विश्वास न्यूज च्या तपासात बिहार च्या नावाने व्हायरल होत असलेले दारू च्या बाटल्यांचे छायाचित्र खोटे ठरले. हे थायलंड चे जुने छायाचित्र आहे जे आता काही लोकं बिहार चे सांगून व्हायरल करत आहेत.
नवी दिल्ली (विश्वास न्यूज): बिहार विधानसभा निवडणुका असताना सोशल मीडिया वर एक पोस्ट व्हायरल होत आहे. दारूच्या बाटल्यांचे एक छायाचित्र दिसत आहे, ज्यात दावा केला जात आहे कि हे छायाचित्र बिहार चे आहे. विश्वास न्यूज ने व्हायरल छायाचित्राचे तपास केले.
आम्हाला त्यात असे कळले कि हे थायलंड चे हे जुने छायाचित्र आता काही लोकं बिहार चे सांगून व्हायरल करत आहेत.
काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर पूजा शेखर यादव यांनी १९ ऑक्टोबर रोजी एक छायाचित्र अपलोड करून दावा केला: ‘बिहार में बीजेपी-जदयू की कुछ तैयारी ऐसी भी चल रही है…ध्यान रहे बिहारवासियो ये जहर ओर कहर दोनो है इसलिये बहकावे में नही आना है…!!’
अर्थात: बिहार मध्ये भाजप-जेडीयू ची अशी तयारी चालू आहे, लक्षात ठेवा या विषाच्या बेहकाव्यात नाही यायच.
या फोटो ला बाकी यूजर ने देखील खरे मानून शेअर केले आहे. या पोस्ट चे आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.
तपास:
विश्वास न्यूज ने सगळ्यात आधी व्हायरल छायाचित्राला गूगल रिव्हर्स इमेज सर्च मध्ये अपलोड करू करून शोधले. आम्हाला हि बातमी थाई भाषेत एका ब्लॉगवर एका बातमीसोबत मिळाली. यात बिहार च्या नावावर व्हायरल होत असलेले छायाचित्र वापरल्याचे दिसले. या बातमीचे आम्ही गूगल ट्रान्सलेशन च्या मदतीने अनुवाद केल्यावर आम्हाला कळले कि उबोन रात्चाथानी मध्ये २०१९ साली आलेल्या पुरात अन्य सामग्री मध्ये दारूच्या बाटल्यापण वाटल्या गेल्या.
हे छायाचित्र आम्हाला thaihitz.com या वेबसाईट वर पण मिळाली. यात पण सांगितले गेले कि पूर पीडितांना दारू पण वाटण्यात आली होती.
तपासादरम्यान आम्हाला हे व्हायरल छायाचित्र Thai TV Social या फेसबुक पेज वर पण मिळाले. याला २२ सप्टेंबर २०१९ रोजी पोस्ट केले होते.
या पोस्ट वरून हे सिद्ध झाले कि व्हायरल छायाचित्राचा बिहार सोबत काही संबंध नाही. अधिक माहिती साठी आम्ही दैनिक जागरण च्या बिहार चे डिजिटल प्रभारी अमित अलोक यांच्यासोबत चर्चा केली. त्यांनी सांगितले कि बिहार मध्ये दारू बंदी आहे. व्हायरल छायाचित्राचा बिहार सोबत काहीच संबंध नाही.
विश्वास न्यूज ने व्हायरल छायाचित्र पोस्ट करणाऱ्या यूजर चा तपास केला असता आम्हाला कळले कि त्या बिहार च्या रहिवासी आहेत. फेसबुक यूजर पूजा शेखर यादव यांनी फेब्रुवारी २०१७ मध्ये आपला अकाउंट बनवला होता, त्यांना तीन हजार पेक्षा अधिक लोकं फोल्लो करतात.
निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात बिहार च्या नावाने व्हायरल होत असलेले दारू च्या बाटल्यांचे छायाचित्र खोटे ठरले. हे थायलंड चे जुने छायाचित्र आहे जे आता काही लोकं बिहार चे सांगून व्हायरल करत आहेत.
Knowing the truth is your right. If you have a doubt on any news that could impact you, society or the nation, let us know. You can share your doubts and send you news for fact verification on our mail ID contact@vishvasnews.com or whatsapp us on 9205270923