'विश्वास न्यूज'ला त्यांनी केलेल्या तपासात हा दावा खोटा असल्याचे समोर आले आहे. खरे तर, या व्हायरल व्हिडिओचा बांगलादेशशी काहीही संबंध नाही. पाकिस्तानच्या रहिम यार खान प्रांतातील एका हिंदू मंदिराची तोडफोड झाल्याची ही घटना आहे, जिला आता बांग्लादेशच्या नावाने शेअर केले जात आहे. या व्हिडिओचा सध्याच्या परिस्थितीशी काहीही संबंध नाही.
नवी दिल्ली (विश्वास न्यूज). सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवर एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे, ज्यामध्ये काही लोक मंदिराची तोडफोड करताना दिसत आहेत. आता काही वापरकर्ते हा व्हिडिओ अलीकडचा असल्याचा शेअर करून दावा करत आहेत की, ही घटना बांगलादेशची आहे.
‘विश्वास न्यूज’ला त्यांनी केलेल्या तपासात हा दावा खोटा असल्याचे समोर आले आहे. खरे तर, या व्हायरल व्हिडिओचा बांगलादेशशी काहीही संबंध नाही. पाकिस्तानच्या रहिम यार खान प्रांतातील एका हिंदू मंदिराची तोडफोड झाल्याची ही घटना आहे, जिला आता बांग्लादेशच्या नावाने शेअर केले जात आहे. या व्हिडिओचा सध्याच्या परिस्थितीशी काहीही संबंध नाही.
फेसबुक वापरकर्ता, ‘Vineet Kumar Gautam’ने व्हायरल व्हिडीओ (आर्काइव लिंक) शेअर करताना लिहिले आहे, “अशी अवस्था आहे बांगलादेशची. समजून घ्या आणि सावध राहा. अशी परिस्थिती भविष्यात भारतातही उद्भवणार आहे, जिथे जिथे सध्या भारतात एका विशिष्ट धर्माची संख्या जास्त आहे, तिथे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, फक्त मताची ताकद हवी आहे, बाकी काम सत्ता संभाळण्याऱ्या लोकांचे आहे. काही बांधवांना ही गोष्ट वाईट वाटू शकते, कारण त्यांच्यासाठी वैयक्तिक स्वार्थ महत्त्वाचा असतो.”
एक्स वापरकर्ता VINIने देखील हा व्हिडिओ बांगलादेशचा सांगून शेअर केला आहे.
व्हायरल व्हिडिओ तपासण्यासाठी, आम्ही संबंधित कीवर्डसह शोध घेतला. आम्हाला CRUX च्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर व्हिडिओ संबंधित अहवाल सापडला. 5 ऑगस्ट 2021 रोजी अपलोड केलेल्या या व्हिडिओमध्ये या घटनेला पाकिस्तानची घटना म्हणून सांगण्यात आहे आहे.
आम्हाला नवभारत टाईम्सच्या वेबसाईटवर व्हिडिओशी संबंधित बातमी सापडली. 5 ऑगस्ट 2021 रोजी प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात असलेल्या गणेश मंदिराची उपद्रवी लोकांनी तोडफोड केली आणि मंदिरातील मूर्तींची तोडफोड केली.
व्हायरल व्हिडिओशी संबंधित इतर बातम्या आपण येथे वाचू शकता.
या व्हायरल व्हिडिओची पुष्टी करण्यासाठी आम्ही पाकिस्तानी पत्रकार आदिल अली यांच्याशी संपर्क साधला. आम्ही हा व्हिडिओ त्यांच्यासोबत शेअर केला. त्यांनी सांगितले की, हा व्हिडिओ पाकिस्तानचा आणि आणखी एका जुन्या घटनेचा आहे.
याआधीही हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यावेळी हा व्हिडिओ श्रीलंकेचा असल्याचा सांगून शेअर केला गेला होता. त्यावेळी विश्वास न्यूजने या व्हिडिओची चौकशी केली होती. फॅक्ट चेकचा रिपोर्ट इथे वाचता येईल.
शेवटी आम्ही व्हिडिओ शेअर करणाऱ्या वापरकर्त्याला स्कॅन केले. तेव्हा माहिती मिळाली की, 221 लोक वापरकर्त्याला फॉलो करतात. फेसबुकवर वापरकर्त्याचे 555 मित्र आहेत.
निष्कर्षः विश्वास न्यूजला त्यांच्या तपासात असे आढळून आले की, मंदिराची तोडफोड करत असलेला लोकांचा व्हायरल व्हिडिओ हा, बांगलादेशचा नाही तर पाकिस्तानचा आहे. खरे तर, 2021 मध्ये, पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील रहिमयार खान जिल्ह्यातील भोंगमधील हिंदू मंदिर पाडण्याची जुनी घटना अलीकडेच खोटा दावा करून शेअर केली जात आहे. व्हिडिओचा सध्याच्या परिस्थितीशी काहीही संबंध नाही.
Knowing the truth is your right. If you have a doubt on any news that could impact you, society or the nation, let us know. You can share your doubts and send you news for fact verification on our mail ID contact@vishvasnews.com or whatsapp us on 9205270923