल्याचे लक्षात आले. बातमीत सांगितल्या प्रमाणे, दक्षिण चीन मध्ये गुआंग्डोंग प्रांतात बनलेल्या २१८ मीटर लांब काचेचा पूल पर्यटकांसाठी १६ जानेवारी उघडण्यात आला. हि संपूर्ण बातमी तुम्ही इथे वाचू शकता.
तपासादरम्यान आम्हाला काही छायाचित्र सीजीटीन च्या फेसबुक पेज वर देखील सापडले. हे छायाचित्र १७ जानेवारी २०१९ रोजी अपलोड करण्यात आले होते. हे छायाचित्र तुम्ही इथे बघू शकता.
तपासादरम्यान आम्हाला कळले कि बिहार च्या बिहारशरीफ जिल्ह्यात राजगिर मध्ये एक काचेचा पूल बनवण्यात आला आहे, जो नवीन वर्षात पर्यटकांसाठी उघडण्यात येईल. जागरण डॉट कॉम च्या बातमी प्रमाणे, राजगिरा च्या नेचर सफारी मध्ये ग्लास स्काय वॉक ब्रिज ची निर्मिती जवळपास पूर्ण झाली आहे.
८५ फीट लांब आणि ५ फीट रुंद या ब्रिज ला वैभरगिरी च्या २ चोटी मध्ये आलेल्या खाई च्या मध्ये बनवण्यात आले आहे. आता पर्यटक यावर उभे राहून लोकं वातावरणाचा आनंद घेऊ शकतात. हि बातमी इथे वाचा.
व्हायरल पोस्ट च्या संदर्भात आम्ही राजगिर चे दैनिक जागरण चे संवाददाता मनोज मायावी यांच्या सोबत संपर्क साधला त्यांनी आम्हाला सांगितले कि हे छायाचित्र तिथल्या ब्रिज चे नाही.
तपासाच्या शेवटी आम्ही छायाचित्र शेअर करणाऱ्या यूजर चे प्रोफाइल चे स्कॅनिंग केले, त्यात आम्हाला ते कळले कि गोलन सिंह भूमिहार हे बिहार शरीफ मध्ये राहतात. त्यांच्या अकाउंट वर आम्हाला व्हायरल कन्टेन्ट जास्ती मिळाला.
निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात आम्हाला कळले कि बिहार च्या ग्लास ब्रिज च्या नावावर शेअर करण्यात येणारे छायाचित्र हे चीन च्या गुआंग्डोंग प्रांत चे आहे.
- Claim Review : हे दृश्य चीन चे नाही. बिहार मध्ये पूर्वोत्तर देशातील, पहिला काचेचा ब्रिज बनला.
- Claimed By : Golan Singh Bhumihar
- Fact Check : False
Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!
Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.