Fact Check: रतन टाटा च्या वाढदिवसानिमित्त टाटा कंपनी नाही देत आहे मोफत रिचार्ज, लिंक वर क्लीक नका करू

विश्वास न्यूजने तपास केला आणि व्हायरल दावा खोटा असल्याचे आढळले. वाचकांनी अशा कोणत्याही लिंकवर क्लिक न करण्याचा सल्ला दिला जातो.

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका पोस्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, रतन टाटा यांच्या वाढदिवसानिमित्त टाटा कंपनीने सर्व भारतीय वापरकर्त्यांना 28 दिवसांसाठी 239 रुपयांचे मोफत रिचार्ज करण्याचे आश्वासन दिले आहे. पोस्टसोबत एक लिंकही शेअर केली आहे. विश्वास न्यूजने तपास केला असता, व्हायरल झालेली पोस्ट हा घोटाळा असल्याचे आढळून आले. वाचकांनी अशा कोणत्याही लिंकवर क्लिक न करण्याचा सल्ला दिला जातो.

काय होत आहे व्हायरल?

फेसबुक यूजर “Swarnarekha Prusty ” ने 11 डिसेंबर रोजी एक पोस्ट शेअर करून लिहले,”TATA BIRTHDAY ऑफर टाटा कंपनी अपने रतन टाटा के जन्मदिन पर दे रहा है सभी भारतीय यूजर को ₹239 का 28 दिन वाला रिचार्ज फ्री में देने का वादा किया है तो अभी नीचे नीले रंग की लिंक पर क्लिक करके अपने नंबर पर रिचार्ज करे। https://mahacashback.com/

सोशल मीडिया यूजर्स असाच दावा करत आहेत. हि पोस्ट आणि ह्याचा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.

तपास:

विश्वास न्यूजने प्रथम टाटा कंपनी अशी काही ऑफर देत आहे का हे कीवर्डसह शोधले. आम्हाला त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर अशा कोणत्याही ऑफरबद्दल कोणतीही माहिती सापडली नाही. आम्ही आणखी बातम्या शोधल्या. टाटा कंपनीच्या अशा कोणत्याही ऑफरबद्दल आम्हाला कोणत्याही बातम्यांमध्ये आढळले नाही.

आम्ही पुढे टाटा कंपनीचे अधिकृत सोशल मीडिया हँडल तपासले. इथेही आम्हाला अशी कोणतीही पोस्ट शेअर केलेली आढळली नाही.

यानंतर आम्ही व्हायरल पोस्टमध्ये दिलेली लिंक तपासली. लिंकवर क्लिक केल्यावर तुम्हाला तुमचा फोन नंबर एंटर करण्यास सांगितले जाईल आणि नंतर रिचार्ज ऑफर प्राप्त करण्यासाठी पुढील 5 व्हाट्सअँप ग्रुप्स किंवा 10 लोकांसह शेअर करा.

यापूर्वीही अशा अनेक पोस्ट व्हायरल झाल्या आहेत, ज्याची विश्‍वास न्यूजने वेळोवेळी चौकशी केली आहे. फसवणूक करण्यासाठी आणि फोन नंबर, ईमेल आयडी आणि इतर माहिती यांसारखी वैयक्तिक माहिती गोळा करण्यासाठी अशा लिंक्स तयार केल्या जातात. आम्ही आमच्या वापरकर्त्यांना सांगू इच्छितो की अशा कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका.

अधिक तपशिलांसाठी आम्ही भारतीय सायबर आर्मीचे अध्यक्ष आणि भारतीय पोलिसांचे सायबर क्राइम सल्लागार किसले चौधरी यांच्याशी संपर्क साधला. त्यांच्यासोबत व्हायरल लिंक शेअर केली. ते म्हणाले, हा व्हायरल दावा खोटा आहे आणि दिल्ली पोलिसात याबाबत गुन्हाही दाखल आहे. अशा कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका.

तपासाअंती, आम्ही ही लिंक शेअर करणाऱ्या Facebook वापरकर्त्याची चौकशी केली. तपासादरम्यान असे आढळून आले की, वापरकर्ता ओडिशातील बरचना येथील रहिवासी आहे. फेसबुकवर युजरचे २७१ मित्र आहेत.

निष्कर्ष: विश्वास न्यूजने तपास केला आणि व्हायरल दावा खोटा असल्याचे आढळले. वाचकांनी अशा कोणत्याही लिंकवर क्लिक न करण्याचा सल्ला दिला जातो.

False
Symbols that define nature of fake news
Know The Truth...

Knowing the truth is your right. If you have a doubt on any news that could impact you, society or the nation, let us know. You can share your doubts and send you news for fact verification on our mail ID contact@vishvasnews.com or whatsapp us on 9205270923

Related Posts
नवीनतम पोस्ट