सुमित्रा महाजन ह्यांची महाराष्ट्राची राज्यपाल म्हणून घोषणा झाली नाही. व्हायरल बातमी खोटी आहे.
नवी दिल्ली (विश्वास न्यूज): प्रख्यात राजकारणी आणि लोकसभेच्या माजी स्पीकर सुमित्रा महाजन या महाराष्ट्राच्या नवीन राज्यपाल आहेत, अशी एक व्हायरल पोस्ट विश्वास न्यूजवर आली आहे. मात्र, विश्वास न्यूजने केलेल्या तपासात हा व्हायरल दावा खोटा असल्याचे आढळून आले.
काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर Prime Maharashtra ने मराठीत एक ग्राफिक शेअर केले ज्यात दावा केला होता कि सुमित्रा महाजन ह्या महाराष्ट्राच्या नवीन राज्यपाल म्हणून नियुक्त झाल्या आहेत.
हि पोस्ट आणि ह्याचा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.
तपास:
विश्वास न्यूजने साध्या गुगल कीवर्ड सर्चने तपास सुरू केला. सुमित्रा महाजन यांना महाराष्ट्राच्या नवीन राज्यपाल म्हणून घोषित करण्यात आले आहे की नाही हे सांगणाऱ्या बातम्यांसाठी आम्ही ऑनलाइन तपासले.
असा कोणताही लेख आम्हाला आढळला नाही, पण अमर उजाला वर आम्हाला एक लेख सापडला. लेखाचे शीर्षक होते, ‘MP Politics: सुमित्रा महाजन को राज्यपाल बनाने की अटकलें, ताई ने कहा- मुझसे तो किसी ने कुछ पूछा ही नहीं’
सुमित्रा महाजन यांना अद्याप राज्यपाल म्हणून घोषित करण्यात आलेले नाही, हे यावरून स्पष्ट होते.
आम्हाला दैनिक भास्कर मध्ये देखील अशीच एक बातमी सापडली.
तपासाच्या पुढच्या टप्प्यात आम्ही ANI पत्रकार सौरभ जोशी यांच्याशी संपर्क साधला. सुमित्रा महाजन यांना महाराष्ट्राच्या राज्यपालपदी घोषित करण्यात आले नसल्याची माहिती त्यांनी दिली. व्हायरल दावा खोटा आहे.
तपासाच्या शेवटच्या टप्प्यात आम्ही पोस्ट शेअर केलेल्या वापरकर्त्याचे सोशल बॅकग्राउंड चेक केले. हा पेज Prime Maharashtra ला 11 लाख लोकं फॉलो करतात.
निष्कर्ष: सुमित्रा महाजन ह्यांची महाराष्ट्राची राज्यपाल म्हणून घोषणा झाली नाही. व्हायरल बातमी खोटी आहे.
Knowing the truth is your right. If you have a doubt on any news that could impact you, society or the nation, let us know. You can share your doubts and send you news for fact verification on our mail ID contact@vishvasnews.com or whatsapp us on 9205270923